८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!!   श्रीकृष्ण   !!! भाग – ८.

त्या अरण्यात धेनुक नांवाचा अति बलाढ्य राक्षस गर्दभाचे रुप धारण करुन आपल्या इतर गर्दभ अनुयानांसह फिरत असतो.चुकुन एखादा माणुस गेलाच तर त्याचे नंतर नांवनिशानही कोणाला दिसत नाही.इतकेच काय त्याच्या भितीने पशु पक्षीही राहत नाही.इतके सुंदर अरण्य भयान भकास झाले.बलराम-कृष्णा त्या राक्षस गर्दभास तिथुन हुसकावुन लावले तर ते सुंदर अरण्य आपल्याला खेळाय ला,फिरायला व गाई चारायला मोकळे होईल.यमुनेकाठी असलेल्या तालवनाती ल त्या राक्षस गर्दभाचा समाचार घेण्यास बलराम-कृष्ण निघाले.हे तालवन खरोखरच सुंदर होते,पण निर्मणुष्य व शून्य! कृष्ण म्हणाला!

हे वन आपल्याला क्रीडा खेळण्यास उत्तम आहे असे म्हणुन एक ताडवृक्ष जोराजोरांत हलवायला सुरु वात केल्याबरोबर असंख्य फळे खाली पडल्याने व गोपांच्या बोलण्याच्या आवा जाने त्या भयान निर्जन शांत वनातुन एक माजलेला प्रचंड गर्दभ मोठा आवाज करीत क्रोधाने डोळे विस्फारीत त्याने बलरामाला दंश केला.मागच्या दुगाण्या शस्ररहित बलरामाच्या छातीवर झाडल्या बरोबर बलरामाने त्याच्या तंगड्या धरुन गरगर फिरवत समोरच्या ताडवृक्षावर फेकल्याबरोबर त्या प्रचंड राक्षसाची पाठ कंबर,मान मोडुन धाडदिशी जमीनीवर मरुन पडला.


सगळे गोपसखे बलरामाचा अलौकीक पराक्रम पाहुन मनात समजले की, हे दोघेही बंधु नक्कीच परमात्म्याचे अवतार आहे हे निश्चित!आतां ताडवन कायमचे सुरक्षित झाल्याने गाई निर्वेध चरुं लागल्या. कांही ऋषींनीही आश्रम स्थापन केले.एके दिवशी बलराम कृष्ण यमुनातटीच्या भव्य जुन्या मंडीर वृक्षा खाली खेळत होते. तेवढ्यात प्रलंब नावा चा राक्षस मायावी रुप घेऊन त्यांच्यात मिसळला.

कृष्ण व गोपांचा हरिणक्रीडन नावाचा खेळ सुरु होता. खेळ सुरु असतांना तो मायावी प्रलंब राक्षस बलरामाला पाठीवर घेऊन अरण्यात पळु लागला.बलरामाला धोक्याची जाणीव झाल्याबरोबर रामाने त्याच्या डोक्यावर इतकी जोराने बुक्की मारली की, तो तात्काळ गतप्राण झाला.त्याचा पराक्रम पाहुन त्याला “बलदेव प्रलंबहन” म्हणु लागले.कृष्ण आणि बलरामाच्या एकेक अद्भुत लिला आणि अतुल पराक्रम पाहुन वज्रातील सगळ्यांची खात्री झाली की, हे दोघे मानवरुप घेतलेले देवलोकीचे देवच!


बलराम-कृष्णांनी आपल्या अतुल पराक्रमी सारा वज्रप्रांत,वने,अरण्ये निर्भय केली होती.राम-कृष्ण आपल्या गोपसख्यांसोबत यमुनेच्या किनार्‍याने सभोवतालची शोभा पाहत फिरत होते, गाई चरत होत्या.सर्वजण दमल्याने एका झाडाखाली बसले असतां त्यांना भूकेची तिव्रतेने जाणीव झाली.न्याहारी आधीच खाऊन झाली होती.फळांनी एवढी तिव्र भूक भागणार नव्हती म्हणुन ते कृष्णाला म्हणाले, कृष्णा आता जर अन्न मिळाले तर? कृष्ण हसुन दीर्घ श्वास घेत म्हणाला, दादा! दूर कुठुनतरी षड्रस अन्नाचा सुगंध येत आहे.जवळच आश्रम असुन शरद ऋतुच्या प्रारंभीचे यज्ञ सुरु असावेत.

दोन तीन गोपांना आश्रमाचा शोध घेण्यास पाठवल्यावर खरंच कांही अंतरावर ब्रम्ह वेत्ते यज्ञ करीत असलेले दिसले.गोप त्यांना म्हणाले आम्ही बलराम-कृष्णाच्या आज्ञेने अन्न घेण्यास आलो आहोत.त्यांनी दुर्लक्ष केल्याने गोप ब्राम्हणांच्या स्रीयां कडे जाऊन बलराम कृष्णासह आम्ही भूकेने व्याकुळ झालोत,इथुन वृंदावनही लांब आहे.वृंदावनातील नंदाचा मुलगा श्रीकृष्णाने तुम्हाला पाठविले?हर्षित होऊन त्या स्रीयांनी विविध सुग्रास अन्न पदार्थ भांड्यात भरुन, त्यांच्या पतींनी मनाई केल्यावरही कृष्णदर्शनार्थ,उत्सुक तेने व लगबगीने गोपांसह निघाल्यात.


अनुपम सौंदर्य,पिवळा पितांबर, कमरेला शेला,काळ्याभोर कुरळे केसांची झुलपे,कानात कुंडले,मस्तकी मोरपिसां चा मुकुट,गळ्यात कमळफुलांची लांब लचक माळा,हातात बासरी व त्याच्या भोवती अस्पष्ट प्रकाशवलय अशा रुपात कृष्णाला पाहुन त्या स्रीयांच्या मनांत भक्तीची लाट उसळली.श्रीकृष्णा! तुझ्या दर्शनाने आम्ही कृतार्थ झालोत.आतां आम्ही आश्रमात न जाता तुझे नित्य दर्शन घडावे म्हणुन तुझ्यासवे वृंदावनी येतो.सतींनो! या जन्मीचे कर्तव्यकर्म तुम्हाला केलेच पाहिजे.स्वकर्माची फळे भोगलीच पाहिजे.निरंतर माझ्याठीकाणी चित्त ठेवा.या जन्मानंतर तुम्ही माझ्या रुपात मिळुन जाल.बलराम-कृष्णाला वाकुन नमस्कार करुन जड अंतःकरणाने त्या आश्रमाकडे निघाल्या.ऋषिभार्या गेल्यावर सर्वजण भक्तीभावाने अन्नावर तुटुन पडले.
क्रमशः
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *