संकल्प (अंत्यंत गरजे
1.
४. संकल्प (अंत्यंत गरजेचा )
असो. या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. (रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.
या नंतर उजव्या तळहातावर उदक (पाणी) घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते. त्यामुळे फलाची प्राप्ती होत नाही.
हा संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-
श्रीमम्नगणाधिपतये नम: । मातृपितृभ्यो नम: ।
इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: ।
ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम: ।
एतत्कर्मप्रधान देवताभ्यो नम: । ॐ तत्सत् श्रीमद् भगवते महापुरुषस्य विष्णूराज्ञ् या ।
प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियूगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणतीरे शालिवाहन शके... नाम संवत्सरे... अयने... ऋतो... मासे... पक्षे... तिथौ... वासरे... दिवस... नक्षत्रे.... योगे... करणे... राशिस्थिते वर्तमानचंद्रे... राशिस्थिते... श्रीसूर्ये... राशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषु ग्रहेषु यथायथ राशिस्थानस्थितेषु सत्सु एव गुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्तिथौ मम आत्मन: सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ असमाक सहकुटुंबान सपरिवाराणा द्विपद चतुष्पद सहिताना क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्र्वर्यांभीवृद्यर्थ समस्ताभ्यूद्यार्थ च श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथस्य पारायण करिष्ये तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीनवनाथ पूजन च करिष्ये । आसनादि कलश, शंख, घंटा, दीपपूजन च करिष्ये ।
(असे म्हणून हातातील उदक ताम्हनात सोडावे. नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन, न्यास, कलशपूजा तसेच शंख, घंटा, दीप यांची पूजा करून श्रीनवनाथ पोथीचीही प्रेभावाने भक्तीपूर्वक पूजा करावी व पोथी वाचनास प्रारंभ करावा.
दुसऱ्यासाठी करावाचा संकल्प
काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते. अशावेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणाला करावे लागते. अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न कुणाला पडेल.
त्यासाठी पुढीलप्रमाणे संकल्प सोडावा.
'अमुक गोत्रात्पन्ने, अमुक शर्मणा वृत्तोऽह (स्त्री असेल तर अमुक नाम्ना वृत्तोऽहं) यजमानस्य (स्त्री असेल तर यजमान्याया) श्रीनवनाथ देवता प्रीतिद्वारा इष्ट कामना सिद्ध्यर्थ श्रीनवनाथ भक्तिसारग्रंथ पारायण करिष्ये' इ.
मात्र, संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाहेी करू नये. कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे. अगदी निष्काम भावनेने पारायण करावाचे असेल तेव्हाही 'श्रीनवनाथ देवता प्रीत्यर्थ' किंवा 'श्रीनवनाथ देवता कृपाप्रार्प्त्थं' असे म्हणावे. दुसरे महत्वाचे सांगावाचे म्हणजे, हे वाचन कधीही मनात करू नये, ते मोठ्यानेच करावे. त्यायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते. बाधा किंवा पीडा दूर पळतात. (फक्त मंत्रजप मनात करावा. )
पारायणकाळात कसे वागावे?
पारायणकाळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे. सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्रीदत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांचच्या लीलांचे स्मरण, चिंतन करावे. या काळात शक्यतर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे.
रोजचे वाचन झाल्यावर श्रीगणेश, श्रीशिव, श्रीदेवी, श्रीदत्त व श्रीनवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्यात, तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत.
