भारुड जागल्या “रात्रंदिवस घोकितो तुम्ही” वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भारुडे भारुड -जागल्या – रात्रंदिवस घोकितो तुम्ही …

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा ।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा ।
उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥

उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप ।
हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥

तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी ।
तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥
हिंडता देशांतरी चौर्‍याऎंशी जग ।
अजून सापडला नाही नीट सुमार्ग ।
कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥


जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा ।
त्याच्या आधारे बोलेन घडाघडा ।
एका जनार्दनी घरा बळकट मेढा ।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥

संत एकनाथ महाराज म्हणतात मी रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचे काम करतो, जसा एखादा विद्यार्थी आपला अभ्यास सतत घोकत असतो, तसा मी तुम्हाला सावध करण्याचा अभ्यास रात्रंदिवस घोकत असतो.

तुम्ही या नगरीला अर्थात या देहरूपी नगरला आपलं म्हणता, पण तुमच्या नगरीचा अर्थात देहाचा कोणताही भरवसा नाही,

उजेड पडताना म्हणजे जेव्हा आयुष्य संपून जाईल तेव्हा नक्की जीवाच्या गळ्याला जन्ममरणाचा फास पडेल, म्हणून हे माझ्या मायबापांनो तुम्ही उठा,
तुम्हाला कशी झोप लागली
अज्ञानाची झोप तुम्हाला कशी लागली,,,,

तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण जा, आणि जन्ममरणाची तुमची खेप हे ही नक्की चुकवा

माझ्या पाहण्यात आले की तुमच्या या नगरीची अर्थात या मानवी देहामध्ये तुमचे नांदणूक काय बरं नाही,

तुम्ही नको त्या स्त्रियांच्या मागे लागला दोन लोभिष्ट नारी तुमच्याजवळ आहेत अर्थात ” कुबुद्धी आणी वासना ” त्यांच्या योगाने तुम्हाला भारी दुःख भोगावे लागत आहे

चौर्‍यांशी लक्ष योनी मध्ये फिरत असताना तुमच्या या देहरूपी प्रत्येक नगरामध्ये प्रचंड दुःख तुम्हाला भोगाव लागल, पण अजूनही तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडला नाही,

खरं सांगा एवढ्या चौर्‍यांशी लक्ष योनी मध्ये नाना प्रकारचे देह बघून वा भोगून किंवा नाना प्रकारच्या भोग भोगून तुम्ही कोणत हित केल

माझ्या बाबांनो मला सांगा,
अजून खरं सांगू ! तुमचा जुना कर्मरूपी ठेवा आहे तो पूर्जा आहे, तो कचरा आहे, त्याला बाजूला काढा खरंच मी त्याच्या आधाराने तुम्हाला बोलतोय की तुम्ही एकदा आपले उद्दिष्ट पूर्ण करा,

एखादा शेतकरी खळ्यामध्ये मेढ तयार करतो आणि सगळे बैल तिच्याभोवती फिरतात तसा तुम्ही भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणात मध्ये जागा द्या अर्थात ती ईश्वर रुपीमेढ अंतकरणात तयार करा, म्हणजे तुम्हाला जन्म मनातून मुक्त केले जाईल.

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा ।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा ।
उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥

उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप ।
हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥

तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी ।
तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥
हिंडता देशांतरी चौर्‍याऎंशी जग ।
अजून सापडला नाही नीट सुमार्ग ।
कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥

जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा ।
त्याच्या आधारे बोलेन घडाघडा ।
एका जनार्दनी घरा बळकट मेढा ।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥

-:शब्दांकन :-
दिनांक 9 डिसेंबर 2022
धनंजय महाराज मोरे (B.A./D.I.T./Android Developer)
{संस्थापक अध्यक्ष :- वारकरी रोजनिशी}
9422938199
Email :- more.dd819@gmail.com
वेबसाईट www.warkarirojnishi.in
WARKARI-ROJNISHI

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *