वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ › 1. पाच संतांचे हरिपाठ › 1. 5 संतांचे हरिपाठ › 1. हरिपाठ नियम व प्रस्तावना

प्रस्तावना

🙏 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ · ABH-081479 · अभंग क्र. १

1.
प्रस्तावना
आज च्या या घडीला मानव, संत विचारापासून दूर जात असल्याने त्याला सामाजिक भाना बरोबर आध्यात्मिकभान हि नाही, त्यामुळे सुख, समाधान, दया, करुणा, सेवा, ममता, कर्तव्य, जबाबदारी, इत्यादींच त्याला काही देण घेण नाही अस दिसून येत. कारण त्यान भौतिक साधनांचा अंगीकार करून तो त्यात गुरफटून गेला आहे. (उदा. MOBILE, TAB, COMPUTER, LAPTOP, FABLET, FACEBOOK, WHATSUP, ETC.)

ती साधन त्याला शाश्वत वाटतात त्या मुळे तो परमार्थ साधना कडे वळत नाही आणि आजच्या गतिमान युगात त्याला सवड हि नाही.

म्हणून आज मानव ज्या भौतिक साधनाच्या आहारी गेला त्यातून त्याला बाहेर हि काढण्यासाठी त्याच साधनाचा उपयोग करता येईल का? असे संशोधन वारकरी डिजिटल लॅब (Warkari Digital Lab) व्दारे करण्यात येऊन त्याचे फलित म्हणजे हा शुद्ध हरिपाठ.

आजच्या कुणाला घडीला मोबाईल वापरू नका असे सांगितले तर लोक सांगणाराला वेड्यात काढतात.कारण आज चा मोबईल हा स्मार्ट आहे.

म्हणून जसे कुपखनक न्याया प्रमाणे विहीर खोदणारे जसे विहिरीतील माती, दगड, चिखल, धूळ, ई. व्दारे जसे मळून जातात व मग विहिरीला पाणी लागल्यावर त्याच विहिरीच्या पाण्याने परत स्वच्छ होतात , तसे आज हा समाज भौतिक साधनाच्या मागे लागला म्हणून त्या भौतिक साधना व्दारे हि शुध्द हरिपाठ सर्वांना ईश्वर प्राप्तीसाठी उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करतो.
आपला
धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.)

* हरिपाठाचे नियम *
आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.
विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.

स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)
शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा वारकरी पोशाख असावा.

चाली वारकरीच म्हणाव्या. (फिल्मी संगीताच्या) चाली विणेकऱ्याने स्वतः म्हणू नाही, व ईतर भजन्यांना म्हणू देऊ नाही.
हरिपाठ हा वैयक्तिक, आणि सामुहिक, म्हणता येतो.

हरिपाठ हा खाली बसून, उभ्याने, चालताना, पाउल्या खेळत, घरात, अंगणात, रस्त्यात, मंदिरात, दिंडीत चालतांना, ईतर काम करतांना सुद्धा म्हणता येतो.
हरिपाठात पाउल्या खेळतांना स्त्री, पुरुष यांनी सोबत न खेळता पुरुषांनी पुरुषाबरोबर आणि स्त्रियांनी स्त्रिया बरोबर खेळाव्यात.
हरिपाठात ईतर भजने, भावगीते, कविता, म्हणू नाही.

स्त्रिया आपला नित्यनेमाचा हरिपाठ मासिक पाळीच्या काळात सुद्धा (ग्रंथाला हात न लावता) स्वतः किंवा मागे मागे म्हणू शकतात.
हरिपाठात कुणाच्याही तोंडात पान, मावा, गुटखा, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट, नसावे, (तशी जाहीर सुचना हरिपाठ सुरु होण्यापूर्वीच विणेकऱ्याने द्यावी.)
हरिपाठ ज्या देवतेच्या मंदिरात/समोर असेल तर त्या देवतेची शेवटी आरती म्हणावयास हरकत नाही. आणि स्थानिक देवतेचा गजर सुद्धा करता येतो.
प्रत्येक अभंगाचे शेवटी धृपद (दुसरे चरण) म्हणावे, तशी प्रथा आहे.
संपूर्ण हरिपाठ ऐका.
गजर

बोला… पुंडलिक वरदे हरी वि..ठ्ठ…ल…..
पंढरीनाथ भगवान कि जय..!
श्री…. ज्ञानदे….व….. तुका….राम..
ज्ञाने….श्वर… महाराज की…. जय.!
जगद्गुरू तुका…राम महाराज कि जय..!
“शान्तीब्रह्म एकनाथ महाराजक की जय”

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग