१४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १४.


या सर्वांमधे राधा मात्र कृष्णाला दिसत नव्हती,त्याची नजर भिरभिरत होती.आणि तो गतस्मृतीत लुप्त झाला. एके दिवशी मधुवनात त्याची प्रिय सखी राधाने सर्व सवंगड्यामधुन खेचतच बाजु ला एका वृक्षाखाली आणले.तीला कांही भेटवस्तु कृष्णाला द्यायची होती.तिने वस्राच्या ओच्यात लपवुन आणली होती. ती आज अगदीच वेगळी अपूर्व अपार तेजाने लखलखत होती,वेगळीच दिसत होती.कृष्णाने तिला कारण विचारल्यावर क्षणैक लाजली.मनमोहना !आज मी तुला अपूर्व भेट देणार आहे असे म्हणुन ओच्यात जपुन आणलेली भेट बाहेर काढुन त्याच्या समोर धरली.इवल्या इवल्या हिरव्याकंच पानांच्या रानवेलीचा एक मुकुट होता.त्यात खोचलेलं मोरपीस खुलून दिसत होते.तो मोरपीसधारी मुकुट डोळे विस्फारुन बघतच राहिला आणि हसुन तो मुकुट मस्तकी धारण केला.

कधी नव्हे तो तिचे डोळे पाणथरुन आले.भावमुग्धतेने तीनं त्याच्या पुष्ट, मजबुत खांद्यावर अलगद मान टेकवली. तिच्या मुग्ध अलौकिक रुपाकडे तो भान हरपुन एकटक बघतच राहिला.त्याला पहिली भेट आठवली. त्या सायंकाळी वनांतुन गोधन घेऊन घराकडे परतत असतांना मुरलीतुन निघत असलेल्या सूरात तन्मय,तल्लीन असतांना एक तरुण,सशक्त,गोरीपान,अरागस,त्याच्या पेक्षा वयाने मोठी,उंच रेखीव,अप्रतिम सुंदर,अंगभर ओढणीचा पदर घेतलेली एका गोप स्रीने धावत येऊन त्याचे हात गपकन धरले.त्याची मुरली एकदम थांबली.ती म्हणाली,किती सैरभैर करतोस रे ही मुरली वाजवुन कन्हैया!हातातील मुरली तशीच धरुन तो स्तब्ध झाला सवंगड्यात नसल्यासारखा!

तिच्या त्या पहिल्याच स्पर्शात काय नव्हते?त्याच्या दोन्ही आयांची माया,छोटी भगिनी एकानंगेची निरागसता,असे शब्दा त कधीच न सांगतां येणारे भाव होते. त्याला कळून चुकले की, ही या देहाचाच एक अवयव आहे.त्याची वासनारहित प्रिया,निरपेक्ष सखी म्हणुन आज त्याची गोपदीक्षा झाली होती.सर्व नात्यांपलिकड ची ‘स्री’ निसर्गसत्य आहे याची जाणीव झाली.घरी आल्यावर नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे दिवसभरात घडलेल्या घटना यशोदामातेला सांगतांना त्याने राधेचा पण उल्लेख केल्यावर यशोदा म्हणाली, अरे! ही रायाण गोपाची ज्याला अनय सुध्दा म्हणतात त्याची पत्नी राधा.ती अरिष्र्टग्रामातुन सासुरवाशीन म्हणुन गोकुळात आलेली आहे.पण जरा जपुन, तिचा पती रायाण फार तापट स्वभावाचा आहे हं!कधी कधी रायाण बेभान होऊन कृष्णाच्या कागाळ्या घेऊन नंदवाड्यात येऊन म्हणायचा, या तुमच्या कान्हाने माझी पत्नी राधाला फितवले,नादी लावले.मग त्याची समजुत काढली की, तो मग मुकाट चडफडत निघुन जाई.

तिच्या मुग्धपणे लाजण्याचे कारण त्याला कळले.ती आज पहिल्यांदाच ऋतु स्नान झाली होती.खर्‍याखुर्‍या ‘स्रीधर्मात’ गेली होती.आणि आजच तिने दिलेला मोरपीसधारी मुकुट स्विकारुन तिच्या साक्षीने पुर्ण विचारपुर्वक मस्तकी धारण केला होता.का? ते मोरपीस होतं एका निरामय शास्वताचं,समस्त स्रीत्वाच्या निर्माणशील अशा परम पवित्र मंगलतेचं नाजुक प्रतिक होते. त्याने पुर्ण विचारांती जाणीवपूर्वक जीवनारंभी स्वच्छपणे मस्तकी धारण केलं होतं.राधा त्याची पहिली स्री गुरु,स्रीत्वाच्या सर्व भावभाव नांची दीक्षा देणारी,तरीही अबोध,कधी खुप बोलुन,तर कधी मूक राहुन,कधी धावत्या स्पर्शानं,तर कधी भावउधळ्या कक्षातुन ही दीक्षा त्याला दिली.वासना रहित,भावभारित,अतुल प्रेमयोगाची, मधुरा भक्तीची त्याची प्रिय सखी, पहिली स्रीगुरु म्हणजेच राधा. राधा.. कृष्णाच्या जीवनातील केवळ अजोड जोड होती.

वृंदावनाचा निरोप म्हणजे राधा कृष्णाच्या प्रेमाची अतुलनीय विशुध्द भावप्रेमाचा निरोप होता.तो खेचल्या सारखा राधेसमोर उभा राहुन तिने भेट दिलेली छातीवरची वैजयंतीमाला दाखवुन म्हणाला,तू दिलेली ही तुझी भाव भेट सदैव माझ्या छातीशीच राहील.तिचा विसर कधीच पडणार नाही..कधीच नाही आणि कृष्णाने आपली अनमोल प्राण प्रिय बासरी भेट दिली आणि अक्रुराला रथ आणण्याचा इशारा केला.आणि अक्रुराने चालु केलेल्या रथात बलराम कृष्ण बसले.थांब अक्रुरा,..!जरा आम्हा ला कृष्णाचे मुख अवलोकन करु दे रे… त्याच्या पायावर मस्तक ठेवु देरे…त्याचे मधुर शब्द ऐकु दे रे…अक्रुरा अरे थांब रे.. अक्रुरा थांबव की रे रथ…गोपी दुःखार्त उद्गारत रथामागे धावु लागल्या.आमचा प्राण,आमचा कृष्ण या दुष्ट अक्रुराने हिरावुन घेतला.कित्येक गोपी मुर्च्छित झाल्या.जड अंतःकरणाने रथात बसलेला श्रीकृष्ण वेगाने पुढे पुढे जात दिसेनासा झाला.आणि अक्रुर? श्रीकृष्णावरचे अलोट प्रेम पाहुन भक्तीभावाने विभोर झाला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *