जोगवा भारुड -अनादि निर्गुण प्रगटली भवानी… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

जोगवा भारुड प्रारंभ

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी । त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा । धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग । कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला । एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

जोगवा भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *