पूर्वसंबंधे मज दिधले
1.
पूर्वसंबंधे मज दिधले बापाने शेखी काय जाणे कैसे जाले ॥१॥
प्रमुतीलागी मज आणिले कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥
मुकुंदे मजशी थोर केला गोवा । लोटियले भवनदीमाजी ॥३॥
ऐकिला वृत्तांत सर्व जाले गुम माझेचि संचित खोटे कैसे ॥४॥
द्वादशबहात्तरी कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मास देवद्वारी ॥५॥
सर्वानी हा देह अर्पिला विठ्ठली मज का ठेविले पापिणीसी ॥६॥
लाडाई म्हणे देह अपन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥७॥
2.
अनाथाचा नाथ, दिनाचा दयाळ म्हणवोनी सांभाळ करी माझा॥१॥
तुजा ऐसा देवा नाही त्रिभुवनी । म्हणवोनी चरणी विनटले॥२॥
बापा विठ्ठलराया करी कृपादान सांभाळी वचन आपुले ते॥३॥
लाडाईम्हणे देवा भेट देई वेगी । ब्रीद तुझे जगी दीननाथा ॥४॥
(संत नामदेवांच्या गाथेतील संत आऊबाई, संत लिंबाई व संत लाडाई यांच्या नाममुद्रा असलेले अभंग)
3.
जोडोनिया पाणि करी विनवणी धांय चक्रपाणी पांडुरंगा॥१॥
कोणा निरविले हे नाही कळले येई गे विठ्ठले मायबहिणी ॥२॥
ऐकोनिया धावा धावला अनंत शंख चक्रांकित उभा पुढे॥३॥
उचलोनि मुकुंदा चाली योग सांभाळीला तुझा थी ॥४॥
देव म्हणे तुझ्या पुर्वजांसी भाका दिवाली ऐक सांगतो मी ॥५॥
तुमची वंशावळी पोशीन मी सत्य । म्हणोनि कुर्वाळी पाद्य करा ॥६॥
येरी चरणावरी) ठेविला माथा । कृपाळू अनंता सांभाळावे । ॥७॥
ध्यानी धरोनिया मूर्ती सबाह्या अंतरी आता याउपरी न देखे काही ॥८॥
लाडाई म्हणे देवा घेई हृदयात देव मग गुप्त केली तेथे ॥९॥
