॥ पञ्चदशी ॥
॥ पञ्चदशी ॥
15 पञ्चदशः परिच्छेदः - ब्रह्मानन्दे विषयानन्दः
अथात्र विषयानन्दो ब्रह्मानन्दांशरूपभाक् ।
निरूप्यते द्वारभूतस्तदंशत्वं श्रुतिर्जगौ ॥१॥
अर्थ :
विषयानंद प्रापंचिक असल्यामुळे जरी तो मुमुक्षूस ग्राह्य झाला नाही तथापि तो ब्रह्मानंदाचा अंश असल्यामुळे त्यांचे निरुपण ब्रह्मज्ञान होण्यास फार उपयोगी आहे. म्हणून ते आम्ही या प्रकरणी करतो. हा विषयानंद मोक्षाचे द्वार आहे. तो ब्रह्मानंदाचा अंश आहे एतद्विषयी श्रुतिप्रमाण असे, आहे की ॥१॥
एषोऽस्य परमानन्दो योऽखण्डैकरसात्मकः ।
अन्यानि भूतान्येतस्य मात्रामेवोपभुञ्जते ॥२॥
अर्थ :
"हा जो ब्रह्मनिष्ठेचा अखंडैकरस परमानंद त्याच्याच अंशभूत आनंदाचा उपभोग इतर भूते घेतात." असा श्रुत्यर्थ आहे ॥२॥
शान्ता घोरास्तथा मूढा मनसो वृत्तयस्त्रिधा ।
वैराग्यं क्षान्तिरौदार्यमित्याद्याः शान्तवृत्तयः ॥३॥
अर्थ :
आता विषयानंद ब्रह्मानंदाचाच अंश आहे हे नीट समजावे म्हणून तदुपाधिभूत अंतःकरणाच्या वृत्ति येथे सांगतो या मताच्या वृत्ति तीन प्रकारच्या आहेत. क्षांत, घोर आणि मूढ. वैराग्य क्षमा, औदार्य इत्यादि वृत्ति शांत होत. ॥३॥
तृष्णा स्नेहो रागलोभावित्याद्या घोरवृत्तयः ।
संमोहोभयमित्याद्याः कथिता मूढवृत्तयः ॥४॥
अर्थ :
तृष्णा, स्नेह, राग, लोभ इत्यादि घोर वृत्ति समजाव्या. आणि मोह भय इत्यादि मूढ वृत्ति होत. ॥४॥
वृत्तिष्वेतासु सर्वासु ब्रह्मणश्चित्स्वभावता ।
प्रतिबिम्बति शान्तासु सुख च प्रतिबिम्बति ॥५॥
अर्थ :
या सर्व वृत्तीचे ठायी ब्रह्माचा चैतन्यस्वभाव प्रतिबिंबित असतो. परंतु त्याच्या आनंदस्वभावाचें प्रतिबिंब केवळ शांतवृत्तीमध्ये मात्र पडते. ॥५॥
रूपं रूपं बभूवासौ प्रतिरूप इति श्रुतिः ।
उपमा सूर्यकेत्वादि सूत्रयामास सूत्रकृत् ॥६॥
अर्थ :
यास "रूपं रूपं बभूवासौ प्रतिरूपः" ( एकच परमात्मा भिन्न भिन्न रूपाप्रत पावला.) असे -श्रुतिप्रमाण आहे. आणि उपमासूर्यक असे व्याससूत्राचे प्रमाण आहे ॥६॥
एक एव हि भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः ।
एकधा बहुधा चैव दृश्यते जलचन्द्रवत् ॥७॥
अर्थ :
परमात्मा एकच, असून उपाधीच्या संपर्काने, भिन्न भिन्न भूतांचे ठायी व्यवस्थित होऊन जलप्रतिबिंबित चंद्राप्रमाणे बहुविध रूपांप्रत पावला. अशीही एक श्रुति आहे. ॥७॥
जले प्रविष्टश्चन्द्रोऽयमस्पष्टः कलुषे जले ।
विस्पष्टो निर्मले तद्वद् द्वेधा ब्रह्मापि वृत्तिषु ॥८॥
अर्थ :
त्याप्रमाणे चंद्राचे प्रतिबिंब गढूळ पाण्यांत अस्पष्ट, व निर्मलोदकांत स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे ब्रह्मही वृत्तीचेठायी दोन प्रकारे दिसते. ॥८॥
घोरमूढासु मालिन्यात्सुखांशस्य तिरोहितः ।
ईषन्नैर्मल्यतस्तत्र चिदंशप्रतिबिम्बनम् ॥९॥
अर्थ :
घोर व मूढ वृत्ति मलीन असल्यामुळे त्यांत ब्रह्माचा आनंदाश आच्छादित असतो व किंचित्र पारदर्शकता असल्यामुळे त्यांत चैतन्याचे मात्र प्रतिबिंब पडते. ॥९॥
यद्वापि निर्मले नीरे वह्नेरौष्ण्यस्य संक्रमः ।
न प्रकाशस्य तद्वत्स्याच्चिन्मात्रोद्भूतिरत्र च ॥१०॥
अर्थ :
अथवा यास दुसरा एक दृष्टांत आहे. प्रकाश आणि उष्णता असे अग्नीचे दोन स्वभाव असून तापविलेल्या स्वच्छ पाण्यांत त्याची उष्णता मात्र. उद्भूत होते. पण प्रकाशाचा प्रवेश होत नाही. तद्वत घोर, मूढ वृत्तीचे ठायी चैतन्य मात्र प्रतिबिंबित होतें. ॥१०॥
काष्ठे त्वौष्ण्यप्रकाशौ द्वावुद्भवं गच्छतो यथा ।
शान्तासु सुखचैतन्ये तथैवोद्भूतिमाप्नुतः ॥११॥
अर्थ :
परंतु लाकडामध्ये उष्णता व प्रकाश असे दोनही धर्मे उद्भव पावतात, त्याप्रमाणे शांतवृत्तीमध्ये सुख आणि चैतन्य दोनही ब्रह्माचेस्वभाव अनुभवास येतात. ॥११॥
वस्तुस्वरूपमाश्रित्य व्यवस्था तूभयोः समा ।
अनुभूत्यनुसारेण कल्प्यते हि नियामकम् ॥१२॥
अर्थ :
ही व्यवस्था कशी केली ह्मणाल तर पदार्थाचे स्वभाव पाहून आम्ही ती केली. कारण कोणताही नियम बांधणे झाल्यास अनुभवास अनुसरून तो कल्पिला पाहिजे. ॥१२॥
न घोरासु न मूढासु सुखानुभव ईक्ष्यते ।
शान्तास्वपि क्वचित्कश्चित्सुखातिशय ईक्ष्यताम् ॥१३॥
अर्थ :
घोर आणि मूढ वृत्तीचे ठायी सुखानुभव होत नाही. शांतवृत्तीमध्यें देखील सुखातिशयाचा अनुभव केव्हा तरी होतो. ॥१३॥
गृहक्षेत्रादिविषये यदा कामो भवेत्तदा ।
राजसस्यास्य कामस्य घोरत्वात्तत्र नो सुखम् ॥१४॥
अर्थ :
घरदार शेतभात इत्यादिकांविषयीं जेव्हा इच्छा होते, तेव्हा ती रजोगुणापासून उत्पन्न झाली असल्यामुळे ती घोर वृत्ति होय. म्हणून तेये सुख नाही. ॥१४॥
सिद्ध्येन्न वेत्यस्ति दुःखमसिद्धौ तद्विवर्धते ।
प्रतिबन्धे भवेत्क्रोधो द्वेषो वा प्रतिकूलतः ॥१५॥
अर्थ :
याचे कारण असे आहे की, सुख मिळेल किंवा नाही असा संशय असल्यामुळे दुःख होतें. न मिळाले असता ते वाढतें. प्रतिबंध झाला असता क्रोध होतो. किंवा प्रतिकूलतेनें द्वेष उत्पन्न होतो. ॥१५॥
अशक्यश्चेत्प्रतीकारो विषदः स्यात्स तानसः ।
क्रोधादिषु महादुःखं सुखशङ्कापि दूरतः ॥१६॥
अर्थ :
त्याचा परिहार करणे अशक्य झाल्यास विषाद होतो. याचे कारण तमोगुण होय. क्रोधादिकांचे ठायी महादुःख असल्यामुळे सुखाची शंका देखील नाही ॥१६॥
काम्यलाभे हर्षवृत्तिः शान्ता तत्र महत्सुखम् ।
भोगे महत्तरं लाभप्रसक्तावीषदेव हि ॥१७॥
अर्थ :
इच्छिल्या विषयाचा लाभ झाला असता हर्षवृत्ति होते. ही शांतवृत्ति असल्यामुळे त्यांत महत्सुख आहे. भोगामध्यें महत्तर सुख आहे. लाभ होण्याचा प्रसंग दिसल्यास किंचित् सुख होतें. ॥१७॥
महत्तमं विरक्तौ तु विद्यानन्दे तदीरितम् ।
एवं क्षान्तौ तथौदार्ये क्रोधलोभनिवारणात् ॥१८॥
अर्थ :
विरक्तीचे ठायी इच्छेचाच अभाव असल्यानें सर्वात मोठे सुख आहे. हे सुख विद्यानंद प्रकरणांत सांगितले आहे. याप्रमाणेंच क्षांतीचेठायी क्रोधाचा व औदार्याचे ठायी लोभाचा अभाव असल्यामुळे तेथेही सुख आहे. ॥१८॥
यद्यत्सुखं भवेत्तत्तद्ब्रह्मैव प्रतिबिम्बनात् ।
वृत्तिष्वन्तर्मुखा स्वस्य निर्विघ्नं प्रतिबिम्बनम् ॥१९॥
अर्थ :
जे जे म्हणून सुख होते ते ते सर्व ब्रह्माचे प्रतिबिंब असल्यामुळे ब्रह्मच समजले पाहिजे. हे प्रतिबिंब जेव्हा वृत्ति अंतर्मुख असते तेव्हा निर्विघ्नपणें पडते. ॥१९॥
सत्ता चितिः सुख चेति स्वभावा ब्रह्मणस्त्रयः ।
मृच्छिलादिषु सत्तैव व्यज्यते नेतरद् द्वयम् ॥२०॥
अर्थ :
सत्ता, चैतन्य, आणि सुख हे तीन ब्रह्माचे स्वभाव आहेत. दगड माती इत्यादि जड पदार्थांत ब्रह्माचा सत्तास्वभाव मात्र व्यक्त होतो. इतर दोन स्वभाव आच्छादित असतात. ॥२०॥
सत्ता चितिर्द्वयं व्यक्तं धीवृत्त्योर्घोरमूढयोः ।
शान्तवृत्तौ त्रयं व्यक्तं मिश्रं ब्रह्मेत्थमीरितम् ॥ २१॥
अर्थ :
घोर आणि मूढ या दोन वृत्तींमध्ये सत्ता आणि चैतन्य हे दाने स्वभाव व्यक्त असतात. आणि शांत वृत्तीमध्ये सत्ता, चैतन्य आणि सुख हे तीनही व्यक्त होतात. याप्रमाणें मिश्र ब्रह्म सांगितलें. ॥२१॥
अमिश्रं ज्ञानयोगाभ्यां तौ च पूर्वमुदीरितौ ।
आद्येऽध्याये योगचिन्ता ज्ञानमध्यायोर्द्वयोः ॥२२॥
अर्थ :
आता जे अमिश्र म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे ते ज्ञान आणि योग यांहींकरून समजले जातें. ते ज्ञान व योग पूर्वीच सांगितले आहेत. प्रथमाध्यायीं म्हणजे ब्रह्मानंद प्रकरणी योगाचा विचार सांगितला. पुढील दोन अध्यायांत ज्ञान सांगितलें. ॥२२॥
असत्ता जाड्यदुःखे द्वे मायारूपं त्रयं त्विदम् ।
असत्ता नरशृङ्गादौ जाड्यं काष्ठशिलादिषु ॥२३॥
अर्थ :
असत्ता जाड्य आणि दुःख ही तीन मायेची रूपे आहेत. नरशृंगादिकाचेठायी असत्ता पहावी. काष्ठशिलादिकांचेठायी जाड्य पहा. ॥२३॥
घोरमूढधियोर्दुःखमेवं माया विजृम्भिता ।
शान्तादि बुद्धिवृत्त्यैक्यान्मिश्रं ब्रह्मेति कीर्तितम् ॥२४॥
अर्थ :
आणि घोर व मूढ वृत्तिचेठायी दुःख अनुभवास येतें. याप्रकारे माया पसरली आहे. शांत आदिकरून ज्या बुद्धिवृत्ति सांगितल्या त्यांशी ऐक्य पावल्यामुळें मिश्र ब्रह्म असे म्हटले. ॥२४॥
एवं स्थितेऽत्र यो ब्रह्म ध्यातुमिच्छेत्पुमानसौ ।
नृशृङ्गादिमुपेक्षेत शिष्टं ध्यायेद्यथायथम् ॥२५॥
अर्थ :
हे सर्व येथे सांगण्याचे कारण इतकेंच की, ब्रह्मध्यान करण्याची ज्याची इच्छा असेल त्याने नरशृंगाची उपेक्षा करून बाकी उरेल त्याचे ध्यान करावे. ॥२५॥
शिलादौ नामरूपे द्वे त्यक्त्वा सन्मात्रचिन्तनम् ।
त्यक्त्वा दुःखं घोरमूढधियोः सच्चिद्विचिन्तनम् ॥२६॥
अर्थ :
म्हणजे असे की, शिलादिकांचेठायीं नाम आणि रूप ही दोन वर्ज्य करून केवळ अस्तित्वाचें चिंतन करावे. घोर आणि मूढ या दोन वृत्तींचेठायी दुःख तेवढे वर्ज्य करून सत्ता आणि चैतन्य याचे ध्यान करावे ॥२६॥
शान्तासु सच्चिदानन्दांस्त्रीनप्येवं विचिन्तयेत् ।
कनिष्ठमध्यमोत्कृष्टास्तिस्रश्चिन्ताः क्रमादिमाः ॥२७॥
अर्थ :
आणि शांतवृत्तीचेठायीं सत्ता, चैतन्य आणि आनंद या तिहींचेही ध्यान करावे. यांत पहिले कनिष्ठ, दुसरे मध्यम आणि तिसरे उत्तम प्रतीचे ध्यान समजावे. ॥२७॥
मन्दस्य व्यवहारेऽपि मिश्रब्रह्मणि चिन्तनम् ।
उत्कृष्टं व्यक्तुमेवात्र विषयानन्द ईरितः ॥२८॥
अर्थ :
मूढाच्या व्यवहारांत देखील मिश्र ब्रह्माचे उत्कृष्ट चिंतन करता यावेंम्हणून या प्रकरणी विषयानंदाचा विचार आम्ही सांगितला. ॥२८॥
औदासीन्ये तु धीवृत्तेः शैथिल्यादुत्तमोत्तमम् ।
चिन्तनं वासनानन्दे ध्यानमुक्तं चतुर्विधम् ॥२९॥
अर्थ :
उदासीन स्थितीमध्यें वृत्ति शिथिल असल्यामुळे वासनानंद असतो. तेव्हा जे ब्रह्मध्यान होते ते उत्तमोत्तम होय. याप्रमाणे चार प्रकारचे ध्यान समजावे. ॥२९॥
न ध्यानं ज्ञानयोगाभ्यां ब्रह्मविद्यैव सा खलु ।
ध्यानेनैकाग्र्यमापन्ने चित्ते विद्या स्थिरीभवेत् ॥३०॥
अर्थ :
हे जे शेवटले ध्यान सांगितले त्याला ध्यान म्हणणे देखील गौणच. कारण ज्ञान आणि योग यांच्या साहाय्याने ती ब्रह्मविद्याच होते. या ध्यानेंकरून चित्ताचे ऐकाग्र्य झाले असता ती विद्या दृढ होते. ॥३०॥
विद्यायां सच्चिदानन्दा अखण्डैकरसात्मताम् ।
प्राप्य भान्ति न भेदेन भेदकोपाधिवर्जनात् ॥३१॥
अर्थ :
ती विद्या स्थिर झाली असता सत्, चित्, आनंद हे तीनही ब्रह्माचे स्वभाव भेदक उपाधि गेल्यामुळे अखंडैकरसात्मतेप्रत पावून एकरूप होतात. ॥३१॥
शान्ता घोराः शिलाद्याश्च भेदकोपाधयो मताः ।
योगाद् विवेकतो वैषमुपाधीनामपाकृतिः ॥३२॥
अर्थ :
ते भेदक उपाधि कोणते म्हणाल तर शांत वृत्ति, घोर वृत्ति आणि शिलादि जड पदार्थ हे होत. योगेंकरून किंवा विवेकेंकरून या उपाधीचा निरास होतो. ॥३२॥
निरुपाधिब्रह्मतत्त्वे भासमाने स्वयंप्रभे ।
अद्वैते त्रिपुटी नास्ति भूमानन्दोऽत उच्यते ॥३३॥
अर्थ :
मग निरुपाधि असे स्वयंप्रकाश ब्रह्मच राहते. तेथे त्रिपुटी नसल्यामुळें त्यास भूमानंद असे ह्मणतात. ॥३३॥
ब्रह्मानन्दाभिधे ग्रन्थे पञ्चमोऽध्याय ईरितः ।
विषयानन्द एतेन द्वारेणान्तः प्रवेश्यताम् ॥३४॥
अर्थ :
याप्रमाणे ब्रह्मानंद प्रकरणाच्या पांचवे अध्यायांत हा विषयानंदाचा विचार सांगितला. या द्वारे अंतरी प्रवेश करावा. ॥३४॥
प्रीयाद्धरिहरोऽनेन ब्रह्मानन्देन सर्वदा ।
पायाच्च प्राणिनः सर्वान् स्वाश्रितां शुद्धमानसान् ॥३५॥
अर्थ :
या ब्रह्मानंदेंकरून हरिहर प्रसन्न होवोत व आपल्याठायीं आश्रय पावलेले जे शुद्ध मनाचे प्राणी आहेत त्यांचे संरक्षण करोत. ॥३५॥
इति ब्रह्मानन्दे विषयानन्दः समाप्तः ॥१५॥
अर्थ :
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्री विद्यारण्यमुनिविरचितः
पञ्चदशी ग्रन्थः समाप्तः ।
विषयानंदः समाप्तः
श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्री विद्यारण्यमुनिविरचितः
पञ्चदशी ग्रन्थः समाप्तः ।
