४७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४७

अश्वत्थामा ब्राम्हण व गुरुबंधु असल्यामुळे त्याला जीवदान दिले,पण संतापलेल्या श्रीकृष्ण त्याला शाप देत म्हणाला,निद्रिस्त,निरपराध लोकांना,युध्द संपल्यावर तूं वध केलास,शिवाय उत्तरेच्या गर्भावर अस्र सोडले,ते तर माझ्या योगसामर्थ्याने मृतबाळ जिवंत करुन, पांडवांचा वंश निर्वंश होऊ देणार नाही, पण तुझ्या या दारुण पापाची शिक्षा म्हणुन तीन हजार वर्षे पृथ्वीवर वणवण भटकत,मस्तकातील जखमेत किडे पडुन दुर्गांधमुळे कोणीही तुझ्या वार्‍यालाही उभे राहणार नाही.श्रीकृष्णाचा भयानक शाप ऐकुन दुःखी,खिन्न मनाने जखमेच्या वेदनेने ओरडत तिथुन निघुन गेला.


अश्वत्थामाच्या डोक्यावरचा मणी घेऊन सर्वजण द्रौपदीकडे आले.गुरुपुत्र व गुरुबंधुचा वध न केल्याबद्दल तिने समाधान व्यक्त केले.तो दिव्य मणी तिने युधिष्ठीराच्या मुकुटावर बांधला.नाईलाजा ने धर्माने गुरुचे उच्छीष्ट म्हणुन केवळ द्रौपदीच्या समाधानासाठी मणी धारण केला.अशा प्रकारे न भूतो न भविष्यती असा या भारतीय युध्दाचा शेवट झाला. पांडवांकडील सात अक्षौहिणीतुन सात व कौरवांकडील अकरा अक्षौहिणीतुन तीन लोक शिल्लक राहिले.पृथ्वीने केलेल्या प्रार्थनानेनुसार तिचा भार हलका करण्या चे मुख्य कार्य श्रीकृष्णाने करविले.


तेवढ्यात हस्तिनापुरहुन धृतराष्र्ट, संजय,विदुर,सर्व स्रियांसह गांधारी,कुंती तिथे येऊन पोहोचल्या.त्या सर्वांना दुःखी धर्मराज सामोरा गेला.संतप्त धृतराष्र्टाने मन आवरुन त्याला अलिंगन दिले.नंतर भीम नमस्कार करायला गेला असतां, आपल्या पुत्रांना ठार करणारा हाच..असे मनात येऊन त्याचा क्रोधाग्नि भडकला.ये भीमा ये,मला अलिंगन दे! असे म्हणत पुढे सरकला,पण त्याचा दुष्ट कावा श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यावर,भीमाला बाजुला सारुन लोखंडी पुतळा धृतराष्र्टा समोर केला.धृतराष्र्टाने त्यापुतळ्याला इतक्या जोराने आवळले की,त्या लोखंडी पुतळ्याचे चुर्ण चुर्ण झाले.श्रीकृष्णाच्या प्रसंगावधानाने भीमाचे प्राण वाचवले.


श्रीकृष्ण धृतराष्र्टाला समजावत म्हणाला,राजा! वेदशास्र,पुराणे तू जाणतोसच!अरे,तुझ्याच पुत्रमोहाने व अपराधाने एवढा सारा संहार घडला तरी, तूच पांडवावर कोप करतोस हे न्याय्य नव्हे.मी स्वतः,भीष्म,द्रोण,विदुर सर्वांनी नानाप्रकारे भावी अनर्थाची कल्पना दिली समजावले,पण त्यावेळी तूं कोणाचेच ऐकले नाहीस,निदान आतांतरी मनातला आक्रोश काढुन पांडवांनाच पुत्रांच्या ठायी समज.श्रीकृष्णाचे बोधांमृत ऐकुन धृतराष्र्ट म्हणाला,केशवा! तुझे म्हणने पटले. शांत झालोय! अगदी निशंक मना ने भेटव भीमाला.भीमाने पुढे होऊन अलिंगन दिल्यावर अर्जुन,नकुल,सहदेवां ना ही पोटाशी धरुन आशिर्वाद दिला.
नंतर युधिष्ठीर गांधारीला वंदन करण्यास गेला असतां,क्रोध अनावर होऊन ती शाप देणार,येवढ्यात व्यासांनी मनोवेगाने येऊन,तीचे मन परावर्तीत केल्यामुळे ती थोडी शांत झाली व युधिष्ठीर तीच्या शापापासुन वाचला.तो नमस्कारासाठी वाकला असतां,पट्टीतुन तिची दृष्टी त्याच्या पायाच्या नखांवर पडली असतां नखे काळेनिळे पडले.


त्यानंतर सर्व पांडव आई कुंतीला भेटल्यावर त्यांना पोटाशी धरुन खूप विलाप केला.दोन्ही सास्वांना नमस्कार करतांना द्रौपदीला शोक अनावर झाला, तेव्हा गांधारी म्हणाली, अग! माझेकडे बघुन तरी स्वतःचा शोक आवर!पण जेव्हा श्रीकृष्ण गांधारी सन्मुख गेला, तेव्हा मात्र,आपला संताप आवरणे तीला कठीण झाले,ती म्हणाली,योगेश्वरा!तूं सर्व सामर्थशाली असुन जर मनात आणले असते तर हा विनाश टाळु शकला असतास,आणि माझ्या शंभर पुत्रांच्या वियोगाचे दुःख भोगावे लागले नसते.तरीसुध्दा तूं हे सर्व घडविले,जसा आमचा सर्वनाश केलास,तसेच आज पासुन ३६ वर्षांनी तुझे यादवकुळ आप सांत लढुन नष्ट होईल.वास्तविक गांधारी चा शाप तो परतवु शकला असतां,पण तो तिच्या तपोबलाचा अपमान झाला असतां,म्हणुन त्याने तथास्तू म्हणुन त्या शापाचा स्विकार केला.त्यानंतर सर्वजणं भागीरथीवर येऊन सर्व मृतवीरांना उदक दिले.अशाप्रकारे युध्दपर्व मागे पडले, गतकाळात जमा झाले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *