मंगलाचरण तिसरे वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

जयजय विठोबारखुमाई भजन म्हणावे

मंगलाचरण तिसरे

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

अभंग सूची मंगलाचरण तिसरे

अभंग सूची संख्या-५

१ उंच नीच काही नेणे भगवंत

२ श्रवणे कीर्तने झाले ते पावन

३  पवित्र तें कुळ पावन तो देश

४  बहु उतावीळ भक्ताचिया काजा

५  पुण्यवंत व्हावे । घेता

१ उंच नीच काही नेणे भगवंत

उंच नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनिया ।।१।। दासी-पुत्र कण्या विदुराच्या भक्षी ।दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ।।२।। चर्म रंगू लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागे शेले विणी ।।3।। सजन कसाया विकू लागे मांस । माळ्या सावत्यास खुरपू लागे ।।४।। नरहरी सोनारा घडू फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगे ढोरे ओढी ।।५।। नामयाची जनी सवे वेचे शेणी । धर्मा घरी पाणी वाहे झाडी ।।६।। नाम्यासवे जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियांची भिंत अंगे ओढी ।।७।। अर्जुनाचे रथी होय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ।।८।। गौळीयांचे घरी अंगे गायी वळी । व्दारापाळ बळी व्दारी जाला ।।९।। येंकोबाचे ऋण फेडी ऋषीकेशी । आंबऋषीचे सोशी गर्भवास ।।१०।। मीराबाई साठी घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ।।११। घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी।।१२।। पुंडलिका साठी अझुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ।।१३।।

 २ श्रवणे कीर्तने झाले ते पावन

श्रवणे कीर्तने झाले ते पावन । सनकादिक जाण परम भक्त ।।१।। जाली ते विश्रांती याचका सकळा । जीवी जीवनकळा श्रीमूर्तीरया ।।२।। पादसेवने अक्रूर जाला ब्रम्हरूप । प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे ।।3।। सख्यपणे अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दन एकरूप ।।४।। दास्यत्व निकट हनुमंते पै केले । म्हणुनी देखिले रामचरण ।।५।। बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषणावरद चंद्रार्क ।।६।। व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकादिक । आणि पुंडलिक शिरोमणी ।।७।। शुकादिक योगी रंगीले श्रीरंगी । परिक्षितीच्या अंगी ठसावले ।।८।। उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरूप ।।९।। अनंत भक्त राशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ।।१०।।

३  पवित्र तें कुळ पावन तो देश

पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरीचे दास जन्म घेती ॥१॥ कर्म धर्म त्यांचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥२॥ वर्ण अभिमानें कोण झाले पावन । ऎसें द्या सांगुन मजपाशी ॥३॥ अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनें । तयाची पुराणे भाट झालीं ॥४॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धार हा चांभार रोहिदास ॥५॥ कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६॥ कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदु हरीचे पायीं ॥७॥ चोखामेळा वंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऎक्य करी ॥८॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तिये सवें ॥९॥ मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचें काय सांगों ॥१०॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऎसा वेदशास्त्रीं ॥११॥ तुका म्हणे तुम्ही विचारावें ग्रंथ । तारिलें पतित नेणो किती ॥१२॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

४  बहु उतावीळ भक्ताचिया काजा

बहु उतावीळ भक्ताचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ।।१।। तुझ्यापायी मज झालासे विश्वास । म्हणोनिया आस मोकलिली ।।२।। ऋषी मुनी सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ।।3।। नाही नाश ते सुख तयास । जाले जे उदास सर्वभावे ।।४।। तुका म्हणे सुख न माये मानसी । धरिले जीवेशी पाय तुझे ।।५।।

५  पुण्यवंत व्हावे । घेता

पुण्यवंत व्हावे । घेता सज्जनाचे नावे ।।१।। नेघे माझी वाचा तुटी । महा लाभ फुका साठी ।।२।। विश्रांतीचा ठाव । पायी संतांचिया भाव ।।३।। तुका म्हणे पापे । जाती संतांचिया जपे ।।४।।

मंगलाचरण तिसरे समाप्त

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

भजनी मालिका मंगलचरण 1, 2, 3

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *