संत माणकोजी महाराज ब
1.
संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा
अगा पंढरीनाथा तू आमचे माहेर । पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती । रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥
तुच आमचे वित्त तूच आमचे गोत । तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥
बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही । प्रीती तुझी पायी बसो माझी ॥४॥
