वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ › 1. पाच संतांचे हरिपाठ › 1. 5 संतांचे हरिपाठ › 8. संत मुक्ताबाई हरिपाठ

संत मुक्ताबाई हरिपाठ

🙏 38. शुद्ध पंचरत्न हरीपाठ · ABH-081477 · अभंग क्र. १

1.
संत मुक्ताबाई हरिपाठ

मुक्तलग चित्ते मुक्त पै सर्वदा ।
रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य ॥१॥
हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥२॥
सर्वत्र रूपडें भरलेंसे दृश्य ।
ज्ञाता ज्ञेय भासे हरिमाजी ॥३॥
मुक्ताई सधन हरी रूप चित्ती ।
संसारसमाप्ति हरिच्या नामे ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

2.
नामबळें देही असोनि मुक्त ।
शांति क्षमा चित्त हरिभजने ॥१॥
दया धरा चित्तीं सर्वभूती करुणा ।
निरंतर वासना हरिरूपीं ॥२॥
माधव मुकुंद हरिनाम चित्ती ।
सर्व पै मुक्ति नामपाठे ॥३॥
मुक्ताईचे धन हरिनामें उच्चारु ।
अवघाचि संसारु मुक्त केला ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

3.
विश्रांति मनाची निजशांति साची ।
मग त्या यमाची भेटी नाही ॥१॥
अधिकारी मन मग सारी स्नान ।
रोकडेंचे साधन आले हाता ॥२॥
साधिलें साधन नित्य अनुष्ठान ।
चित्तीं नारायण मंत्र जपे ॥३॥
मुक्ताई प्रवीण नारायण धन ।
नित्य मंत्र स्नान करी वेगी ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

4.
आदि अंतु हरि सर्वा घटी पूर्ण ।
जाणोनि संतजन प्रेमभरित ॥१॥
रामनाम चित्ते प्रेम वोसंडत ।
नित्यानित्य तृप्त हरिभक्ती ॥२॥
शांति क्षमा दया सावध पै चित्तीं ।
आनंदे डुल्लती सनकादिक ॥३॥
मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी।
नित्यता आवडी चरणसेवे ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

5.
अलिप्त संसारी हरिनामपाठे ।
जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥१॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदा ।
संसार आपदा भाव तोडी ॥२॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी ।
चेतविला हरि आप आपरूपें ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदा ।
अभिनव भेदा भेदिले ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

6.
अविट हे न विटे हरिचे हे गुण ।
सर्व सनातन ध्याता रूपे ॥१॥
साध्य हे साधन हरिरूपें ध्यान ।
रामकृष्णकीर्तन मुक्त आम्ही ॥२॥
असंगेचि नटु नटलो पै साचे ।
नाही त्या यमाचे भय आम्हा ॥३॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली ।
साधना दिधली चांगयासी ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

7.
आदि मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरि।
सबाह्य अभ्यंतरी हरि एकु ॥१॥
नलगती तीर्थे हरिरूपें मुक्त ।
अवघेची सूक्त जपिनिलें ॥२॥
ज्याचेनि नामे मुक्त पै जडमूह ।
तरले दगड समुद्री देखा ॥३॥
मुक्ताई हरिनामें सर्वदा पै मुक्त ।
नाही आदि अंत उरला आम्हा ॥२४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
8.
आदि अंतु हरि सर्वा घटी पूर्ण ।
जाणोनि संतजन प्रेमभरित ॥१॥
रामनाम चिर्चे प्रेम वोसंडत ।
नित्यानित्य तृप्त हरिभक्ती ॥२॥
शांति क्षमा दया सावध पै चित्तीं ।
आनंदे डुल्लती सनकादिक ॥३॥
मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी।
नित्यता आवडी चरणसेवे ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
9.
मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णी ।
हरिनाम वर्णी सदा काळ ॥१॥
नाही काळ तेथें आम्हा वेळ कैची।
हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्ही कदा ।
निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥
मुक्तपणे मुक्त मुक्ताई रत ।
हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
10.
मुक्त पै अखंड त्यासि में फावलें ।
मुक्तचि घडले हरिच्या पाठ॥१॥
रामकृष्ण मुक्त जाले पै अनंत ।
तारले पतित युगायुगीं ॥२॥
कृष्णनामें जीव झाले सदा शिव ।
वैकुंठ राणिव मुक्त सदां ॥३॥
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ति कोडे ।
जालें पै निवाडे हरिरूप ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
11.
भजनभावो देही नित्यनाम पेठा ।
नामेचि वैकुंठा गणिका गेली ॥१॥
नाममंत्र आम्हा हरिरामकृष्ण ।
दिननिशी प्रश्न मुक्तिमार्गु ॥२॥
नामचि तारकु तरले भवसिंधु ।
हरिनामछंद मंत्रसार ॥३॥
मुक्ताई चिंतन हरिप्रेम पोटीं ।
नित्य नाम घोटी अमृत सदा ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
12.
नाम मंत्र हरि निज दासां पावे।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥
सुदर्शन करी पावे लवकरी ।
पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रथा ॥२॥
निजानंद दावी उघडें वैकुंठ ।
नामेचि प्रगट आम्हालागीं ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्ही ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

13.
करणे जंव कांहीं करू जाये शेवट ।
तव पडे आडवाटे द्वैतभावें ॥१॥
राहिले करणे नचलें पै कर्म ।
हरिविण देहधर्म चुकताहे ॥२॥
मोक्षालागीं उपाय करितोसि नाना ।
तंव साधनी परता पडो पाहे ॥३॥
मुक्ताई करि हरि श्रवण पाठ।
तेणे मोक्षमार्ग नीट सकळ साधे ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
14.
मुक्तजीव सदा होति पै नामपाठे ।
तेंचि रूप ईटे देखिले आम्ही ॥१॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।
आणूनि लवकरी तारी जन ॥२॥
ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेंची ।
निरसिली जनाची भ्रमभुली ॥३॥
मुक्ताई चिंतनें मुक्त पै जाली ।
चरणी समरसली हरिपाठ ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
15.
आदि मध्य अंतु न कळेची प्रांतु ।
असे जो सततु निजतत्त्वें ॥१॥
कैसेनि तत्त्वता तत्त्व पै अनंता ।
एकतत्त्वे समता आपेंआप ॥२॥
आप जंव नाही पर पाहासी काई ।
विश्वपणे होई निजतत्त्वी ॥३॥
माजि मजवटा चित्त नेत तटा।
परब्रह्म वैकुंठा चित्तानुसारे ॥४॥
मुक्ताई सांगती मुक्तनामपंक्ति।
हरिनामें शांति प्रपंचाची ॥५॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

16.
आधी तू मुक्तचि होतासि रे प्राणीया ।
परि वासनें पापिणीया नाडिलासी ।
आधीचे आठवी मग घेई परी ।
हरिनाम जिव्हारी मंत्रसार ॥१॥
आदि मध्य हरि ऊर्ध्व पै वैकुंठ ।
जाईल वासना हरि होईल प्रगट ॥धृ॥
एकतत्त्व धरी हरिनाम गोड ।
येर ते काबाड विषय ओढी ॥
नाम पै सांडी वासना पापिणी ।
एक नारायणी चाड धरी ॥२॥
( खालील चरण चाली मध्ये म्हणून "मुक्तामुक्ती राणा हरिपाठे" हे म्हणतांना स्व्हता भोवती सव्य प्रदक्षिणा करावी )
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना।
मुक्तामुक्ती राणा हरिपाठे ।

( खालील चरण मुळ अभंग गाथ्यामध्ये तपासून पहावे )
नामाचेनि घोटे जळती पापराशी ।
न येती गर्भवासीं अरे जाना॥३॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥
17.
मुक्तलग चित्ते मुक्त पै सर्वदा ।
रामकृष्ण गोविंदा वाचे नित्य ॥१॥
हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥२॥
सर्वत्र रूपडें भरलेंसे दृश्य ।
ज्ञाता ज्ञेय भासे हरिमाजी ॥३॥
मुक्ताई सधन हरी रूप चित्तीं ।
संसारसमाप्ति हरिच्या नामे ॥४॥

हरिहरिछंदु तोडी भवकंदु ।
नित्य नामानंद जपे रया ॥धृ॥

हरिपाठ समाप्त......

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग