५० भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ५०
.

सुभद्रेची इच्छा जाणुन प्रसन्नपणे श्रीकृष्ण म्हणाला, सुभद्रे,भगिनी!अभिम न्युची इच्छा मी नक्की पुर्ण करीन,तसेच घडेल.उत्तरे! तुझा हा पुत्र पृथ्वीचे पालन करणारा,कुरुवंशाला लागलेला सगळा कलंक नष्ट करुन कुरुवंश ऊज्वल करेल. योग्यवेळी ही जबाबदारी मी घेईनच!
गहिवरुन कुंती म्हणाली,कृष्णा तुझ्या आमच्या पहिल्या भेटीपासुन, आमचा त्राता,संरक्षक,हितकर्ता झालास. भावनाचे भरते येऊन कुंती स्तब्ध झाली. श्रीकृष्णाने तिला वंदन करुन म्हटले, आत्या! “जिकडे धर्म तिकडे कृष्ण ” हे त्रिवार सत्य आहे. आतां मला जाण्याची अनुमती द्यावी….


श्रीकृष्ण,बलराम,यादवांसह प्रसन्न मनाने द्वारकेस परतले.हस्तिनापुरातील सर्व कार्य उरकले होते.पृथ्वीवर सगळी कडे धर्माचे राज्य सुरु होते.अश्वमेध यज्ञा नंतर युधिष्ठीराने ३६ वर्षे तर कांहीच्या मते २९ वर्षे राज्य केले.या कालावधीत श्रीकृष्णाने आपला वेळ योग-साधनेतच व्यतित केला.कोणी शत्रु उरला नव्हता. नित्याचा कारभार,नवीन पिढीकडे सुपुर्द करुन सांसरिक,राजकीय व इतर बाबींतुन तो निवृत्त झाला.
ज्ञानार्थी,अथार्थी,ब्राम्हण याचक नेहमीच त्याच्याकडे येत असे.त्यांच्या पालन

पोषणाचा भार मात्र त्याने स्वतः कडेच ठेवला होता,म्हणुनच त्याला ‘ब्रम्हण्यदेव’ व गोब्राम्हण्य हितकर्ता म्हणुन संबोधीत असत.श्रीकृष्णाचे नित्य दर्शन घडावे,त्याचे उपदेशामृत कानी पडावे म्हणुन कित्येक ऋषी द्वारकेतच आश्रम बांधुन राहत होते.ब्राम्हणांचा परा मर्श,गाईंचे संरक्षण,गोधन वृध्दींगत,ऋषी मुनींचा यथायोग्य परामर्श घेत,ज्ञान- परमार्थ वेदान्तावरील चर्चा अश्या कार्यात मग्न राहुन गृहस्थाश्रमातुन संपुर्ण लक्ष काढुन पुत्र-पौत्रांचा सोहळा पाहत सहजतेने तो आयुष्य जगत होता.


ज्या कार्यासाठी त्याने (विष्णुने) भूलोकी अवतार घेतला होता ते कार्य त्याने भारतीय युध्द करवुन व पृथ्वीने विनंती केल्यानुसार,मानवदेही अवतार घेऊन पृथ्वीचा भार हलका केला. भारतीय युध्दात एकुन सहासष्ट कोटी, एक लक्ष,वीस हजार लोकं कामी आले होते.अधर्माचा नाश करुन परत धर्म स्थापन केला.त्याच बरोबर नरदेह धारण केलेल्या परमात्म्याने बालपणापासुन वृधत्व येईपर्यत मानवाने आदर्श जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण घालुन दिले होते.
एक दिवस श्रीकृष्णाचा सखा,व चुलत भाऊ उध्वव,श्रीकृष्णास भेटावया स गेला असतां तिथे नेहमीप्रमाणे कांही ऋषीमुनी बसलेले होतेच.त्याला पाहुन प्रसन्न मुद्रेने त्याचे स्वागत केले.त्यांना सांगत असलेला वेदांतपर उपदेशअमृत

एका बाजुने बसुन कानात साठवु लागला ऋषीमुनी निघुन गेल्यावर दोघे बराच वेळ बोलत बसले.बोलतां बोलतां श्रीकृष्ण म्हणाला,उध्दवा! आतां या भूलोकीवरचा माझा अवतार लवकरच संपणार आहे. ज्या कार्यासाठी मी मानवातार घेतला होता,ते कार्य,पृथ्वीवरचा भार भारतीय युध्द घडवुन हलका केला,पण दुसरा याद वांचा भार वाढला आहे.अरे! हे देवांश धारी यादश माझ्या प्रभावाने वैभवाच्या शिखरावर पोहोचले असुन त्यांचा नाश कोणत्याही शत्रुकडुन शक्य नाही.पण अमाप वैभवामुळे ते उन्मत्त झाले. ऋषी, ब्राम्हणांविषयी आदर उरलेला नाही. सध्या यादवात ब्राम्हद्वेष,मद्यप्रिती हे दोन दुर्गुन शिरल्यामुळे त्यांचा अंतकाळ आता जवळ आला आहे.


म्हणजे आतां तूं स्वतःच भरभराटी स आणलेल्या कुळाचा नाश करुन निज धामी जाण्याची तयारी चालवली आहे तर,तेवढ्यात घाबरलेले सांब,,प्रद्युम्न इतर बंधुसह येऊन घडलेली घटना सांगु लागले. प्रद्युम्न म्हणाला,नारद,व दुर्वास ऋषी शिष्यासह आपल्या दर्शनार्थ येत असतां,सांबाच्या मित्रांनी त्याला स्रीवेश दिला.सांबाने दुर्वासऋषींना नमस्कार करुन विचारले मी गर्ववती असुन मला पुत्र होईल की कन्या?कोपिष्ट दुर्वासऋषी म्हणाले,भगवान श्रीकृष्णाच्या या अवलक्षणी पुत्र सांबाला उद्या मुसळ होऊन सर्व यादवांचा नाश करील.आणि.. रागाने तरातरा निघुन गेले.गंभीरपणे कृष्ण म्हणाला,आतां भोगा आपल्या कर्माची फळं!मी कांहीही करुं शकत नाही.ते सगळे निघुन गेले,पण जातां जातां प्रद्युम्न सांबाला म्हणाला दुर्वासांकडे जाऊन उःशापाची क्षमायाचना तरी करुन पाहु या.ते गेल्यावर कृष्ण म्हणाला हे क्रमप्राप्तच होते.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *