निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१)

तुम्ही सनकादिक संत !
म्हणवितां कृपावंत !!१!!
एवढा करा उपकार !
देवा सांगा नमस्कार !!२!!
भाकावी करुणा !
विनवा वैकुंठीचा राणा !!३!!
तुका म्हणे मज आठवा !
मूळ लौकरीं पाठवा !!४!!

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (२)

रज्जुसर्पाकार l भासयले जगडंबर !!१!!
म्हणोनि आवडती पाय l घेतों आलाय बलाय!!२!!
दृश्य द्रुमाकार लाणी l केलों सर्वस्वासी!!३!!
तुकीं तुकला तुका l विश्वी भरोनी उरला लोकां !!४!!

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (३)

म्हणवितों दास । परि मी असे उदास ।। १।।
हाचि निश्चय माझा । परी मी निश्चयाहुनी दुजा।।२।।
सरते कर्तृत्व माझ्यानें । परी मी त्याहून असे भिन्न ।।३।।
तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ।।४।।
**** म्हणवितों दास ****
भावार्थ –
मी स्वतःच्या भक्त म्हणवून घेतो ;पण मी देहाविषयी उदास — अहंभावरहित आहे ,।।१।।हाच माझा निश्चय झाला आहे .परंतु मी मात्र बुध्दीचा धर्म असलेल्या निश्चयाहून वेगळा आहे .।।२ ।।माझ्याकडून कर्म घडते ;पण मी त्या कर्माहून भिन्न आहे .।।३।।तुकाराम महाराज म्हणतात ,मी परब्रह्माच्या तुलनेस बरोबर आलो ;परंतु द्वैताच्या भूमिकेवरून जी तुलना केली जाते ,त्या तुलनेहून मी भिन्न आहे .।। ४।।

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (४)


घोंटवीण लाळ ब्रम्हज्ञान्या हातीं ! मुक्तां आत्मस्थिती सांडवीन !!१!!
ब्रम्हभूत काया होतसे कीर्तनीं ! भाग्य तरी ऋणी देव ऐसा !!२!!
तीर्थ भ्रामकासी आणीन आळस ! कडू स्वर्गवास करीन भोग !!३!!
सांडवीन तपोनिधा अभिमान ! यज्ञ आणि दान लाजवीन !!४!!
भक्तिभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ ! ब्रम्हींचा जो अर्थ निजठेवा !!५!!
धन्य म्हणवीन येह लोकीं लोकां ! भाग्य आम्हीं तुका देखियेला !!६!!
***घोटवीन लाळ ***
भावार्थ –
मी लोकात असा कीर्तन भक्तीचा महिमा वाढवीन ;आणि असे रसपूर्ण कीर्तन करीन ,की जे ऐकण्याकरिता ब्रह्मज्ञान्यालादेखील लाळ घोटण्यास लावीन .मुक्ताला आपली स्थितप्रज्ञ अवस्था टाकून देण्यास लावीन .||१||कारण ,कीर्तनाने शरीरदेखील ब्रह्मरूप होते ,व भाग्य एवढे वाढते की ,देवासारखा ऋणी – दास होतो .||२||लोकात कीर्तनाची गोडी निर्माण करून तीर्थयात्रा करणा-यांना आळस आणीन ;आणि इंद्रादिकांना स्वर्गात राहणे व तेंथील भोग भोगणे कडू करून टाकीन .||३||लोहपिष्ट भक्षण करून रात्रंदिवस तपश्चर्या करणा-या लोकांना आपल्या तपस्वीपणाचा अभिमान टाकून देण्यास लावीन ;यज्ञ आणि दान या साधनांना लाजवून सोडीन .||४||भक्तीची जी शेवटची भाग्य-मर्यादा आहे ,ती मर्यादा गाठून त्या बळाने धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष हे चारही पुरूषार्थ संपादन करीन ;आणि वेदात सांगितलेला जो जीवब्रह्मैक्यरूप गुह्यार्थ ,त्यांचेही ज्ञान करून घेईन .||५||तुकाराम महाराज म्हणतात ,इहलोकांतील लोकांकडून मी ‘ धन्य ‘ म्हणवून घेईन ; व आमचे मोठे भाग्य ,म्हणून आम्ही या मृत्युलोकात श्री तुकाराम महाराजांना ‘ डोळ्यांनी पाहिले ‘ असेही म्हणवून घेईन .||६||

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (५)

संसाराचे अंगी अवघीचं व्यसने । आम्ही या किर्तने शुद्ध झालो ॥१॥
आता हे सोंहळें झाले त्रिभुवन । विषय धोऊन सांडियेले ॥ २॥
ब्रम्हपुरीं वास करणें अखंड। न देखिजे तोंड विटाळाचें ॥३॥
तुका म्हणे आम्हा एकांताचा वास । ब्रम्ही ब्रम्हरस सेवू सदा ॥४॥

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (६)

गरुडाचे पायीं ! ठेवीं वेळोवेळां डोई !!१!!
वेगी आणावा तो हरि ! मज दीनातें उद्धरीं!!२!!
पाय लक्ष्मीच्या हातीं ! म्हणोंन येतो काकुलती !!३!!
तुका म्हणे शेषा ! जागे करा ह्रषीकेशा!!४!!

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (७)
तुम्ही सनकादिक संत ! म्हणवितां कृपावंत !!१!!
एवढा करा उपकार ! देवा सांगा नमस्कार !!२!!
भाकावी करुणा ! विनवा वैकुंठीचा राणा !!३!!
तुका म्हणे मज आठवा ! मूळ लौकरीं पाठवा !!४!!

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (८)

आपुल्या माहेरा जाईन मी आता । निरोप या संता हाती आला ।।१।।
सुख दुःख माझे आइकिलें कानी । कळवळा मनी करुणेचा ।। २।।
करुनी सिद्ध मूळ साऊलें भातुके । येती दिसे एकें न्यावयासी ।।३।।
त्याचि पंथे माझे लागलेसें चित्त । वाट पाहे नित्य माहेराची ।।४।।
तुका म्हणे आता येतील न्यावया । अंगे आपुलिया मायबापा ।।५।।

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (९)
चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥
आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥२॥
उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥३॥
तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥४॥

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१०)
आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥१॥
आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥२॥
दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥३॥
तुका म्हणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥४॥

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (११)
येथीलिया अनुभवें ! कळों जीवें येतसे !!१!!
दोहीं ठायीं एक जीव ! माझीं किंव त्या अंगी !!२!!
भुंके भूकची खाऊनी धाय नाहीं हाय अन्नाची!!३!!
तुका म्हणे सुख झाले ! अंतर धालें त्यागुणें !!४!!

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१२)
पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुड येतो फडत्कारे । नाभी नाभी म्हणे त्वरे ॥२॥
मुगुट कुंडलांच्या दीप्ति । तेजे लोपला गभस्ति ॥३॥
मेघश्याम वर्ण हरि । मूर्ति डोळस साजिरी ॥४॥
चतुर्भुज वैजयंती । गळा माळ हे रुळती ॥५॥
पीतांबर- झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥६॥
तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥७॥

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१४)


पैल दिसतिल भार । दिंड्या पताका अपार ॥१।।
आला पंढरीचा राणा।दिसतील त्याच्या खुणा ।
सुख वाटे मना । डोळे बाह्या स्फुरती ।।२।।
उठीले गजर नामाचे।दळभार वैष्णवांचे ।।३।।
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ।।४।।

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१५)

चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥१॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ।
फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥२॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥३॥
आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥४॥

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१६)

पाहुणे घरासी! आजी आले हृषीकेशी !!१!!
काय करूं उपचार ! कोंप मोडकी जर्जर !!२!!
दरदरीत पाण्या-!माजी रांधियेल्या कण्या !!३!!
घरी मोड़किया बाजा ! वरी वाकळांच्या शेजा !!४!!
मुखशुद्धि तुलसीदळ ! तुका म्हणे मी दुर्बळ !!५!!

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१७)

संती केला अंगीकार ! त्यासी अभिमान थोर !!१!!
काही ठेविलें चरणीं ! घेती तेंचि पुरवूनि !
तुका पायवणी ! घेऊनियां निराळा !!२!!
नसतां कांही संचित ! भेटी झाली अवचित !!३!!
देव मिळोनिया भक्त ! तुका केलासे सनाथ !!४!!

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१८)
अवघियांच्या आलों मूळ ! एक वेळ न्यावया ॥१॥
सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें ! आधीं ठावें करितो ॥२॥
जोंवरी ते घटिका दुरी ! आहे तो काळ ॥३॥
मंगळाचे वेळे उभे ! असा शोभे सावध॥४॥
अवघियांचा योग घडे ! तरी जोड़े श्लाघ्यता ॥५॥
तुका म्हणे पाहें वाट ! बहु आट करुनी ॥६।।

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (१९)

सकलही माझी बोळवण करा ! परतोनी घरा जावे तुम्हीं॥१॥
कर्मधर्मे तुम्हां असावे कल्याण ! घ्या माझे वचन आशीर्वाद ॥२॥
वाढवूनी दिलें एकाचिये हातीं ! सकळ निश्चिंती झाली तेथें॥३॥
आतां मज जाणें प्राणेश्वरांसवें ! मी माझीया भावें अनुसरलों ॥४॥
वाढवितां लोभ होईल उशीर ! अवघींच स्थिर करा ठायीं ॥५॥
धर्मं अर्थ काम झाला एकें ठायीं ! मेळविला जिहीं हाताहात !!६!!
तुका म्हणे तुम्हां आम्हां हेची भेटी ! उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥७॥

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (२०)


बोलिलें ते आतां पाळावे वचन ! ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥
जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी ! काळक्षेप आम्हीं करूँ कोठे ॥२॥
न घडे यावरी न धरवे धीर ! पीडतां हे राष्ट्र देखोनि जग॥३॥
हातीं धरोनियां देवे नेला तुका ! जेथें नाहीं लोकां पराश्रम ॥४॥

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (२१)

करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥१॥
अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥२॥
दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥३॥
आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥४॥

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (२२)


आम्ही जातों तुम्ही कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥१॥
वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२॥
अंतकाळीं विठो आम्हांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥३॥

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर
अभंग (२३)

न देखिजे ऐसें केलें l या विठ़ठलें दुःखासी ll१ll
कृपेचिये सिंहासनीं ll अधिष्ठानीं बैसविलें ll२ll
वाजता तो नलगे वारा ll क्षीरसागरा शयनीं ll ३ll
तुका म्हणे अवघे ठायीं ll मज पायीं राखिलें ll४ll

श्री संत तुकाराम महाराज यांचे निर्याणपर अभंग
बोलिलें ते आतां पाळावे वचन !
ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥
जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी !
काळक्षेप आम्हीं करूँ कोठे ॥२॥
न घडे यावरी न धरवे धीर !
पीडतां हे राष्ट्र देखोनि जग॥३॥
हातीं धरोनियां देवे नेला तुका !
जेथें नाहीं लोकां पराश्रम ॥४॥

||निर्याणपर अभंग||
तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा
बिजेनिम्मित…
सकळही माझी बोळवण करा।परतोनी घरा जावे तुम्हि।।१।।
कर्म धर्मे तुम्हा असावे कल्याण। घ्या माझे वचन आशीर्वाद।।२।
वाढवूनि दिले एकचिये हाती।सकळ निश्चिंती झाली माझी।।३।।
आता मज जाणे प्राणेश्वरासावे। मी माझिया भावे अनुसरलो।।४।।
वाढवितां लोभ होईल उशीर।अवघीच स्थिर करा ठायी।।५।।
धर्म अर्थ काम झाला एके ठायी। मेळविला जिहीं हाता हात।।६।।
तुका म्हणे तुम्हा आम्हा हेचि भेटी।उरल्या त्या गोष्टी बोलावया।।७।।

ऐसें बोलून तुकारामबावांनीं वैकुंठवासी देवानें सत्वर यावें ह्मणून त्यांचा धांवा केला तो अभंग.

॥६५१८॥
धांवे धांवे गरुडध्वजा । आह्मा अनाथांच्या काजा ॥१॥
बहु जाहलों कासाविस । ह्मणूनी पाहे तुझी वास ॥२॥
पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥३॥
असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥४॥
न लावावा उशीर । नेणों कांहो केला धीर ॥५॥
तुका ह्मणे चालीं । नको चालूं धांव घालीं ॥६॥

असा धांवा केल्यावर देव येत आहेत असें पाहिलें.

॥६५१९॥
पैल आले हरी । शंख चक्र शोभे करीं ॥१॥
गरुडाच्या फडत्कारें । नाभी नाभी ह्मणे त्वरें ॥२॥
मुगुट कुंडलांची दिप्ति । तेजें लोपला गभस्ती ॥३॥
पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥४॥
मेघ:श्याम वर्ण हरी । मूर्ती डोळस साजिरी ॥५॥
चतुर्भुज वैजयंती । कंठीं माळ हे रुळती ॥६॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥४॥

॥६५२०॥
शंखचक्र गदा पद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥
नाभी नाभी भक्तराया । वेगें पातलों सखया ॥२॥
दुरोनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टीं ॥३॥
तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥४॥

॥६५२१॥
पुष्टकांती निवती डोळे । हे सोवळे श्रीरंगें ॥१॥
अंतर्बाह्य विलेपन । हें भूषण मिरवूं ॥२॥
ईच्छे ऐसी आवडी पुरे । विश्वंभरे जवळी ॥३॥
तुका करी नारायण । दया सेवन नामांचें ॥४॥

हें यमाच्या किंकरांनीं पाहून ते तुकाराम बावांस सोडून पळाले.

॥६५२२॥
भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥१॥
आले वैष्णव वीर । काळ कांपती असुर ॥२॥
गरुड टकियाच्या भारें । भुमि गर्जे जयजयकारें ॥३॥
तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥४॥

याचवेळेस पंढरीनाथ आपल्या परिवारासहित आले.

॥६५२३॥
पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥१॥
आला पंढरीचा राणा । दिसती त्या याच्या खुणा ॥२॥
सुख वाटे मनां । डोळे बाह्या स्फुरती ॥३॥
उठिले गजर नामाचें । दळभार वैष्णवाचे ॥४॥
तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥५॥

ऐसें बोलून आपले समागमीं संत महंत होते त्यांसहित पंढरीनाथास सामोरे परम सद्भावें लोंटांगणीं चालले तेव्हां बोललेला अभंग.

॥६५२४॥
चला जाऊंरे सामोरे । पुढें भेटों धुरे ॥१॥
तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं ॥२॥
फेडावया धणी । प्रेमसुखाची आटणी ॥३॥
पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥४॥
तुका आळंगिला बाहीं । ठेविला विठ्ठलाच्या पायीं ॥५॥

नंतर नारायणाचें स्तवन केलें.

॥६५२५॥
नमो विष्णु विश्वरुपा मायबापा । अपार अमुपा पांडुरंगा ॥१॥
विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आयकावें ॥२॥
तुझी स्तुती वेद करितां भागला । निवांतचि ठेला नेती नेती ॥३॥
ऋषी मुनी बहु सिद्ध कवीजन । वर्णितां गुण न सरती ॥४॥
तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जी कीर्ति वाणी तुझी देवा ॥५॥

मग तुकाराम बावांनीं देवांस घरीं येण्यास अमंत्रण केलें.

॥६५२६॥
चाल घरा उभा राहे नारायणा । ठेऊंदे चरणांवरी डोई ॥१॥
प्रक्षाळुं दे पाय बैस माज घरीं । चित्त स्थिर करी नारायणा ॥२॥
आहे त्या संचितें करविन भोजन । काय न जेऊन करशी आतां ॥३॥
करुणाकरें कांहीं कळों दिलें वर्म । दुरी होतों कोण वरीं ॥४॥
तुका ह्मणे आतां आवडीच्या संता । बोलिलों अनंता करविन तें ॥५॥

देव घरीं आल्यावर त्यांस आपल्या स्थितीचें वर्णन केलें.

॥६५२७॥
इह लोंकीं आम्हां भुषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥१॥
निमाली संपदा भया विरहीत । सर्वकाळ चित्त समाधान ॥२॥
छिद्रांचा अश्रम उंदिर कुळवाडी । धाम नामा जोडी देवाचें तें ॥३॥
तुका ह्मणे एकें सेवटीं रहाणें । वर्ताया जन अवघे या ॥४॥

देवास व संतांस पावण्हेर केला.

॥६५२८॥
पाहुणे घरासी । आजी आले ऋषीकेशी ॥१॥
काय करुं उपचार । कोप मोडकी झांजर ॥२॥
दुरदुरीत कण्या । माजि रांधियेल्या पाण्यां ॥३॥
घरीं मोडकिया बाजा । वरीं वाकळांच्या शेजा ॥४॥
मुख शुद्धी तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥५॥

॥६५२९॥
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
कांहीं ठेविलें चरणीं । घेती तेवी पुरवणी ॥२॥
तुका पायवणी । घेउनी निराळा ॥३॥
नसतां कांहीं संत्रित । भेटी झाली अवचित ॥४॥
देव मिळोनीयां भक्त । तुका म्हणे केला सनाथ ॥५॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *