हमामा अभंग -हमामा पोरा हमामा… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

हमामा अभंग प्रारंभ

हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥धृ॥
घुमरिचा नाद कानीं । घुमरी घालूं रानीं ।
रानीं सीतल छाया । मेली तुझी माया ।
मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरीरे पोरा ॥१॥

उरी नाहीं तुज । मजसी मांडिले जुंझ ।
जूंझी अहंकार ढळे । कल्पना समूळ गळे ।
गळतां गळतां पाहिली । कान्होबा चरणीं राहिलीं ।
कान्होबा पाहे दिठी । तुज मज पडिली मिठीरे पोरा ॥२॥

मिठी मिठी करी पाहासी । आतां कोठें राहासी राहता ठावो येकु ।
फ़टितो तुझा लेंकु । लेंकु गाइ राखे । बाप गोरसु चाखे ।
चाखतां घेतली गोडी । तोचि फ़ांसा तोडीरे पोरा ॥३॥

पोरा एक माझी गोठी । राग न धरी पोटीं । रांगे काम नासे ।
अंहकारे बोंचा वासे ॥ वासिले रावणें डोळे ।
भेणें द्वैत कंस पळे । पळतां पळतां लागला पाठीं ।
तुज मज आतां गोठीरे पोरा ॥४॥

पोरा गोठी करी ऐसी । संतासि मानेल तैसी ।
बापरखुमादेविवरु ध्यासी । तरि वरिल्या गांवां जासीरे पोरा ॥५॥

2
हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा ।
फ़ोडिन तुझा टाळा । वाकुल्या दाविन काळा ॥१॥
हमामारे पोरा हमामारे ॥२॥


हमामा घाली बारे । अंगी भरलें वारें ।
चाखतीं पिकलीं चारें ॥ जाऊं वरिल्या द्वारेंरे पोरा ॥३॥


हमामा घालीं नेटें । सांडी बोलणें खोटें ॥
आतां जासिल कोठें । कान्होबाचे बळ मोठेंरे पोरा ॥४॥


हमामा घाली सोईं ॥ भांभाळी सवा दोहीं ॥
एक नेमें तूं राही । तेथें बहु सुख पाहीरे पोरा ॥५॥


हमामियाचा नादु वाजे ॥ अनुहातें कोपर गाजे ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल राजे । रत्नजडित मुगुट साजेरे पोरा ॥६॥

हमामा अभंग समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *