संत निवृत्तीनाथ निवडक अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत निवृत्तीनाथ निवडक अभंग

रामनाम मुखिं तो एक

रामनाम मुखिं तो एक संसार । येऱ्हवीं अघोर नरक राया ॥१॥ संसार नरक रामनाम सार । तरले पामर पतित देखा ॥२॥ हरिनाम हेंचि शास्त्र पैं जयाचें । तयासी यमाचें भय नाहीं ॥३॥ अजामेळू नामें तरला पतित । नारायण त्वरित आले तेथें ॥४॥ उघडा मोक्षमार्ग गोविंद स्मरणें । रामनाम कीर्तनें मोक्षपद ॥५॥ निवृत्ती सतत रामनाम महिमा । अवघीच पूर्णिमा हरिपाठ ॥६॥


नित्य नाम वाचे तोचि एक

नित्य नाम वाचे तोचि एक धन्य । त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥१॥ रामनाम कीर्ती नित्यमंत्र वाचे । दहन पापाचें एका नामें ॥२॥ ऐसा तो नित्यता पढे तत्वनाम । नाहीं तयासम दुजें कोणी ॥३॥ निवृत्ती अव्यक्त रामनाम जपे । नित्यता तैं सोपें रामनाम ॥४॥


भाव भक्ती प्रेमा दया शांती

भाव भक्ती प्रेमा दया शांती क्षमा । अखंडित प्रेमा असो द्यावा ॥१॥ सर्वाभूतीं भजन करावें सर्वथा । रामनाम कथा आरंभाव्या ॥२॥ आपपर देहीं विचार करावा । हरिनामें दोहावा सर्वारूपीं ॥३॥ निवृत्तीचें जाप्य आनु नाहीं चितीं । रामनामें तृप्ति सदा असे ॥४॥

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *