४६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४६.

शेवटच्या क्षणी दुर्योधनाने पांडवांचा नाश करण्याची प्रगट केलेली इच्छा पुर्ण करणे भाग आहे,पण कशी?उपाय कोणता?अगदी पतंगासारखी अग्नित उडी तर घेतली पण पुढे काय? अशा कशमशमधे असतांनाच एक भयंकर घुबड त्या विस्तिर्ण झाडावर निद्रिस्त शांत पणे झोपले असलेल्या कावळ्यांच्या माना कुरतडुन रक्तप्राशन करणार्‍या घुबडांची भयानक कृति पाहुन अश्वत्थामा च्या डोक्यात एकाएकी एक भयानक विचार त्याच्या मनी आला…यावेळी विजयाच्या धुंदीने पांडव,पांचाल गाढ झोपले असतील,अशावेळी त्या घुबडा प्रमाणे त्यांच्या शिबिरात घुसुन,पांडव,व पांचालाच्या माना मुरगाळयच्या.झाले.. ठरले… या विचाराने उत्तेजित होऊन, झोपलेल्या आपला मामा कृपाचार्य व कृतवर्माला उठवुन आपला बेत सांगीतला स्तब्ध झालेल्या कृपाचार्यांनी त्याला या बेतापासुन परावृत्त करण्याचा खुप प्रयत्न केला,पण! सूडाने पेटलेला अश्वत्थामा कांहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता

.
नुकताच अभिषेक झालेल्या सेना पतीची आज्ञा मानने भाग होते.निरुपाया ने निद्रिस्त पांडवांचा वध करण्यासाठी त्यांच्या शिबिराकडे निघाले.द्युष्टद्युम्न, बायका,नोकरांना ठार करुन दुसर्‍या छावनीतील पांडवांच्या पांच पुत्रांना ठार करुन, चुकुन कुणी वाचु नये म्हणुन कृपाने छावणीला आग लावुन तिघेही पहाटेच्या सुमारास निघुन गेले.दुर्योधनाने इच्छा शक्तीच्या बळावर प्राण धरुन,शेवटची घटका मोजत असलेल्या दुर्योधनाला छावणीत घुसुन द्यृष्टद्युम्न,पांचाल,द्रौपदी पुत्र कुणालाही शिल्लक ठेवले नाही ही वार्ता त्याला दिली.आतां फक्त पांडवांकडचे सात-पांच पांडव,कृष्ण, व सात्यकी व तुझ्या पक्षाचे आम्ही तिघेच उरलोत.ही वार्ता ऐकुन उत्तेजित झालेला दुर्योधन थोडा शुध्दीत येऊन क्षीण स्वरांत म्हणाला,जे काम भीष्म,कर्ण,तुझे पिता द्रोण करुं शकले नाही ते तूं करुन दाखविलेस,मी कृतकृत्य झालो,असे म्हणुन दुर्योधनाने अंतिम श्वास घेतला.


या हत्याकांडातुन निसटलेल्या द्यृष्टद्युम्नाचा सारथ्याने पहाटे नदीकिनारी जाऊन पांडवांना ही वार्ता सांगीतल्यावर, धर्मराज मुर्च्छित पडला.थोड्यावेळाने सावध झालेल्या अत्यंत शोकमग्न,उद्गिग्न युधिष्ठीर म्हणाला, आपण विजय मिळवुनही आपला पराभवच झाला, आपण कसातरी शोक आवरु, पण साध्वी द्रौपदी हे दुःख कसे सहन करील? तिचे वृध्द पिता,भाऊ,लाडके पुत्र या सार्‍यांचा अमानुष रितीने झालेला वध ऐकुन,शोकाने तिची किती दारुण अवस्था होईल?
तेवढ्यात हस्तिनापुरहुन श्रीकृष्ण येऊन पोहोचला.रात्रीचे हत्याकांड कळल्यावर म्हणाला,धर्मा! कालगती कुणीही अडवु शकत नाही.सगळे शिबिरा कडे गेले.सगळ्यांचे छिन्नभिन्न मृतदेह पाहुन पांडवांना दुःखावेग अनावर झाला.


रात्रीचा घोर संहार ऐकुन आधीच घायाळ असलेली द्रौपदी,प्रत्यक्ष आपल्या पुत्रांचा झालेले हत्याकांड पाहुन ती उन्मळुन पडली.अत्यंत शोकाकुल,विव्हल झाली. पण लगेच विलक्षण कठोर त्वेषयुक्त स्वरांत म्हणाली,ज्या अश्वत्थामाने झोपेत बेसा वध असलेल्यांचा वध केला,त्या दुष्ट अधम अश्वत्थामाचा व त्याच्या साथीदारांचा आजच्या आज प्राण घेतला नाही तर, मी अन्न पाणी त्यागुन आत्मदहन करेन. तिचा आवेश पाहुन धर्मराज मृदु समजावत म्हणाले,कल्याणी शोक आवर!त्याचे मवाळ धोरण पाहुन चवताळुन तिने भीमा ला ही कामगिरी सांगीतल्यावर,त्याचा वध करुन मस्तकावरचा मणी तुला आणुन देतो असे म्हणुन भीम लगेच धनुष्यबाण व आयुधे घेऊन निघाल्यावर श्रीकृष्णासह चारही बंधु रथारुढ होऊन भीमाच्या पाठोपाठ निघाले.

अश्वत्थामा व्यासांच्या आश्रमात गेल्याचे कळल्यावर सारे तिथे पोहोचले.भीमाच्या दृष्टीस तो पडताच त्याच्या अंगावर धावुन गेल्या बरोबर भितीने घाबरुन अश्वत्थामाने ब्रम्ह शिरस अस्र,जे फक्त आणीबाणीच्यावेळी सोडायचे असते, ते अभिमंत्रित करुन सर्व पांडवांचा नाश व्होवो म्हणुन सोडल्या वर,कृष्णाने प्रतिकारात्मक ब्रम्हास्र सोडायला अर्जुनाला आज्ञा केली.दोन्ही अस्रे ऐकमेकांवर आपटुन अग्निज्वाला भयंकर आवाजात निघु लागल्याने समाधिस्त व्यास सजग होऊन, ते अस्र अश्वत्थामाला माघारी घ्यायला सागुन म्हणाले,नाहीतर बारा वर्षे दुष्काळ पडेल, पण अश्वत्थामाला माघारी घेणे माहित नसल्यामुळे त्याने ते अस्र अभिमन्यु पत्नी उत्तरेच्या गर्भावर सोडले.हे पाहुन खवळलेल्या अर्जुनाने त्याच्या मस्तकावरचा मणी काढुन घेतला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *