वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 34. संत नवनाथ - नवनारायण › 1. नवनाथ कथासार (भक्तिसार) ओवी बद्ध › 3. नवनाथ भक्तीसार मराठी (ओवीबद्ध) › ०. नवनाथ आरती संग्रह

आरती 1

🙏 34. संत नवनाथ - नवनारायण · ABH-081106 · अभंग क्र. १

1.
आरती 1

नवादेवा पासून जन्म नावांचा । मच्छिन्द्राचा जोर झाला तपाचा ।
बारा वर्ष तप मच्छिंद्राने केले । दत्त शिव शंकर प्रसन्न झाले ।।१।।
जय देव जय देव जय नवनाथा । जय नवनाथा जय नवनाथा ।
गुरु केले दत्तात्रय चरणी ठेउनी माथा ।। धृपद ।।
विभूती देऊनी गोरक्ष जन्मिले । जालिंदर कानिफा जन्मासी आले ।
गोपीचंदच्या नगरासी गेले । गुरु जालिंदर लीदीत टाकिले ।।२।।
सोळाशे शैली बाराशे राणी । गुरु केले जालिंदर सोडिले पाणी ।
गोपीचंदाने जोग घेतला । हाती किंगरी घेउनी भिक्षेसी गेला ।।३।।
भिक्षा मागत मागत पर्यटन । येउनी बहिणीच्या गावी राहिले ।
हाती खंजर घेउनी प्राण त्याग केला । उठविली चंपावती आनंद झाला ।।४।।
ऐसा हा नवनाथ जोग जागविला । मैनावातीने कृतार्थ केला ।
गोपीचंद राजा बद्रीसी गेला । गुरु कृपेने अमर झाला ।।५।।
पाचवे नाथ भर्तरी झाले । आडबंगी चौरंगी उदयासी आले ।
आठवे नाथ नागनाथ झाले । औंढ्याच्या ठाई ठाणे बैसविले ।।६।।
नववे नाथ चर्पटी झाले । स्वर्गी लोकी जाऊनी थाट माजविले ।
इंद्र चंद्र देव सुरवर जिंकिले । ब्रम्हा विष्णू महेश जर्जर केले ।।७।।
मूर्ती लोकी येउनी यज्ञ हे केले । शेवटी नवनाथ नऊ दिशा गेले ।
नरहरी वंशी धुंडी जन्मिले । तन्नोस्की मन्नोस्की सेवा अर्पिली ।।८।।
ऐसा हा नवनाथ सिद्धांचा मेळ । ब्रम्हांडी यांचा अदभूत खेळ ।
गुरूच्या चरणी ठेउनी भाव । आशीर्वचनी केला प्रतिपाळ ।।९।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग