श्री राम नाम महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

श्री राम नाम महात्म्य अभंग


अभंग संख्या : १०
१ श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि
२श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें
३ रामनाम पावन । यापरतें थोर कोण
४ चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा
५ राम सर्वाघटीं व्यापक संचला ।
६ वैकुंठा जावया न लगे ते सायास ।
७ राम राम म्हणतां वाचे ।

८ पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं ।
९ जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र

१० पूर्वीपासूनी ज्यांचें देणें ।


श्री राम नाम महात्म्य अभंग प्रारंभ

१ श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं ।

श्रुतिशास्त्रां अति दुरी । तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं । क्रीडतु राम ॥१॥

क्षण एक नमस्कारा । नातुडे सुरवरा । तो रिसां आणि वानर क्षेम देतो राम ॥२॥

चरणीं शिळा उद्धरी । नामें गणिका तारी ।तो कोळियाचे घरीं । पाहुणा राम ॥३॥

शिवाचें निजध्येय । वाल्मिकाचें गुह्मा । तो भिल्लणीचीं फळें खाय । श्रीराम ॥४॥

न कळे ध्यानी मनीं । तो नातुडे जो चिंतनीं । तो वानरांच्या कानीं । गोष्टी सांगे राम ॥५॥

एका जनार्दनीं एका । श्रीराम निजसखा । वानरें वनचरें फुका । तारियेलीं ॥६॥

२ रामनाम पावन । यापरतें थोर कोण

श्रीरामानामें तारिलें पाषाण । नामाचें महिमान कोण जाणें ॥१॥

उफराट नामें तारियेला कोळी । दोष जाहले होळी रामनामें ॥२॥

तारियेली गणिका तारियेली देखा । पवित्र तो चोखा रामनामें ॥३॥

एका जनार्दनीं रामनाम जप । पवित्र तें देख रामनाम ॥४॥

३ रामनाम पावन । यापरतें थोर कोण

रामनाम पावन । यापरतें थोर कोण ॥१॥

जडशिळा ते सागरीं । नामें तरल्या निर्धारीं ॥२॥

राम जप सदा । नोहे काळाची ती बाधा ॥३॥

नाम घेतां निशिदिनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

४ चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा

चरणरज लागुनी उद्धरली अहिल्या बाळा । रामा तुझेनि प्रतापें तरली भवसागर शीळा ॥१॥

जयजय रामरामा शामा भवभंजन नांवें । तुझे रुप ध्यातां उमा शिवे निवे ॥२॥

रामनामें कळिकाळ कापती सदा । रामनामें गणिका नेली निजपदा ॥३॥

रामनामें उद्धरले सुर नर वानर । एका जनार्दनी सदा समाधि स्थिर ॥४॥

५ राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला

राम सर्वाघटीं व्यापक संचला । जैसा भाव तया तैसा भेटला ॥१॥

रीस आणि वानर राक्षसहि पहाती । सर्वां एकची मुक्ति रामसंगे ॥२॥

वैर अथवा सख्य वाचे वदे नाम । मुक्ति आम्हां राम स्वयें देती ॥३॥

एका जनार्दनीं वदतां निष्काम । स्वर्गसुख द्त राजाराम ॥४॥

६ राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें

वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥

तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥

गोपाळ सवंगडे नामेंचि तारिलें । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥

एका जनार्दनीं सांगांवें तें किती । रामनामें मती न लगे याची ॥४॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

७ राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें

राम राम म्हणतां वाचे । रामरुप होय साचें ॥१॥

रामें तारिली शबरी । नित्य राम ती उच्चारी ॥२॥

रामें तारिली गणिका । केल्या अजामेळ सखा ॥३॥

शिळा तारिल्या सागरीं । राम अहिल्या उद्धरी ॥४॥

एका जनार्दनीं । राम भरला जनीं वनीं ॥५॥

८ पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें

पक्षी जाला स्वयें जें वायु लेकरुं । त्याच्या क्रिया पारुं केल्या रामें ॥१॥

शबरीची फळे उच्छिष्ट तीं खायें । कैसा राम होय सर्वपाणीं ॥२॥

एका जनार्दनीं श्रीराम सखा । भक्त अभक्तं निका सोडवण ॥३॥

९ जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे

जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे ॥१॥

उफराटें अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्त्र नामावरी उच्चारिलें ॥२॥

पुंसा पढवितां नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावली सिद्ध झालें ॥३॥

अहं महि षासुर भेदिला जिव्हारीं । नामें दो अक्षरीं निर्दाळिला ॥४॥

सदगुरु नारदें उफराटें केलें । बोधिलें लाधिलें वाल्मिकासी ॥५॥

एका जनार्दनीं रामनाम घोष । त्रैलोकीचे दोष सरते जालें ॥६॥

१० पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें

पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें ॥१॥

अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥

गणिका व्याभिचारिणी नारी । सरती करी रामनामें ॥३॥

एका जनार्दनीं नाम । जया निष्काम गोमटें ॥४॥

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *