श्री राम जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

SHRIRAM JANMACHE ABHANG

राम जन्माचे अभंग
अभंग संख्या अभंग संख्या : ९
१ कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा
२ राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं
३ येतसे दशरथ सुमित्रामंदिरी
४ दशरथ राजा उठिला तेथूनी
५ न बोलेचि कांहीं इसीं काय झालें
६ रावणे हें केलें लग्नामाजी विघ्न
७ परब्रम्ह पूर्ण आलें माझे घरीं
८ विरंचीचा बाप क्षीरसागरवासी
९ उत्तम हा चैत्रमास
राम जन्माचे अभंग प्रारंभ

कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा
कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥
धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावें । त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥
ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकयी सदनासी जाता झाला ॥३॥
मंचकी बैसली होती ते पापिणी । देखतां नयनीं पहुडली ॥४॥
सुंदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं
राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसी सांग आतां ॥१॥
येरी म्हणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्यपट ॥२॥
ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचारा त्याचा आम्हां ॥३॥
जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहु ॥४॥
माझिये मस्तकी ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश काहीं नाहीं ॥५॥
निंदितील जन मज वाटे सुख । ऐकतांची दु :ख राया झालें ॥६॥
वृश्र्चिकाचें पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥
ऐसी व्यथा होय नामा म्हणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथोनियां ॥८॥

येतसे दशरथ सुमित्रामंदिरी
येतसे दशरथ सुमित्रामंदिरी । देखतां सामोरी येती झाली ॥१॥
न माये आनंद तियेचें मानसीं । ठेवी मस्तकासी चरणावरी ॥२॥
घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगी लेपन तीर्थोदकें ॥३॥
गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥
कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥
होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशी पतिव्रते ॥६॥
प्राणनाथ ऐसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥
आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥
ऐकतांचिअ ऐसें कांतेचें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥
घेऊनियां हातीं रत्‍नांचें भूषण । टाकी ओवाळून नामा म्हणे ॥१०॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

दशरथ राजा उठिला तेथूनी
दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्येसदनीं जाता झाला ॥१॥
पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ॥२॥
तुझिये मानसी होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपासी ॥३॥
उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें उरी देहभावा ॥४॥
सदा समाधिस्थ रामरुप झाली । कौसल्या माऊली नामा म्हणे ॥५॥

न बोलेचि कांहीं इसीं काय झालें
न बोलेचि कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्र्चयेसी ॥१॥
माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । म्हणोनियां विघ्न ओढवले ॥२॥
निवारी हें विघ्न वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शने ॥३॥
तुझा मी किंकर आजि अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥
नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥
राजा म्हणे कां हो ऐसी अवस्था । कां हो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥
विश्‍वाचा मी आत्मा स्वयें असे राम । मजमाजीं भ्रम कैचा असे ॥७॥
अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणॆ ॥८॥

रावणे हें केलें लग्नामाजी विघ्न
रावणे हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुजलागी ॥१॥
आणि रे धनुष्य मारीन रावणा । लंका बिभीषण देईन मी ॥२॥
अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥
टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४॥
लंकेपुढे मोठे माजवीन रण । तोडीन बंधन सुरवराचें ॥५॥
विश्‍वामित्र याग नेईन मी सिद्धि । मारीन कुबुद्धि दोघा जणा ॥६॥
खर दुषणाचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७॥
ध्याती मज त्यासी बहुत आवडी । न विसम्बे घडी त्यासी एक ॥८॥
बोलीला वाल्मिक तैसेंचि करीन । वर्तोनि दावीन नामा म्हणे ॥९॥

परब्रम्ह पूर्ण आलें माझे घरीं
परब्रम्ह पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपाचिया ॥१॥
करीती बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२॥
येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्टभाव ॥३॥
राजा म्हणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥
श्रावणवधाचें अध नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारब्धासी ॥५॥
ऐकतांचि हासे सावध होऊनि । बोलतसे झणी नामा म्हणे ॥६॥

विरंचीचा बाप क्षीरसागरवासी
विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥
पुरेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येंचे उदरीं तोचि असे ॥२॥
बोलियेंलें जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांही ॥३॥
माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मी कांता लक्षुमीचा ॥४॥
धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठनायक पाहतील ॥५॥
धन्य पशुपक्षी श्‍वापदें तरुवर । राजा रघुवीर पाहतील ॥६॥
त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नामयाच्या बापा पाहशील ॥७॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

उत्तम हा चैत्रमास
उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ॥१॥
शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥
मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥
धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणि ॥४॥
सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥
नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥
अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥
(वरील चरण म्हणून दुपारी १२ वाजता प्रभू रामचंद्र भगवान कि जय म्हणून फोटोवर गुलाल व पुष्पवृष्टी करावी )
नामा म्हणे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥

खालील अभंग म्हणावा राम जन्मानंतर म्हणावा.

झाले रामराज्य काय उणे आम्हासी
झाले रामराज्य काय उणे आम्हासी । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥१॥
राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये । दळिता कांडिता जेविता गे बाइये ॥ ध्रु ॥
स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा । नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा ॥२॥
तुका म्हणे रामे सुख दिले आपुले । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ॥३॥

श्रीराम आरती
उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।।

जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। २ ।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।। ३ ।।

अनाहतध्वनि गर्जती अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ४ ।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर । सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदास स्वामी आठव ना विसर ।। ५ ।।

नैवेद्याला सुंठवडा (सुंठीची आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading