आंधळे पांगळे अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

आंधळे । पांगळे प्रारंभ

आंधळे पांगुळ अभंग सूची

1 पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय
2 देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों
3 देखत होतों आधीं मागें पुढें सकळ
4 सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें
5 आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता
6 भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी
७ आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा
८ भगवंता तुजकारणें मेलो
९  पंढरपुर पाटणी गा महाराज
१० दाते बहुतअसती परि न देती साचार
११ मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे
१२ सहजपुर पाटणी गा एक जनार्दन
१३ असोनियां दृष्‍टी जाहलों मी
१४ मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें
१५ मार्ग बहु असती परि तयांची
१६ अंध पंगू दृढ जाहलों बांधलों
१७ ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों
१८ जंबु या द्वीपामाजीं एक
१९ मृत्‍युलाका माझारी गा एक
२० पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु
२१ धर्म अर्थ काम मोक्ष दान
२२ शंख चक्र देवा तुज चुकलों
२३ पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु

पांगुळ

1 पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय

पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी बाप ना माये ॥१॥ दाते हो दान करा जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी जन्म दुःखातें वारी । कीतिऩ हे संतां मुखीं तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो नांदे पंढरपुरीं ॥२॥ या पोटाकारणें गा जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय भीक नाहीं खंडणा । पुढारा ह्मणती एक तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं आशा बहु दारुणा ॥३॥ काय मी चुकलों गा मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य तेथें आठव नाहीं । मी माजी भुललों गा दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांहीं ॥४॥ दुरोनि आलों मी गा दुःख जालें दारुण । यावया येथवरीहोतें हें चि कारण । दुर्लभ भेटी तुह्मां पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून ॥५॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

2 देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों

देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी कोठें स्थिर राहीलो । पाय डोळे ह्मणतां माझे तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी अंध पांगुळ जालों ॥१॥ आतां माझी करीं चिंता  दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें  भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं तुज धरूनि चित्तीं ॥२॥ भाकितों करुणा गा जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा लक्ष चौ-यांसी गांव । धरूनि राहिलों गा हा चि वसता ठाव ॥३॥ भरवसा काय आतां कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीतिऩ तया मज बहुतां । म्हणऊनि मारीं हाका सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥४॥ संचित सांडवलें कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा। होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां माझा सर्वस्वें बळी ॥५॥

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय जियाल्याचें फळ ॥१॥ आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी। करीं मारग सोपा । जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकतील खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना मागें ।तोही सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥ जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा । इंद्रिये मावळलीं । आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला। तो चि देह नव्हे दुजा ॥३॥ गुंतलों या संसारें। कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी ।मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसे चि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥ लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा । पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा। पंढरीच्या निवासा ॥५॥

सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा । न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥ ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतkव निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागें येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । ह्मणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥

५ आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा

आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥ धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना । आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

६ भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीतिऩ हे वाखाणिली थोर वाढली सीमा॥ध्रु॥ भुक्ती मुक्ती तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रिये वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥

८ भगवंता तुजकारणें मेलो

भगवंता तुजकारणें मेलो जिताची कैसी । निष्‍काम बुध्दि ठेली चरण नाहीं तयेसी । न चलती हात पाय दृष्‍टी फिरली कैसी । जाणतां न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२॥ भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्‍दीचा दाता । म्‍हणोनि सांडवली शोक भय लज्‍जा चिंता । सर्वस्‍वें त्‍याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३॥ संसार सागरु गा भवदु:खाचें मूळ । जनवाद अंथरुण माजीं केले इंगळ । इंद्रियें वज्रघातें तपे उष्‍ण वरी ज्‍वाळ । सोसिलें का करुं दुर्भर रे चांडाळ ॥४॥ तिही लोकीं तुझें नाम वृक्ष पल्‍लव शाखा । वेंधलो वरि खोडा भाव धरुनी टेंका । जाणवी नरनारी जागो धर्म हा लोकां । पावती पुण्‍यवंत सोई आमुचिये हाका ॥५॥ नाठवे आपपर आतां काय बां करुं । सारिखा दोहीसवा हारपला विचारु । घातला योगक्षेम तुज आपुला भारु । तुकया शरणागता देई अभयकरु ॥६॥

९  पंढरपुर पाटणी गा महाराज

पंढरपुर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचेंतें नाम ॥१॥ आंधळ्या जीवींचे तो गा जाणतो धर्म । म्‍हणोनि आलों गा देई माझें मज वर्म ॥२॥ असोनि हात पाय डोळा जाहालों मी आंधळा । मुखी नाम तुझें लागला वाचेसी चाळा ॥३॥ देऊनि दान मातें नाम सांगे ये काळीं । विठोबाचें दान आलें ऐसी देईन आरोळी ॥४॥ दान पावलें संतसंगे भक्‍तीचें । एका जनार्दनीं अखंड नाम वाचे ॥५॥

१० दाते बहुतअसती परि न देती साचार

दाते बहुतअसती परि न देती साचार । मागत्‍याची आशा बहु तेणें न घडे विचार । सम देणें सम घेणें या नाही प्रकार । लाजिरवाणें  जिणें दोघांचें धर्म अवघा असार ॥१॥ तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार । तुष्‍टला माझया देहीं दिधलें अक्षय अपार । न सरेचि कल्‍पांतीं माप लागलें निर्धार । मागतेंपण हारपलें दैन्‍य गेलें साचार ॥२॥ देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ । मायामोह तृष्‍णा हाचि चुकविला कोल्‍हाळ । एका जनार्दनी एकपणें निर्मळ । शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥

११ मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे

मी माझे कल्‍पनेनें जाहलोंसे पांगुळ । चालतां न चलवेंचि कोठें नमिळे स्‍थळ । हिंडतो दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कैं भेटेल गुरुदयाळ ॥१॥ धर्म जागो गुरु महिमा देही दाविला  देव । निवारुनी भवर जाळें अवघा निरसला भेव ॥२॥ कर्म त्‍या अकर्माच्‍या लागती वाटें ठेंसा । संपत्‍ती विपत्‍तीचा मानिला भरवसा । कन्‍या पुत्र आप्‍त जन हा तों सहज वोळसा । या भ्रम डोहीं बुडालों धांवे गुरुराया  सर्वशा ॥३॥ येऊनि गरुनाथें माथां ठेविला करु । अज्ञान तिमिर गेलें शुध्‍द मार्ग साचारु । गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधारु । एका जनार्दनी माझा श्रीगुरु उदारु ॥४॥

१२ सहजपुर पाटणी गा एक जनार्दन

सहजपुर पाटणी गा एक जनार्दन दाता । पांगुळा पाय देतो विश्रांति समस्‍तां ॥१॥ यालागीं नाम त्‍यांचे दु:ख निरसी मनाचे । पांगुळा जीवींचे तोचि चालवी साचें ॥२॥ जीवें जिता मी पांगुळ दिधला निजबोध ढवळा । त्‍यावरि बैसोनि क्रीडे सर्वश्र स्‍वलीला ॥३॥ एकाएकु परम दीन अंध पंगु अज्ञान । जनार्दनें कृपा करुन करवी निजसत्‍ता चलन ॥४॥

१३ असोनियां दृष्‍टी जाहलों मी

असोनियां दृष्‍टी जाहलों मी आंधळा । आपंगिलें जिही जाहलों त्‍या वेगळा । मायबाप माझे म्‍हणती मज माझ्या बाळा । शेवटी मोकलिती देती हातीं काळा ॥१॥ संत तुम्‍ही मायबाप माझी राखा कांही दया । लागतों मी वारंवार तुमचीया पायां ॥२॥ इंद्रियें माझी न चलता क्षणभरी । गुंतलों मायामाहें या संसाराचे फेरी । अंथरुण घातलें इंगळाचे शेजेवरी । कैसी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥३॥ माय बाप तुम्‍ही संत उपकार करा । जगीं तो नांदतो जनीं एवढा जनार्दन तो खरा । तयाचिया चरणावरी मस्‍तक निर्धारा । एका जनार्दनी करी विनंति अवधारा ॥४॥

१४ मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें

मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्‍तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत  जिवा वाटे हुरहूर ॥१॥ तुम्‍ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्‍या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळूं लागले लाळ आणि शेंबूड । श्‍वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥ साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्‍य स्‍थान भक्‍तीचें तें माहेर । तिहीं केले कृपादान मस्‍तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्‍द झालें कलेंवर ॥४॥ भाव दिला मज सांगातें मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट । नाचता प्रेमछंदे चालूं लागलों सपाट । एकाजनार्दनी पावलों पंढरी पेंठ ॥५॥

१५ मार्ग बहु असती परि तयांची

मार्ग बहु असती परि तयांची न कळे गती । म्‍हणोनि पडियलो माया मोहभ्रांती । तेणे मी जाहालों अंध कोण धरिल चित्‍ती । मारितों हांका मोठ्यानें अहो उदार श्रीगुरुमुर्ति ॥१॥ धांव धांव श्रीगुरुराया काढीं देऊनि हात । बुडतसे भवनदीमाजीं न कळे अंत । शिण बहु मज जाहला श्रमलों पाहत पाहत । यांतुनी सोडी वेगी तुम्‍हां श्रीगुरुसमर्थ ॥२॥ वाटे आडवाट दरी दरकुटे यांमाजीं गुंतले । कन्‍या पुत्र स्‍त्रीधन हें वर पाडिले जाळें । कवण उगवील कवणा शरण जाऊं तें न कळे । करितों चिंता ह्र्दयीं तंव श्रींगुरु प्रसन्‍न जाहले निवारली अवघी भ्रांती ॥३॥ एका शरण जनार्दनी जाहली संतोषवृत्‍ती । अंधपण फिटलें निवारली पुनरावृत्‍ती ॥४॥

१६ अंध पंगू दृढ जाहलों बांधलों

अंध पंगू दृढ जाहलों बांधलों संसारी । मायामोह भरली नदीमाजीं दुसतर मगरी । यातून कोण सोडवील नाना परिचे दु:ख भारी । दैवयोगें भेटला तो जनार्दन गुरुसत्‍वरीं ॥१॥ धर्म जागो जनार्दनाचा तेणें निवारिला फेरा । चुकविल्‍या चौ-यांशीच्‍या तयानें वेरझारा । मोक्ष प्राप्‍ती वाट जाहली दाविला सोयरा । जन्‍म मरण दु:ख गेलें जाहालों सैराट मोकळा ॥२॥ घातिलें अंजन डोळां दिसों लागली वाट । मोकळा मार्ग जाहला चालिलों सैराट । श्रीगुरुजनार्दन मुखीं नामाचा । बौभाट । एका जनार्दनी पावलों मूळची पेठ ॥ ३॥

१७ ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों

ओंकार निजवृक्ष त्‍यावरी वेधलों प्रत्‍यक्ष । दान मागो रामकृष्‍ण जनार्दनां प्रत्‍यक्ष ॥१॥ झालों मी अंध पंगु । माझा कोणी न धरिती संगु ॥२ ॥ चालतां वाट मार्गी मज कांही दिसेना । उच्‍चारिती नाम संतमार्गे चालिलों जाणा ॥३॥ पाहुनी पंढरीं पेठ अंधपणा फिटलों । एका जनार्दनी संतपायी लीन झालों ॥४॥

१८ जंबु या द्वीपामाजीं एक

जंबु या द्वीपामाजीं एक पंढरपूर गांव । धर्माचे नगर देखा विठो पाटील त्‍याचें नांव । चला जाऊं तयां ठाया । कांही भोजन मागाया ॥१॥ विठोबाचा धर्म जागो । त्‍याची चरणी लक्ष लागो ॥२॥ ज्‍यासी नाही पंख पाय तेणे करावें ते काय । शुध्‍द भाव धरोनियां पंढरपुरासी जावे । इि‍च्‍छलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥४ ॥ भक्ति आणि भावार्थाचा तेणे गुंफियेला शेला । विठोबा दाताराच्‍या घरा उचित नेला । उशिर न लागतां जनमा वेगळा केला ॥५॥ सुदामा ब्राम्‍हण दु:खे दारिद्रे पिडीला । मुष्‍टी पोहे घेऊनि त्‍याचे भेटिलागी गेला ।
शुध्‍द भाव देखोनियां नांव सोनियाचा दिला ॥६॥ गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेलें याचे मनुष्‍यपण येणें सांडियेली लाज । विनवितों शिंपी नामा संत चरणींचा रज ॥५॥

१९ मृत्‍युलाका माझारी गा एक

मृत्‍युलाका माझारी गा एक सद्गुरु साचारु । त्‍याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारु । पांगुळा हस्‍तपाद देतो कृपाळ उदारु । यालागीं नांव त्‍याचें वेदा न कळे पारु ॥१॥ धर्माचें वस्तिघर ठाकियलें बा आम्‍ही । दान मागों ब्रह्म साचें नेघों द्वैत या उर्मी ॥२॥ विश्रांति विजन आम्‍हां एक सद्गुरु दाता । सेवितां चरण त्‍याचे फिटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्‍पना आशा इळा परिसी झगटतां । कैवल्‍य देह झालें उपरती देह अवस्‍थां ॥३॥ मन हे निमग्‍ल झालें चरणस्‍पर्श तत्‍वतां । ब्रह्महंस्‍फूर्ति आधीं भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्यज्ञान ब्रह्मरुपें तेथें कथा । अधं मग दृढ झालो निमाल्‍या विषयाच्‍या वार्ता ॥४॥ ऋध्दि सिध्दि दास्‍य सख्‍य आपेआप वोळलीं । दान मान मंद बुध्दि ब्रह्मरुपें लीन झालीं । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगुळा जीवनमार्गु सतरावी हे वोळली ॥५॥ पांगुळं मी कल्‍पनेचा पंगु झालों पैं मने । वृत्ति हे हरपली एका सद्गुरुरुप ध्‍यानें । निवृत्‍तीसी कृपा आली शरण गेलों ध्‍येयध्‍यानें ॥६॥

२० पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु

पुर्वजन्‍मीं पाप केलें ते हें बहु विस्‍तारिलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदले । चौ-यांशी लक्ष योनि फिरतां दु:ख भोगिलें । ज्ञानदृष्‍टी हारपली दोन्‍ही नेत्र आंधळे ॥१॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्‍टी देतो त्‍याचें नाम मी उच्‍चारी ॥२॥ संसार दु:खमुळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाही कोठें रात्रं दिवस तळमळ । कामक्रोध लोभशुनीं पाठीं लागली ओढाळ । कवण मी शरण जाऊं आतां दृष्‍टी देईल निर्मळ ॥३॥ मातापिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्‍ट मित्र-स्‍वजनसखे हे तों सुखाची मांडणी । एकला मी दु:ख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सद्गुरुवांचुनि ॥४। ।साधुसंत मायबाप तिहीं केलें कृपादान । पंढरिये यात्रे नेलें घडलें चंद्रभागे स्‍नान । पुंडलिके वैद्यराजें पूर्वी सधिलें साधन । वैकुंठीचें मूळमीठ डोळां घातलें तें अंजन ॥५॥ कृष्णांजन एकवेळा डोळां घालितां अढळ । तिमिर दु:ख गेलें फिटलें भ्रांतीपडळ । श्रीगुरुनिवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्‍वळ । बापरखुमादेवीवरु विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६॥

२१ धर्म अर्थ काम मोक्ष दान

धर्म अर्थ काम मोक्ष दान मागे श्रीगुरु ।हस्‍त पाद शरीर व्‍यथा पंगु झालों मी पुढारु । तिमिर आलें पुंढे मायामोहो उदारु । तेणें मी जात होतों मग सहज भेटला सद्गुरु ॥१॥ धर्म जागो सद्गुरु महिमा जेंणे तुटे भवव्‍यथा । हाचि धर्म अर्ध काम येर तें मी नेघें वृथा ॥२॥ एक नाम कृष्‍ण याचें दान देई सद्गुरु । वेदशास्‍त्र मथन केलें परि नव्‍हेंचि पुढारु । शरण आलें निवृत्‍तीराया तोडीं संसारु । पाहातां इये भुवनी तुजविण नाहीं उदारु ॥३॥ ज्ञानेसहित विज्ञान गिळी मी माझे पांगुळ । वृत्ति हे माझे ठायीं ह्र्दयीं बुझें गोपाळ । शंख चक्र पद्म गदा तुष्‍टे ऐसा तूं दयाळ । बापरखुमादेवीवरें  दान देऊनि केलें अढळ ॥४॥

२२ शंख चक्र देवा तुज चुकलों

शंख चक्र देवा तुज चुकलों गा तेणें दृष्‍टी आलें पडळ । विषयग्रंथी गुंतलोंसे तेणें होतसें विव्‍हळ । अंध मंद दृष्‍टी झाली । गिळूं पाहे हा काळ । अवचित दैवयोगें निवृत्‍ती भेटला कृपाळ ॥१॥ धर्म जागो निवृत्‍तीचा तेणें फेडिलें पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरुप सकळ ॥२॥ तिहि लोकीं विश्‍वरुप दिव्‍य दृष्‍टी धिधली । द्वेत हें हरपलें अद्वेतपणें माऊली । उपदेश निजब्रह्म ज्ञानांजन साऊली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३॥ दान हेंचि आम्‍हां गोड देहीं दृष्टी मुराली । देह हें हरपले विदेहवृत्ति स्‍फुरली । विज्ञान हें प्रगटलें ज्ञेय ज्ञाता निमाली । दृष्‍य तें तदाकार ममता तेथें बुडाली ॥४॥ प्रपंचु हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति झाली । मी माझे हरपलें विषयांध या बोली । उपरती सद्गुरु बोधु तेथें प्रकृत्ति संचली । शुध्‍द धर्ममार्गे पंथ हातीं काठी दिधली ॥५॥ वेदमार्गे मुनी गेले त्‍याचि मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंधा  म्‍हणोनि उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा तरंगाकारी हरपलों । ज्ञानदेव निवृत्‍तीचा द्वेत सर्व निरसलों ॥६॥

२३ पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु

पूर्वप्राप्‍ती दैवयोगे पंगु झालों मी अज्ञान । विषय बुंथी घेऊनियां त्‍याचें केले पोषण । चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान । अवचटें गुरुमार्गे प्रगट बह्माज्ञान ॥१॥ दाते हो वेग करा कृपाळु बा श्रीहरि । समता सर्व भावीं शांती क्षमा निर्धारीं । सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥ शरण रिघें सद्गुरु पायां पांग फिटेल पांचाचा । पांगुळलें आपेआप हा निर्धारु पै साचा । मनामाजीं रुप घालीं मी माजीं तेथे कैचा । हरपली देह बुध्दि एकाकार शिवाचा ॥३॥ निजबोधें धवळा शुध्‍द यावरी आरुढ पैं गा । क्षीराब्‍धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा । वासना माझी ऐसी करीं परिपूर्ण गंगा । नित्‍य हें ज्ञान घेई अद्वैत रुप लिंगा ॥४॥ पावन होशी आधीं पांग फिटले जन्‍माचा । अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा । पांडूरंग होसी आधीं फळ पीक जन्‍माचा । दृष्‍टी बुध्‍दीटाकीं वेगीं टाहो करीं नामाचा ॥५॥ ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना । मुरालें ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना । दृश्‍य हें लोपलें बापा परती नारायणा । निवृत्‍ती गुरु माझा लागों त्‍याच्‍या चरणा ॥६॥

आंधळे पांगळे अभंग समाप्त.

मालिका सूची.
मंगलाचरण पहिले, – दुसरे, – तिसरे.
काकडा – भूपाळ्या.
वासुदेव. – मुका-बहिरा-जोगी. – गौळणी.

अक्षरसूचीमदतअनुक्रमणिकाईतर aapअभंग सूची

आंधळ्या पांगळ्या चा एक विठोबा

पांगुळ : मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें
गायक : डिगांबर बुवा कुटे.

पांगुळ : जंबु या द्वीपामाजीं
गायन : बाळकृष्ण म. शिंदे आळंदी

काकडा भूपाळ्या.
वासुदेव. – मुका-बहिरा-जोगी. – गौळणी.

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

संपूर्ण वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *