२१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २१.

मथुराशहराभोवती मजबुत कोट असुन,भोवती रुंद खोल खंदक असल्या मुळे शहर अगदी सुरक्षित,शिवाय अन्न धान्य व इतर जिवनावश्यक वस्तुंचा भरपुर साठा होता.शत्रुकडील वीर खंदक ओलांडुन तटावर चढत आहेसे पाहुन यादववीर निकराचा प्रतिकार करुं लागले भयंकर रणकंदन माजले.याप्रमाणे २७ दिवस हे घनघोर युध्द अव्याहत चालले. अठ्ठाविसाव्या दिवशी बलरामच्या नेतृत्वा खाली शिनि,अनावृष्टी,बभु,वगैरे यादव वीर आपल्या अर्ध्या सैनिकासह दक्षिण दरवाज्याबाहेर पडुन मगधसैन्यावर तुटुन पडले.तेथे स्वतः जरासंध,चेदिपती,शाल्व शल्य असे अनेक उत्तरेकडील शूर राजे होते.त्यांची व यादववीरांची भयंकर लढाई जुंपली.जरासंधाकडे असलेल्या अत्यंत बलाढ्य मल्ल हंस व डिंभकापैकी डिंभकाची व बलरामाची लढाई सुरु झाली. अखेर थकलेल्या डिंभकाला उचलुन जोराने आपटल्याने तो बेशुध्द होऊन निचेष्ट झाला.जो अजेय अवध्य डिंभक बलरामाकडुन मारल्या गेले असे वाटुन हंसाने दुःखाने व संतापाने यमुनेत उडी टाकुन आत्महत्या केल्याचे ऐकुन डिंभंक शुध्दीवर आल्यावर त्यानेही यमुने त उडी टाकुन त्यानेही जलसमाधी घेतली त्यामुळे जरासंधाचा जोर कमी झाला.


इकडे श्रीकृष्ण उरलेले अर्धे सैन्य घेऊन पश्चिम दरवाजाबाहेर पडुन समोर भिष्मक,रुक्मी,देवक इत्यादी दाक्षिणात्य राजांबरोबर न भूतो न भविष्यती असे भयंकर युध्द झाले.प्रचंड रणकंदन होऊन रक्ताच्या नद्या,प्रेतांचे ढीग पडले,जणुं पृथ्वीचा अंत होतो की काय असे वाटुं लागले.श्रीकृष्णाने नवीनच संपादन केलेल्या धनुर्विद्येने विलक्षण पराक्रम करुन रुक्मीला व इतर पराक्रमी वीरांना अशक्षरशः पळायला लावले.दोन्ही दिशां च्या रथी महारथींचा राम-कृष्णाने पराभव करुन यादववीर विजयाचा सिंहनाद करीत मथुरेत परतले.विजयाची आशा सोडुन उरलेले सैन्य व इतर राज्यांसह मगध देशाकडे पलायन केले.तब्बल २८ दिवस युध्द करुन मथुरा जरी मुक्त झाली तरी यादववीर गाफील राहिले नाहीत, कारण जरासंध परत चाल करुन येईल याबद्दल शंका नव्हती,त्यामुळे तुटफुट झालेल्या कोटाची व खंदकाची दुरीस्ती व धनधान्याचा मुबलक पुरवठा करुन ठेवुं लागले.यादवांनी कल्पना केल्याप्रमाणे थोड्याच दिवसांत जरासंधाने तयारी करुन मथुरेवर पुन्हा चालुन आला,पण यावेळी जरासंधा जवळ अगणित सैन्य व अनेक राजे अनुकुल होते,त्यामानाने याद वांची संख्या कमी असुन बाहेरील कोणाचीही मदत मिळण्याची शक्यता नसल्यामुळे मथुरेतील जनता व यादव थोडे घाबरले,

पण त्यांचा कृष्णावर दृढ विश्वास होता.तरी पुर्वी कंस बलिष्ठ असल्यामुळे,त्याच्या कारर्दीत मथुरेच्या संरक्षणाची विशेष तजविज केलेली नव्हती.नुकत्याच झालेल्या युध्दामुळे, ढासळलेली तटबंदी अजुन पुर्ण दुरुस्त झालेली नव्हती.खंदकातील पाणी स्वच्छ व्हायचे होते.हत्यारे निकामी झालेली, अशा परिस्थितीत यावेळी जरासंध अफाट सैन्यानिशी येत असल्यामुळे, मथुरेला एक दिवस देखील वेढा सहन करण्याचे त्राण उरले नाही.बाल्यावस्थेत असलेल्या व नवीन उदयास येत असले ल्या राष्र्टाचा व जनतेचा सर्वस्व नाश होईल, तेव्हा हे केशवा! तू आमचा नायक व रक्षणर्ता आहेस.तुझ्या सांगण्यानुसार आम्ही वागण्यास तयार आहोत.विकद्रु नावाच्या जेष्ठ व श्रेष्ठ सरदाराने सद्यस्थिती समोर ठेवल्यावर,वसुदेवांनी सुध्दा समर्थन केल्यावर,गंभीरपणे पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणाला,राज धर्मानुसार राजाने संधी,विग्रह,यान,आसन,दुही व आश्रय या गोष्टींचा विचार करुन दुर्बलाने बलवंता चे सानिध्य टाळावे.प्रतिकुल काळ आल्यावर पलायनाचा मार्ग अवलंबवावा. जरासंधाचे शत्रुत्व फक्त माझेशी आहे, मी समर्थ असुनही सर्वांचे हित लक्षात घेता, नितीस अवसरुन बलरामदादासह मी सह्याद्रीने युक्त असलेल्या शोभिवंत दक्षिण प्रदेशात जाऊ,त्यामुळे अनायसे करवीर व क्रौंच नगर व गोमंतक या श्रेष्ठ पर्वताचे दर्शनही होईल.


आम्ही मथुरेत नसल्याचे समजतांच, जयाच्या मदाने चढलेला जरासंध इथे न येता निश्चितच आमच्या पाठलागावर शोधत सह्यांद्रीवना पर्यत येईल,त्यामुळे मथुरा सुरक्षित राहिल.जरासंधाचा रोष माझेवर असल्याने मीच इथुन जाणे उचित ठरेल.विकद्रु म्हणाला,यदुला नाग कन्येपासुन झालेली- मुचुकुंद,पद्मवर्ण, सारस व हरित या चार पुत्रांनी विंध्याद्री च्या दक्षिणेस चार राज्य स्थापन केलीत, त्यांच्या आश्रयाने कांही दिवस तूं राहु शकतोस.मुचुकुंदाने ऋक्षवाण पर्वताच्या आश्रयाने महिष्मती व पुरिका अशी दोन शहरे वसविली.सह्यांद्रीच्या पठरावर वेणा नदीकाठी “करवी” नावाचे नगर पद्मवर्णा ने बसविलेल्या नगरास पद्मावत नांवाने ओळखल्या जाते.सारसने क्रौंचपूर नगर दक्षिणेच्या वनांत वसविलेल्या शहरास वनवासी असे म्हणतात.हरितने समुद्र किनार्‍यावर राज्य स्थापन केले.तेथील कोळी समुद्रातुन मोती,शंख,प्रवाळ रत्ने आणुन देतात.या देशाला रत्नदीप म्हणतात.ही चार यादव राज्ये दक्षिणेस नांदत आहे.विकद्रु व वसुदेवाच्या सल्ल्या नुसार बलराम कृष्ण दक्षिणेकडे निघालेत

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *