आरत्या व विनवणी उपसंहार वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

आरत्या देवाच्या, संतांच्या, तीर्थांच्या, नद्यांच्या, ग्रंथांच्या

आरत्या अनुक्रमणिका

वारकरी आरत्या विनवणी

करुनी आरती

करुनी आरती । चक्रपाणि ओंवाळिती ॥१॥ आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥ पाहा वो सकळां । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥ तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळीं ॥४॥

प्रेम सप्रेम आरती

प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओवाळीती ॥१॥ धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥ बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळिती परमानन्दा ॥३॥ नामा म्हणे केशवातें । देखुनी राहिलों तटस्थें ॥४॥

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिका भेटी परब्रम्हा आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥ जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा । पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥ तुळसीमाळा गळां कर ठेऊन कटीं । कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती । दर्शन हेळामत्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥३॥

आरती ज्ञानराजा १

आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥ आरती ज्ञानराजा ॥धृ॥ लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविलें ज्ञानी ॥२॥ प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केले । रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले ॥३॥

तुकोबारायांची आरती तुकारामा १

आरती तुकारामा । स्वामी सद्‍गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हां ॥१॥ आरती तुकारामा ॥धृ॥ राघवे सागरांत । पाषाण तारिलें । तैसे तुकोबाचे अभंग रक्षिलें ॥२॥ तुकितां तुळनेसी । ब्रह्म तुकासी आलें । म्हणोनि रामेश्वरे । चरणीं मस्तक ठेविलें ॥३॥

एकनाथा आरती महाराजा समर्था १

आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनीं तूंचि थोर। सदगुरु जगन्नाथा ॥१॥आरती एकनाथा ॥धृ॥ एकनाथ नाम सार । वेद शास्त्रांचें गुज संसार दु:ख नासे । महामंत्रांचें बीज ॥२॥ एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता । अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गातां ॥३॥


हेंचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥ न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥ तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हांसी ॥४॥

भजन – जय विठ्ठल जयजय विठ्ठल ।

बोलिलीं लेंकुरें

बोलिलीं लेंकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥२॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला॥३॥ तुका म्हणें ज्ञानेश्वरा । राखा पायां पैं किंकरा ॥४॥

भजन – ज्ञानदेव तुकाराम ।

१ झालें समाधान

झालें समाधान । तुमचे देखिले चरण ॥१॥ आतां उठावेसे मना । येत नाहीं नारायणा ॥२॥ सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥३॥ तुका म्हणॆ भोग । गेला निवारला लाग ॥४॥

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण  वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ॥१॥ प्रेमें आलिंगन आनंदें पूजीन । भावें ओवाळींन म्हणे नामा ॥२॥

भजन – विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई

१ कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन

कृपाळु सज्जन तुम्ही सन्तजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥ आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुळती ॥२॥ अनाथ अपराधी पतित आगळा । परि पाया वेगळा नका करुं ॥३॥ तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी । मग मजहरी उपेक्षिना ॥४॥

तिर्थ उठवणे प्रचलित अभंग

1 तीर्थ उठवा उठवा । देव भक्तासी बोळवा

तीर्थ उठवा उठवा । देव भक्तासी बोळवा ॥१॥ गुढा सोडणें सोडणें । झालें तीर्थ उथ्थापणें ॥२॥ गुढी आली वृंदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥ जाला कथेचा कळस । लळीत गाये भानुदास ॥४॥

तीर्थाचा अभंग गाथ्यात असा पाठा आहे

2 गुढीयेसी सांगू आलें । कंस चाणूर मर्दिले

गुढीयेसी सांगू आलें । कंस चाणूर मर्दिले ॥१॥ हर्षे नाचताती भोजें । जिंकयेले यादवराजें ॥२॥ गुढी आलीं वृदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥ जाला त्रिभुवनी उल्हास । लळित गाये भानुदास ॥४॥

1  हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं

हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥ संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥ चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥

1  आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा ।

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥ कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं ।ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥ अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥ नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥

2  मागणें तें तुजप्रती आहे ।

मागणें तें तुजप्रती आहे । देशील तरी पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतासी निरवी हेंचिमज देई ।आणिक दुजेंकांही नमागों देवा॥२॥ तुका म्हणे आतां उदार तूं होई । मज ठेवी पायीं संतांचिया ॥३॥

गणपती च्या आरत्या

१ सुखकर्ता दु:खहर्ता

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाच । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती । दर्शनमात्रे मन:कामना पुरती ।।१।।  धृ ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडीत मुगुट शोभतो बरा । रुणझुणती नूपूरे चरणी घागरिया ।। २ ।। लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।

शेंदूर लाल चढायो अच्छा

शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुखको | दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको | हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको | महिमा काहे न जाय लागत हुं पदको ||१|| जय जय जी गणराज विद्यासुखदाता | धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता || धृ || अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी | विघ्नविनाशक मंगल मुरत अधिकारी | कोटीसुरजप्रकाश ऐसी छबी तेरी | गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी || जय ||२|| भावभगतसे कोई शरणागत आवे | संतत संपत सबही भरपूर पावे | ऐसे तुम महाराज मोको अति भावे | गोसावीवंदन निशिदिन गुण गावे | जय जय जी गणराज विद्यासुखदाता || धन्य ||३||


ईतर वारकरी आरती संग्रह

तुकोबारायांची आरती २ प्रपंच रचना निळोबा

प्रपंच रचना सर्व ही भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनी दाखविली । अहंता ममता दवडूनी निजशांती वरिली ।।1।। जयजयजी स्वामी सद गुरु तुकया दातारा । तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।।धृ।। हरीभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला । जगदोद्धारालागी उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ।।2।। तेरा दिवस वह्या रक्षूनीया उदकी । कोरड्याची काढूनी दाखविल्या शेखी । अपार कविता शक्ति मिरवूनी विधी अंकी । कीर्तनश्रवणे तुमच्या तरिजे जन लोकी ।।3।। बाळवेष घेवूनी श्रीहरी भेटला । विधीचा जनिता तूचि आठव हा दिधला । तेणे ब्रह्मानंदे प्रेमा रूढविला । न तुके म्हणूनी तुका नामे गौरविला ।।4।।प्रयाणकाळी देवें विमान पाठविले । कलीच्या काळामाजी अद्भूत वर्तले । मानव देह घेऊनी निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संता तोषविले ।।5।।

एकनाथ म. आरती
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार 

भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार ।आदिक्षेत्री स्थान वसती गोदातीर ।।१।। ओवाळू आरती स्वामी एकनाथा ।तुमचेनी नाम घेता हरें भवभय चिंता ।।२।। जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद ।भगवती टीका नारायण स्वात्मबोध (आत्मबोध)।।३।। ब्रम्हा विष्णू महेश ज्याशी छळावया येती ।न ढळे ज्याची निष्ठा होय (होती) एकात्मता भक्ती ।।४।। कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे । अनन्य भक्तीभावे निळा वंदी त्याचे पाय ।।५।।


हनुमंताच्या आरती

मारुतीची आरती सत्राणे उड्डाणे

सञाणें उड्डाणें हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ कडाडीले ब्रम्हांड धोका ञिभुवनी । सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥१॥ जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता । तुमचेनि प्रसादें न भियें कृतांता ॥धृ॥ दुमदुमिले पाताळ उठिला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ॥ काडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामी रामदासा शक्तीचा शोध ॥२॥


नवनाथांच्या आरती

नवनाथ आरती  

नवादेवा पासून जन्म नावांचा । मच्छिन्द्राचा जोर झाला तपाचा ।

बारा वर्ष तप मच्छिंद्राने केले । दत्त शिव शंकर प्रसन्न झाले । जय देव जय देव जय नवनाथा ।  जय नवनाथा  जय नवनाथां । गुरु केले दत्तात्रय चरणी ठेउनी माथा ।१। धृपद। विभूती देऊनी गोरक्ष जन्मिले । जालिंदर कानिफा जन्मासी आले । गोपीचंदच्या नगरासी  गेले । गुरु जालिंदर लीदीत टाकिले ।।२।। सोळाशे शैली बाराशे राणी । गुरु केले जालिंदर सोडिले पाणी । गोपीचंदाने जोग घेतला । हाती किंगरी घेउनी भिक्षेसी गेला ।।३।। भिक्षा ,मागत मागत पर्यटन केले । येउनी बहिणीच्या गावी राहिले । हाती खंजर घेउनी प्राण त्याग केला । उठविली चंपावती आनंद झाला ।।४।। ऐसा हा नवनाथ जोग जागविला । मैनावातीने कृतार्थ केला । गोपीचंद राजा बद्रीसी गेला । गुरु कृपेने अमर झाला ।।५।। पाचवे नाथ भर्तरी झाले । आडबंगी चौरंगी उदयासी आले । आठवे नाथ नागनाथ झाले । औंढ्याच्या ठाई ठाणे बैसविले ।।६।। नववे नाथ चर्पटी झाले । स्वर्गी लोकी जाऊनी थाट माजविले । इंद्र चंद्र देव सुरवर जिंकिले । ब्रम्हा विष्णू महेश जर्जर केले ।।७।। मूर्ती लोकी येउनी यज्ञ हे केले । शेवटी नवनाथ नऊ दिशा गेले । नरहरी वंशी धुंडी जन्मिले । तन्नोस्की मन्नोस्की सेवा अर्पिली ।।८।। ऐसा हा नवनाथ सिद्धांचा मेळ । ब्रम्हांडी यांचा अदभूत खेळ । गुरूच्या चरणी ठेउनी भाव । आशीर्वचनी केला प्रतिपाळ ।।९।।


श्रीमद् भागवत आरत्या

१ जय हो जय श्री भगवता

जय हो जय श्री भागवता । आरती करू तुज भगवंता । श्री शुक मुनीने । परम भक्तीने । नाना परीने । गाईयेले ज्या हरि चरिता ।।१।। आरती…

वेद तरूचे मधुर फळ । स्वादु रसे जे सोज्वळ । आत्माराम मुनी अचल । सेवुनी झाले जन सुफळ । पाहा पर्वणी आणि । आली अवनी । हि अघ हरणी । भावजल तरणी । ती पतिता ।।२।। आरती……

येथे व्यासांची वाणी । सार्थक हरि गुण गाउनी । शास्त्र पुराणी मुकुटमणी । परम प्रेमामृत जननी । सहज सेविता । भाविक भक्ता । उदार दाता । मोक्ष तत्वता । दे हाता ।।३।। आरती……

गमते जणू मानस तीर्थ । व्दादश सोपाने युक्त । निर्मळ भक्ती जले भरीत । विहरे हरि हंसची चित्त । लोक सुकमळे । संत व्दिज कुळे । सेउनी रमले । भान हरपले । रस पिता ।।४।। आरती…..

अपार महिमा ग्रंथांचा । वदवेना कोणा साचा । प्राणची किर्तनकारांचा । मेवा कवीवर संतांचा । जणू बोधाचा । स्वयं प्रज्ञेचा । व्दादश कुळीचा । रवी अंतरीचा । तम हरता ।।५।। आरती…..

ग्रंथ नोव्हे हा श्री कृष्ण । गीते वेधी मन पूर्ण । अनन्य होता या शरण । खचित टळे जन्म मरण । त्रिताप जाती । चिर ये शांती । नाथ हि वदती । राम पदी ठेऊ माथा ।।६।। आरती……

 २ आरती निगम वृक्ष सारा

आरती निगम वृक्ष सारा । भागवत संज्ञा भाव पारा ।।धृ।।

नारद कथा साधू श्रवणी । परीक्षिती लवला शुक चरणी । विरागी तनु त्याग करुनी । कथी अवतार कथा भरणी । विदुर मैत्रेय संग घडला । विधी अति कष्टी । निपजवी सृष्टी । सुखाची वृष्टी । कपिलमुनी देवहुति धारा । पुरातन सुकर अवतारा ।।१।। आरती निगम …..

ब्रम्ह्सुत वसे दक्ष यागी । आला ध्रुव तपे अचल भागी । पृथु प्राचीनबर्ही त्यागी । प्रियव्रत वनवासा लागी । मही आकार गोल वदला । नरक भय हरुनी । अजामेळ तरुनी । बोध बहू करुनी । चित्रकेतुने पैल पारा । काश्यप संतती सुख सारा ।।२।। आरती निगम ..

भक्त प्रल्हाद भये तरला । हरि नरहरी रूपे नटला । नक्रा पासूनि करी सुटला । समुद्र मंथुनी बळी विटला । कूर्म मोहिनी भिषक राजा । रविशशी गोत्र । समय युग गात्र । आणिक नृपपात्र । कृष्णभक्तीशी अंकूपारा । नवमा संपविला सारा ।।३।। आरती निगम ……

कंस चाणूर मुख्य वीरा । दमया अवतरला हिरा । गोकुळी लीला करसी सारा । साह्य झाला अर्जुन वीरा । उद्धवा ज्ञान कला बोधी । मलय युग विनय । मृकुंडी तनय । परीक्षिती सुनय । पावला हरि चरणी थारा । विठ्ठल वेदे स्कंद बारा ।।४।। आरती निगम …..

 ३ श्री भागवत भगवान की है आरती

श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती॥ श्री भागवत भगवान्…

ये अमर ग्रन्थ ये मुक्ति पन्थ, ये पंचम वेद निराला॥ नवज्योति जगाने वाला। हरि नाम यही, हरि धाम यही। जग की मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती॥ श्री भागवत भगवान्…

ये शान्तिगीत पावन पुनीत, पापों को मिटाने वाला॥ हरि दर्स कराने वाला। है सुख करनी, है दुःख हरिनी। श्री मधुसूदन की आरती॥ पापियों को पाप से है तारती॥ श्री भागवत भगवान्…

ये मधुर बोल, जग फ़न्द खोल सन्मार्ग बताने वाला। बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही, घनश्याम यही। प्रभु के महिमा की आरती। पापियों को पाप से है तारती॥ श्री भागवत भगवान्…

श्री भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से है तारती॥ श्री भागवत भगवान्…


विष्णूच्या आरत्या

ॐ जय जगदीश हरे

 ॐ जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे | भक्त जनो कें संकट क्षण में दूर करे || ओSम || जो घ्यावे फल पावे दु:ख विनशे मनका | सुख संपती घर आवे कष्ट मिटे तनका || ओSम || मात पिता तुम मेरे शरण गहू किसकी | तुम बिन और न दूजा आस करू किसकी || ओsम || तुम हो पुरण परमात्मा तुम अंतरयामी | पार ब्रम्ह परमेश्वर तुम सबके स्वामी || ओSम || तुम करुणा कें सागर तुम पालन कर्ता | मैं मुरख खल कामी कृपा करि भरता || ओSम || तुम हो एक अगोचर सबके प्राणपती | स्वामी किस विधी मिलू दयामय तुमको मैं कुमति || ॐ || दिन बंधू दुखहर्ता तुम रक्षक मेरे अपने हाथ उठाओ शरण पडा तेरे || ॐ || विषय विकार मिटाओ पापा हरे देवा | श्रद्धा भक्ति बधाओ संतन की देवा || ॐ ||


शंकराच्या आरत्या

शंकराची आरती लवथवती विक्राळा  १

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥ जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ॥धृ॥ कर्पुरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥ देवी दैत्यी सागर मंथन पैं केले । त्यामाजी अवचित हळहळ जें उठलें । तें त्वां असुरपणें प्राशन केले ।नीलकंठ’ नाम प्रसिध्द झाले ॥ ३॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे ।उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥४॥


दत्त आरती

दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ती १

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा ।

नेति नेति शब्दें न ये अनुमाना । सुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥१॥ जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता । आरती ओंवाळितां हरली भवचिंता ॥धृ॥ सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त ।अभाग्यासी कैची कळेल ही मात । पराहि परतलि तेथें कैचा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ दत्त येऊनिया उभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला । प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ ‘दत्त दत्त’ ऐसे लागले ध्यान। हारपले मन झाले उन्मन मी-तुंपणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥४॥

दत्ताची आरती जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता २

जयदेव जयदेव जय, श्रीमान अवधूता । आरती ओवाळी तुजला, बाळ उमासुता ।।1।। माहूरगड असे तुझे, पावन जन्मस्थान ।

दर्शनास येती भक्त, गात तुझे गुणगान ।घेऊन दर्शन तुझे, मिटवती  ते  तहान । कृपा करसी त्यावर, आहेस फार महान । गाणगापूर असे तुझे, एक वसती स्थान । येती भक्त तुझे, करती भावे तीर्थ स्नान । स्नान करुनी भक्त, घेतात तुझे दर्शन भिक्षा मागुनी गावात , करती ते भोजन । भूतबाधा, चिंता, खूप घेऊन येती भक्तगण । पीडा आपुल्या मिटवती, येती तुला शरण । भक्ताच्या हृदयात असे, सदा तुझा वास ।

नृसिंहवाडीस येती, त्याना लाभे सहवास । अनुष्ठान करे वाडीस, घेती तुझे जपनाम । समाधान पावती जेंव्हा, होई पूर्ण ते काम । पावन स्थानापैकी एक, असते हो औदुंबर । चुकवत नसे दर्शन, तुझे ते भक्त दिगंबर । हजार पायऱ्या चढून, येती भक्त गिरनारास । विसरती कष्ट देहाचे, घेताच तव दर्शनास । कृपा तुझी आम्हावर, राहो देवा दत्तात्रया । विसरणार नाही तुला, या तिन्ही कालत्रया ।

दत्ताची आरती श्रीगुरुदत्त राजमुर्ती ३

श्रीगुरुदत्त राजमुर्ती, ओवाळीतो प्रेमे आरती ।। धृ ।। ब्रह्मा विष्णू शंकराचा । असे अवतार श्री गुरूचा ।। कराया उद्धार जगताचा । जाहला बाळ अत्री ऋषीचा ।। धरीला वेश असे यतीचा । मस्तकी मुकुट शोभे जटीचा ।। कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत वरुनी तेणे भक्तांचे क्लेश हरूनि त्यासी करुनी नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती ।। १ ।। गांणगापुरी वस्ती ज्याची प्रीती औदुंबर छायेची । भीमा अमरजा संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची । वाट दावूनिया योगाची । ठेव देतसे निजभक्तीची ।। काशी क्षेत्री स्नान करितो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो ।। तरतरतरित छाती धर धरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूल जया हाती ।।  वाळीतो ।।२।। अवधूत स्वामी सुखानंदा । ओवाळीतो सौख्य कंदा तारी हा दास न रजकंदा सोडवी विषय मोहछंदा आलो शरण अत्रीनंदा दावी सदगुरू ब्रम्हानंदा ।। चुकवी चौर्यान्शीचा फेरा । घालिती षडरिपू मज घेरा, गांजिती पुत्रपौत्रदारा वदवी भजन मुखी तव पूजन करीत हे सुजन जयाचे बलवन्तावरती ओवाळीतो…


श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा

ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ || चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू ||१|| नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू ||२|| मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू ||३|| जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू ||३|| एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू ||५||


श्री रामदासाची आरती

*श्री रामदासाची आरती*

 आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ || साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती ||१|| वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले ||२|| ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय ||३|| आरती रामदासा ||

श्री गोस्वामी तुलसीदास जी द्वारा रचित


श्री शनिदेवाची आरती

 श्री शनिदेवाची आरती

 जय जय श्रीशनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा | आरती ओवाळिती | मनोभावे करुनी सेवा || धृ || सूर्यसुता शनीमूर्ती || तुझी अगाध कीर्ती | एक मुखे काय वर्णू | शेषा न चले स्फूर्ती || जय || नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा | ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय ||२|| विक्रमासारीखा हो शककर्ता पुण्यराशी | गर्व धरितां शिक्षा केली | बहु छळियले त्यासी || जय ||३|| शंकराच्या वरदाने | गर्व रावणे केला | साडेसाती येतां त्यासी | समूळ नाशासी नेला || जय ||४|| प्रत्यक्ष गुरुनाथा | चमत्कार दावियेला | नेऊनि शूलापाशी | पुन्हा सन्मान केला || जय ||५|| ऐसे गुण किती गाऊ | धनी न पुरे गातां || कृपा करी दीनावरी | महाराजा समर्था || जय ||६|| दोन्ही कर जोडूनिया रखमां लीन सदा पायीं | प्रसाद हाची मागे | उदयकाळ सौख्य दावी | जय जय श्री शनिदेवा | पद्मकर शिरी ठेवा ||७||


देवी च्या आरत्या

 आरती महालक्ष्मीची
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता

 जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता | प्रसन्न होऊनिया वर देई आता || धृ || विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता | धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता || १ | विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही | धावसी आम्हालागी पावसी लवलाही ||२|| त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभो  सुखशांती  | सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती ||३|| वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे | देसी दान वरदे सदैव सौख्याचे ||४|| यास्तव अगस्ती बंधू आरती ओवाळी | प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ||

देवीची आरती दुर्गे दुर्घट १

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्म मरणांते वारी । हारी पडलों आतां संकट निवारी ॥१॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवर-ईश्वरवरदे तारक संजिवनी ॥धृ॥

त्रिभुवन भुवनी पाहतां तुजऐशी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करितां पडले प्रवाही । ते तु भक्तांलागी पावसि लवलाही ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडविं तोडीं भवपाशा । अंबे तुजवांचुन कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥३॥

उदो बोला उदो, अंबाबाई माउलीचा हो ।उदो कारे गर्जती, काय महिमा वर्णू तिचा हो ।उदो बोला उदो ॥ धृ॥

दुर्गेची आरती

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली / उदो बोला उदो .

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून, घटस्थापना ती करूनी हो ।मूलमंत्रजप करूनी, भोवते रक्षक ठेवोनी हो । ब्रम्हा विष्णु रूद्र, आईचे पूजन करती हो ॥१॥ उदो बोला.॥धृ॥

द्वितीयेचे दिवशी, मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।कस्तुरी मळवट, भांगी शेंदूर भरूनी हो । उदो कारे गर्जती, सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥  उदो बोला….. ॥ धृ ॥

तृतीयेचे दिवशी, अंबे श्रृंगार मांडिला हो । मळवट पातळ चोळी, कंठी हार मुक्ताफळा हो ।कंठीचे पदके कासे, पितांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती, अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ ३॥ उदो बोला ॥धृ॥

चतुर्थीचे दिवशी, विश्वव्यापक जननी हो,। उपासका पाहसी, अंबे प्रसन्न अंतकरणी हो ।पूर्णकृपे तारिसी, जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊली, सुर ते येती लोटांगणी हो ।।४॥ उदो बोला… ॥धृ॥

पंचमीचे दिवशी, व्रत ते उपांगललिता हो । अर्घ्य पाद्य पूजने, तुजला भवानी स्तविती हो ।रात्रीचे समयी, करिती जागरण, हरिकथा हो । आनंदे प्रेम ते, आले सद्भावे क्रीडता हो ।।५॥ उदो बोला उदो… ॥धृ॥

षष्ठीचे दिवशी, भक्ता आनंद वर्तला हो । घेऊनी दिवट्या हस्ती, हर्षे गोंधळ घातला हो ।कवडी एक अर्पिता, देसी हार मुक्ताफळा हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ।।६॥ उदो बोलाउदो..॥धृ॥

सप्तमीचे दिवशी, सप्तश्रृंग गडावरी हो । तेथे तू नांदसी, भोवती पुष्पे नानापरी हो । जाई जुई शेवंती, पूजा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलूनी घेसी वरचे वरी हो ।।७॥  उदो बोला उदो……. ॥धृ॥

अष्टमीचे दिवशी, अष्टभुजा नारायणी हो । सह्य्राद्री पर्वती, पाहिली उभी जगत् जननी हो ।मन माझे मोहीले, शरण आलो तुजलागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी केले अंतःकरणी हो ।।८॥  उदो बोला उदो .

नवमीचे दिवशी, नव दिवसांचे पारणे हो । सप्तशती जप, होमहवने सद्भक्ती करुनी हो । षड्रस अन्ने नैवेद्यासी, अर्पियली भोजनी हो । आचार्य ब्राह्मणा, तृप्त केले कृपेकरुनी हो ।।९॥  उदो बोला उदो. ॥धृ॥

दशमीचे दिवशी, अंबा निघे सिमोल्लंघनी हो । सिंहारूढ करी दारुण, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो । शुंभ निशुंभादिक राक्षसा, किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा, आश्रय दिधला तव चरणी हो ।।१०॥ उदो बोला उदो….. ॥धृ॥

महालक्ष्मीची देवीची

आरती २
जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी 

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥ करविरपुरवासिनी सुरवरमुनि-माता । पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता । कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता । सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं । झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी । शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी । सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी । गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥

अमृत-भरिते सरिते अघदुरितें वारीं । मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं वारी मायापटल प्रणमत परिवारी । हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥ चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी । लिहिल्या असतील माते माझे निजभाळी पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

रेणुका मातेची आरती

जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती । वज्रचुडेमंडित तव,गिरिशिखरेवसती॥१॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ भाग्यवती तूं जननी, परशुरामाची । तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी । तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला । मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते । आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥

 श्री संतोषीमातेची प्रासादिक आरती*

जय देवी श्रीदेवी संतोषी माते | वंदन भावे माझे तंव पद कमलाते || धृ || श्रीलक्ष्मीदेवी तू श्रीविष्णुपत्नी || पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी || जननी विश्वाची तू जीवन चितशक्ती | शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती ||१|| भृगुवारी श्रद्धेने उपास तंव करिती | आंबट कोणी कांही अन्न न सेविती || गूळचण्याचा साधा प्रसाद भक्षिती | मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ||२|| जें कोणी नरनारी व्रत तंव आचरिती | अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थिती || त्यांच्या हाकेला तू धावूनिया येसी | संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ||३|| विश्र्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे | भवभय हरुनी आम्हा सदैव रक्षावे || मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी | म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ||४||


रामायणाच्या आरत्या

श्री रामायण जी की आरती

आरती श्री रामायण जी की । कीरति कलित ललित सिय पी की ।।
गावत ब्रहमादिक मुनि नारद । बाल्मीकि बिग्यान बिसारद ।।
शुक सनकादिक शेष अरु शारद । बरनि पवनसुत कीरति नीकी ।।1
आरती श्री रामायण जी की……..।।
गावत बेद पुरान अष्टदस । छओं शास्त्र सब ग्रंथन को रस ।।
मुनि जन धन संतान को सरबस । सार अंश सम्मत सब ही की ।।2
आरती श्री रामायण जी की……..।।
गावत संतत शंभु भवानी । अरु घटसंभव मुनि बिग्यानी ।।
ब्यास आदि कबिबर्ज बखानी । कागभुशुंडि गरुड़ के ही की ।।3
आरती श्री रामायण जी की……..।।
कलिमल हरनि बिषय रस फीकी । सुभग सिंगार भगति जुबती की ।।
दलनि रोग भव मूरि अमी की । तात मातु सब बिधि तुलसी की ।।4
आरती श्री रामायण जी की……..।।


कर्पूर आरत्या

कर्पूरगौरं करुणावतारं

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् .
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि ..

त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेन्द्रियैवा बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात । करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ॥३॥ अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् । श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥४॥ हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥५॥

मंत्रपुष्पांजलि

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त

देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासान् । ते ह नाकं महिमान: सचंत । यत्र पुर्वे साध्या: संति देवा: । ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने  नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान् कामकामाय  मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम:। ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं  वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं  माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथिव्यै समुद्रपर्यताया एकराळिती । तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुत:परिवेष्टारो मरुत्तस्सावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति॥


साईबाबांची आरती

साईबाबांची आरती

आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा । चरणरजतळीं निज दासां विसावां । भक्तां विसावा ॥धृ॥ जाळुनियां अनंग । स्वस्वरुपी राहे दंग । मुमुक्षुजना दावी । निजडोळां श्रीरंग ॥१॥  जया मनीं जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाघना । ऐसी ही तुझी माव ॥२॥ तुमचें नाम ध्यातां । हरे संसृतिव्यथा । अगाध तव करणी । मार्ग दाविसी अनाथा ॥३॥ कलियुगीं अवतार । सगुणब्रह्म साचार । अवतीर्ण झालासे । स्वामी दत्त दिगंबर ॥४॥ आठा दिवसां गुरुवारी । भक्त करिती वारी । प्रभुपद पहावया । भवभय निवारी ॥५॥ माझा निजद्रव्य ठेवा । तव चरणसेवा । मागणें हेंचि आता । तुम्हा देवाधिदेवा ॥६॥ इच्छित दीन चातक । निर्मळ तोय निजसुख । पाजावें माधवा या ।सांभाळ आपुली भाक ॥७॥


गजानन महाराजांची आरती

गजानन महाराजांची जय जय सत्-चित् आरती १

जय जय सत्-चित् स्वरूपा स्वामी गणराया।अवतरलासी भूवरी जड-मूढ ताराया॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी । ते तू तत्व खरोखर नि:संशय अससी । लीलामात्रे धरिले मानव देहासी॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा । करूनी “गणि गण गणात बोते”या भजना । धाता हरिहर गुरूवर तूचिं सुखसदना । जिकडे पहावें तिकडे तूं दिससी नयना॥२॥ लीला अनंत केल्या बंकट सदनास । पेटविलें त्या अग्नीवांचूनि चिलमेस । क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥३।। व्याधि वारुन केले कैका संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल-दर्शन । भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन॥४॥

गजानन महाराजांचे भजन

गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुतें । या श्रेष्ठ गजानन गुरुतें । तुम्ही आठवित रहा यातें । हे स्तोत्र नसे अमृत तें । मंत्राचि योग्यता यातें । हे संजिवनी आहे नुसतें । व्यावहारिक अर्थ न याते । मंत्राचि योग्यता कळते । जो खराच मांत्रिक त्यातें । या पाठे दु:ख ते हरतें । पाठका अति सुख होतें । हा खचित अनुग्रह केला । श्रीगजाननें तुम्हाला । घ्या साधून अवघे याला । मनिं धरून भावभक्तीला । कल्य़ाण निरंतर होई । दु:ख ते मुळी नच राही ॥ असल्यास रोग तो जाई । वासना सर्व पुरतिलही । आहे याचा अनुभव आला । म्हणूनिया कथिततुम्हाला ॥ तुम्ही बसुन क्षेत्र शेगांवी । स्तोत्राची प्रचिती पहावी । ही दंतकथा ना लवही । या गजाननाची ग्वाही ॥

गजानन महाराजांची भूपाळी

उठा उठा हो सद्गुरुराया सरली ती राती ॥ दयाळा॥ उष:कालचा वाहे वारा कुक्कुट ओरडती ॥धृ॥ सूर्य सारथी अरुणा पाहून प्राची निजचित्ती ॥ गेला होऊन अति आनंदित तें मी वानुं किती ॥१॥ उलुक पिंगळे झाले भयभित पाहून अरुणाला। प्राचि प्रांत तो सद्गुरुराया लालिलाल झाला ॥२॥ चक्रवाक चंडोल पक्षि ते प्रभात कालाला । सूर्या बघण्या आतुर होऊनि घालिती घिरट्याला ॥३॥ तेवीं बघण्या तुला पातले भक्त तुझे द्वारी । दर्शन देउनि तयास तारा गणु म्हणे संसारी ॥४॥


स्वामी समर्थांची आरती

अक्कलकॊट स्वामी समर्थांची आरती

जय देव जय देव जय श्रीस्वामीसमर्था । आरती ओवाळूं चरणी ठेवुनियां माथा ॥धृ॥
छेली खेडेग्रामीं तूं अवतरलासी ।
जगदुद्धारासाठीं राया तू फिरसी ।
भक्तवत्सल खरा तूं एक होसी ।
म्हणुनि शरण आलों तुझे चरणासी ॥१॥

ञैगुणपरब्रह्म तूझा अवतार ।
त्याची काय वर्णूं लीला पामर ।
शेषादिक शिणले ।नलगे त्या पार ।
तेथें जडमूढ कैसा करुं मी विस्तार ॥२॥

देवादीदेव तूं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।
शरणागता तारीं तूं स्वामीराया ॥३॥

अघटित लीला करूनीं जडमूढ उद्धरिले ।
कीर्ती ऐकुनि कानी चरणीं मी लोळें ।
चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ।
तुझ्या सुता नलगे चरणा वेगळें ॥४॥


नृसिंह सरस्वती स्वामी आरती

नृसिंह सरस्वती स्वामी आरती

कृष्णापंचगंगासंगम निजस्थान ।
चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
तेथें भक्तश्रेष्ठ त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधलें दर्शन ॥१॥

जय देव जय देव जय सद्‌गुरु दत्ता । नृसिंह सरस्वति जय विश्वंभरिता ॥ धृ. ॥

वंध्या साठी वर्षे पुत्रनीधान ।
मृत ब्राह्मण उठवीला तीर्थ शिंपून ॥
वांझ महिषी काढवि दुग्ध दोहोन ।
अंत्यवक्रें वदवी निगमागम पूर्ण ॥ जय. ॥२॥

शुक्लाकाष्टीं पल्लव दावुनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही ॥
अभिनव महिमा त्याचा वर्णूं मी कायी ।
म्लेंच्छराजा येउनि वंदी श्रीपायीं ॥ जय देव ॥३॥

दिपवाळींचे दिवशीं भक्त येउनि ।
आठहि जण ठेवीत मस्तक श्रीचरणीं ॥
आठहि ग्रामीं भिक्षा केली तद्दीनीं ।
निमिषमात्रे तुंतक नेला शिवस्थानीं ॥ जय. ॥४॥

ऎसे चरित्र दावुनि जडमुढ उद्धरिले ।
भक्तवत्सल ऎसे ब्रीद मिरविलें ॥
अगाध महिमा म्हणउनि वेदश्रुति बोले ।
गंगाधरतनय सदा वंदी पाउलें ॥५॥


तुळसीची आरती

तुळसीची आरती १

जय देवी जय देवी जय माये तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।। धृ ।।

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ ।
सेवा करिती भावें सकळही नरनारी ।
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं ।। १ ।

जय देवी जय देवी जय माये तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।। धृ ।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ।

तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ ।। २ ।।

जय देवी जय देवी जय माये तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।। धृ ।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी ।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं ।। ३ ।।

जय देवी जय देवी जय माये तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।। धृ ।।


प्रसाद

प्रसाद

मुखी वदावे भावे १

मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम ।
राम नामे जळतील पापे तोची जीवा विश्राम ।।धृ।। 

संसाराचा खेळ घडीचा इथेच हा राहणार ।
पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबरी येणार ।
संकट काळी धावोनी येईल कौश्ल्येचा राम  ।।१।।

अडकू नका हो  संसाराच्या जाळ्यामध्ये दाट ।
चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षपदाची वाट ।
भवसागर हा तारील तुम्हा भक्तांचा निर्धार ।।२।। राम नामे …

तुम्ही आम्ही हो सर्व प्रवासी एकच आपुले गाव । 
पैल तीराला नेईल आपुल्या राम प्रभूची नाव
नौकेच्या या नावाड्याला काय देऊ मी दाम ।।3।। राम….

पावला प्रसाद आतां विठो निजावें २

पावला प्रसाद आतां विठो निजावें । आपला तो श्रम कळों येताती जीवें ॥१॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥ तुम्हासी जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥२॥ तुका म्हणे दिलें उिच्छष्टाचें भोजन । नाहीं निवडिलें आम्हा आपुलिया भिन्न ॥३॥

पाहें प्रसादाची वाट ३

पाहें प्रसादाची वाट । द्दावें धुवोनियां ताट ॥१॥ शेष घेउनि जाइन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥ जालों एकसवा । तुम्हा आळवोनि देवा ॥२॥ तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निवांत॥३॥


सासस्द

आरती संग्रह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *