भूपाळ्या अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

भूपाळ्या प्रारंभ
|| विठोबा रखुमाई ||
भजन म्हणा

काकडा भजन : उठा उठा साधुसंत पासून उठा सकळ जन पर्यंत एकूण ११ अभंग.
गायक : डिगांबर बुवा कुटे.

१ योगिया दुर्लभ तो म्यां

योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।
पाहता पाहता मना न पुरेचि धणी ।।१।।
देखिला देखीला माय देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमाले दुजेपण ।।२।।
अनंत रूपे देखिले म्या त्यासी ।
बापरखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ।।३।।

२ अवताराच्या राशी तो हा

अवताराच्या राशी तो हा
शंख चक्रगदापदमसहित करी ।।१।।
देखिला देखिला देवा आदिदेव बरवा ।
समाधान जीवा पाहता वाटे माये ।।२।।
सगुण चतुर्भुज रुपडे तेज पुंजाळती ।
वंदी चरणरज नामा विनवी पुढती गे माय ।।३।।

3 करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा

करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा ।
परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसें वाटतें पायीं ।
साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥
असो नमो भाव आलों तुझिया ठाया।
पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आह्मीं तुझीं वेडीं वांकडीं ।
नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥

४  माझे चित्त तुझे पायी

माझे चित्त तुझे पायी । राहे ऐसे करी काही ।
धरोनिया बाही । भव हा तारी दातारा ।।१।।
तु चतुरा तु शिरोमणी । गुणलावण्याची खाणी ।
मुकुट सकाळा मनी । धान्य तूंची विठोबा ।।२।।
करी या तिमिराचा नाश । उदय होऊनी प्रकाश ।
तोडी आशा पाश । करी वास हदयी ।।3।।
पाहे गुंतलो नेणता । माझी असो तुम्हा चिंता ।
तुका ठेवी माथा । पायी आंता राखावे ।।४।।

५  ऐसी वाट पाहे कांहीं निरोप

ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ ।
काहो कळवळ तुम्हा उमटे चि ना ॥१॥
अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे ।
लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥
काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी ।
ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥२॥
तुका म्हणे खरा न पवे चि विभाग ।
धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥३॥ 

६ बोलोनि दाऊं कां तुह्मी

बोलोनि दाऊं कां तुह्मी नेणा जी देवा ।
ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥१॥
पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय ।
ह्मणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु॥
त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें ।
ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥२॥
तुका म्हणे माते बाळा चुकलिया वनीं ।
न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥३॥ 

७  कां गा किविलवाणा केलों

कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन ।
काय तुझी हीन दशा जालीसी दिसे ॥१॥
लाज येते मना तुझा म्हणवितां दास ।
गोडी नाहीं रस बोलिली या सारिखी ॥ध्रु.॥
लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें ।
कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥२॥
तुका म्हणे माझी कोणें वदविली वाणी ।
प्रसादा वांचूनि तुमचिया विठ्ठला ॥३॥

८  जळो माझें कर्म वायां

जळो माझें कर्म वायां केली कटकट ।
जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥१॥
आता पुढें धीर काय देऊं या मना ।
ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥
गुणवंत केलों दोष जाणायासाठीं।
माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥२॥
तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा ।
बरवा हा लळा पाळियेला शेवटीं ॥३॥

९ जळोत तीं येथें उपजविती

जळोत तीं येथें उपजविती अंतराय ।
सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आतां मज साहे येथें करावें देवा ।
तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥
भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां ।
अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥२॥
तुका म्हणे असो तुझें तुझे मस्तकीं ।
नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥३॥ 

१० न संगतां तुम्हा कळों

न संगतां तुम्हा कळों येतें अंतर ।
विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरितां आवडी ।
अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥
काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं ।
पोटा आलों तई पासूनिया समर्थ ॥२॥
तुका म्हणे अवघी आवरिली वासना ।
आतां नारायणा दुसरियापासूनि ॥३॥

११  तुजसवें आम्ही अनुसरलों

तुजसवें आम्ही अनुसरलों अबळा ।
नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥१॥
सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं ।
आतां दोहिवीशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥
न कळतां संग जाला सहज खेळतां ।
प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥२॥ 
तुका म्हणे असतां जैसें तैसें बरवें ।
वचन या भावें वेचुनियां विनटलों ।3॥ ॥८॥ 

१२ कामें नेलें चित्त नेदी

कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख ।
बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥१॥
कां जी सासुरवासी मज केलें भगवंता ।
आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना ।
येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथें अवघे वांयां गेले दिसती सायास ।
तुका म्हणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥३॥ 

१३  तुझें दास्य करूं आणिका

तुझें दास्य करूं आणिका मागों खावया ।
धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥
काय गा विठोबा तुज आता म्हणावे ।
शुभाशुभ गोड तुंम्हा थोरांचे नावे ॥ध्रु.॥
संसाराचा धाक निरंतर आम्हासी ।
मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥
तुझा शरणागत शरण जाऊ आणिकासी ।
तुका म्हणे लाज कवणा हे का नेणसी ।।3।।

१४  चित्ती तुझे पाय डोळा

चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान
अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण ।।१।।
हेचि एक तुम्हा मागतो मी दातारा ।
उचित ते करा भाव जाणोनी खरा ।।२।।
खुंटली जाणीव काही बोलणेची आता ।
कळो येईल तैसी करा बाळाची चिंता ।।३।।
तुका म्हणे आता नका देऊ अंतर ।
न कळे पुढे काय कैसा होईल विचार ।।४।।

१५ कनकाच्या परियेळीं उजळूनि

कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती ।
रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥१॥
ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा ।
राहिरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥
मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें।
श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥२॥
वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत ।
शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥३॥
सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा ।
चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥४॥
ओंवाळीता मन हें उभें ठाकलें ठायीं ।
समदृष्टी समान तुकया लागली पायीं ॥५॥

१६ वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात ।

वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात ।
पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥
कई येतां देखें माझा मायबाप ।
घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे ।
मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥२॥
सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक ।
नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण ।
पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥

१७ आता कोठें धावे मन । तुमचे चरण

आता कोठें धावे मन । तुमचे चरण देखलिया ।।१।।
भाग गेला सीण गेला । अवघा झाला आनंद ।।२।।
प्रेमरसे बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ।।३।।
तुका म्हणे आम्हा जोगे । विठ्ठल घोगे खरे माप ।।४।।

भूपाळ्या समाप्त

वासुदेव अभंग पहा.
येथे क्लिक करा.

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *