५२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ५२.

ते उगवलेले लव्हाळे म्हणजे,सांबा ला झालेल्या मुसळाचे जे चुर्ण समुद्रात फेकले होते,त्यापासुन लव्हाळ्याच्या रुपात शस्र तयार झाले.त्या वज्रासारख्या लव्हाळ्यांच्या आघाताने शेकडो यादव गतप्राण झाले.उरलेल्या लोकांना कृष्णाने ऊपदेश करुन समजावण्याचा बराच प्रयत्न केला,पण मद्यांध आततायी लोकां नी या दोन भावांनाच शत्रु समजुन त्यांना ठार मारण्यास प्रवृत्त झाले.ब्रम्हपाशाने व श्रीकृष्णाच्या मायाजालाने मोहित झालेले त्या लोहयुक्त लव्हाळ्याने आपपसांत मारामारी करुन,पांच लक्ष यादव,भोज, वृष्णी,अंधक वीर मरण पावले.श्रीकृष्णा ने स्वतःच स्वतःच्या यादव कुळाचा पृथ्वी वरचा भार कमी केला.आणि पृथ्वीला दिलेले वचन पुर्ण केले.


आतां अवतार समाप्तीला कुठलेही अवधान,प्रत्यावय राहिला नाही.भगवान म्हणुन श्रीकृष्ण पृथ्वीच्या वचनातुन मुक्त झाला,पण मानव देहातील कृष्ण अत्यंत उद्गिन्न झाला होता. त्याने त्याचा सारथी दारुकाला बोलावुन,ही घडलेली हकिकत हस्तिनापुरला पांडवांना कळविण्यास सांगीतले.तसेच अर्जुनाने इथे येऊन यादव स्रीया व मुलांना हस्तिनापुरास घेऊन जावे.दारुकाने श्रीकृष्णाला जड मनाने नमस्कार करुन आज्ञेनुसार,आयु ष्यात प्रथमच श्रीकृष्णाविना रिकामा रथ घेऊन हस्तिनापुरच्या मार्गाला लागला.


इकडे श्रीकृष्णाने प्रभासक्षेत्री जिवंत राहिलेल्या यादवांच्या स्रीया,मुले गोळा करुन द्वारकेला पाठवले.बलराम सह तो ही द्वारकेकडे निघाला.पण बलराम शहरांत न जातां जंगलाकडे निघाला,जातांना श्रीकृष्णाला म्हणाला,मी वनांत जाऊन योगबळाने प्राण अवरोध करुन हा लोक सोडणार आहे.जा…दादा जा…मी ही मात्यापित्यांचा निरोप घेऊन तिकडेच येतो व याच पध्दतीने या मानवी देहाचा त्याग करतो.दोघांचेही आपले इथले कार्य पुर्ण झाले आहे.अति वृध्दावस्था व पयारीवश झालेले,अद्यापही जिवंत असलेल्या आपल्या वृध्द मातापिता वासुदेव-देककी महालात जाऊन कृष्णाने दोघांच्याही चरणांवर मस्तक ठेवले.अर्जुना बोलवायला दारुक गेला आहे.तो येई स्तोवर जिवंत राहिलेल्या स्रीया व मुलांचे रक्षण करा.बलरामदादा वनात जाऊन योगबलाने प्राणावरोध करीत आहे.मी ही त्याच मार्गाने जाऊन हा लोक सोडतोय, एवढे बोलुन परत नतमस्तक होऊन,मागे वळुनही न पाहतां तडक वनाच्या दिशेने निघुन गेला.त्यावेळी घरांघरांतुन रडण्या च्या,हुंदक्यांच्या आवाजाने सर्व शहर शोकग्रस्त झाले होते.पण आतां तो या सर्वाच्या पलिकडे गेलेला निश्चल मनाने बलरामाच्या दिशेकडे गेला.बलरामाचे निर्वाण बघुन मनातुन थोडा खिन्न झाला, पण क्षणभरच….


नंतर श्रीकृष्ण भालका तीर्थावरच्या अरण्यात एका अश्वत्थ(पिंपळ) वृक्षा खाली परधामाला जाण्याचा निश्चय आणि गांधारीने दिलेला शाप खरा ठरविण्यासाठी… इंद्रिय,वाणी व मनाला सर्वथा बंध घालुन ब्रम्हासानात डोळे मिटुन शांतपणे बसला असतांना त्याच्याच प्रेरणेने मृगयासाठी हिंडणार्‍या एका जरा नावाच्या व्याध्याने,भिल्लाने दुरुन दिसणार्‍या त्याच्या पायाचा तळवा मृगाचे तोंड समजुन,नेम धरुन मारलेला बाण त्या लालसर नाजुक सुंदर तळव्यात घुसल्या ने रक्त ओघळु लागले.शिकारी जवळ आल्यावर त्याने श्रीकृष्णाला ओळखले. हाय हाय हे काय विपरीत घडले?भगवान भगवान….म्हणुन शोकाकुल होऊन मटकण खालीच बसला.त्याचा विलाप एकुन श्रीकृष्णाने डोळे उघडुन,हसुन म्हणाला,अरे, एकलव्या! अरे यादव हे यादवाच्या हातुनच मरणार हे विधिलिखित आहे.मी यादव व तुही यादव,तू माझा चुलत भाऊ आहेस.देवा! हे कसं बरं शक्य आहे?


श्रीकृष्ण म्हणाला,माझ्या एका चुलत्याला अनेक मुलगे होते.चुलत्याचा एक जिवलग हिरण्यगर्भ नांवाचा निषाद मित्राला जन्मतःच एक मुलगा दिला होता तोच तू…एकलव्य…अचुक बाणाने वेध करणारा म्हणुन द्रोणांनी तुझा अंगठा मागीतल्यावर क्षणाचाही विलंब न लावतां गुरुदक्षिणा म्हणुन देणारा,पण जगाला अज्ञात असणारी पण द्रोणांना व मलाच माहित असलेली गोष्ट म्हणजे तुं बाण सोडतांना अंगठ्याचा उपयोग न करतां चार बोटांनीच बाण मारणारा तो तूं एकलव्य आहेस…,
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *