एडका भारुड -एडका मदन तो केवळ पंचानन… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

एडका भारुड प्रारंभ

एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥

धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥

धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२॥

भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी ।
विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे । तो केवळ पंचानन ॥३॥

शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी ।
एका जनार्दनी चरणी । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥

2 नाथाच्या घरची उलटी-भारुड

नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥

आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥

आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥

शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥

हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥

एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥

एडका भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *