गौळणी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान
गौळणीची अभंग सूची

१ ऐक एक सखये बाई
२ भूल‍वलें वेणुनादे
३ गोधनें चाराया जातो
४ तुझ्या मुरलीचा ध्‍वनी
५ धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे
६ कैसी जाऊं मी वृंदावना
७ कोणी एक भुलली नारी
८ माझें अचडें छकुडें ग राधे रुपडें
९ वृंदावनीं वेणू कोणाचा बाईं
१० भक्ताकारणें येणें घेतलीसे आळी
११ कृष्ण माझा कणकण करितो
१२ गाई गोपाळ यमुनेच्या तटी
१३ गोधनें चारावया जातो सारंगपाणी
१४ गौळणी म्हणती गौळणीला
१५ जात होतें पानियां तेथें भेतला सांवला 
१६ तळवे तळहात टेंकितों
१७ दुडीवर दुडी गौळणी साते जे निघाल्या
१८ नको बाजवूं कान्होबा मुरली
१९ रडत माझें बाळ तान्हें
२० राधे तुझा रंग पाहून कृष्ण दंग झाला
२१ राधे तुला पुसतो घोंगडीवाला
२२ वारियानें कुंडल हाले
२३ कान्हा चालो मारा घेरे काम छे
२४ कान्हा बन्सरी बजाय गिरिधारी
२५ कुबजाने जादू डारा
२६ जाके मथुरा कान्हाने घागर फोरी
२७ झुलत राधा संग
२८ तुम बिन कौन खबर
२९ पिहुकी बोलिन बोल प्रभुजी
३० पिहुकी बोलिन बोल पपैया
३१ पग घुंगरु रे पग घूंगरु बांधकर नाची

१ ऐक एक सखये बाई

ऐक एक सखये बाई । नवल मी सांगू काई ।
त्रेलोक्‍याचा धनी तो हा । यशोदेसी म्‍हणतो आई ॥१॥
देवकीने वाहीला । यशोदेनें पाळिला ।
पांडवांचा बंदीजन । होऊनियां राफिला ॥२॥
ब्रह्मांडाची साठवण । योगियाचें निजधन ।
चोरी केली म्‍हणऊनी उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थे जया चरणी । सुलभ हा शूळपाणी ।
राधिकेसी म्‍हणे तुझी । करीन मी वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनी । कैवल्‍याचा मोक्षदानीं ।
गाई गोप गोपाबाळां । मेळविले आपुलेपणीं ॥५॥

२ भूल‍वलें वेणुनादे

भूल‍वलें वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्‍चळ ॥२॥
तुणचरें लुब्‍ध जालीं । पुच्‍छ वाहुनियां ठेलीं ॥३॥
नाद न समायें त्रिभुवनीं । एका भुलला जनार्दनीं ॥४॥

३ गोधनें चाराया जातो

गोधनें चाराया जातो शारंगपाणि । मार्गी भेटली राधिका गौळणी ।
कृष्‍ण दान मागे निरी आसडोनी । तंव ती देखिली यशोदा जननी हो ॥१॥
यशोदा म्‍हणे नाटका ऋषीकेशी । परनारीसी कैसा रे झोंबसी ।
येऊ रुदत सांगतो मातेपासी । माझा चेडु लपि‍वला निरीपाशीं हो ॥२॥
राधीका म्‍हणे यशोदे परियेसी । चेंडू नाही नाही वो मजपाशीं ।
परि हा लटिका लबाड ऋषीकेशी । निरी आसडितां चेंडु पडे धरणीसी हो ॥४॥
यशोदा म्‍हणे चाळका तुम्‍हीं नारी । मार्गी बैसता क्षण एक मुरारी ।
एका जनार्दनीं विनवी श्रीहरी । नाम घेतां पातकें जाती दूरी हो ॥५॥

४ तुझ्या मुरलीचा ध्‍वनी

तुझ्या मुरलीचा ध्‍वनी । अकल्पित पडली कानीं ।
विव्‍हळ झालें अंत:करणीं । मी घरधंदा विसरलें ॥१॥
अहा रे सावळीया कैसी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरिला माझा प्राण ।
संसार केला दाणादीन । येऊनि ह्र्दयीं संचरली ॥३॥
तुझ्या मुरलीचा सूरतान । मी विसरलें देहभान ।
घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेलें ॥४॥
एका जनार्दनीं गोविंदा । पतितपावन परमानंदा ।
तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥५॥

५ धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे

धिंग्याचे धिंगुले खांद्यावर कांबुळे || नाचत तान्हुले येश्वदेचा || ग बाई येश्वदेचा ||१||
येती गवळणी करती बुझावणी || लागती चरणीं गोविंदाच्या || ग बाई गोविंदाच्या ||२||
गोविंद बाळिया वाजविती टाळिया || आमुचा  कान्हा देवराव || ग बाई देवराव ||३||
कटी दोरा बिंदली वाघनखे साजिरीं | नाचतो श्रीहरी येश्वदेचा || ग बाई येश्वदेचा ||४||
पायीं घागरिया वांकी साजरिया || कानींच्या बाळिया ढाल देती || ग बाई ढाळ देती ||५||
एका जनार्दनी एकत्व शरण || जीवें लिंबलोण उतरिती | ग बाई उतरिती ||६||

६ कैसी जाऊं मी वृंदावना

 कैसी जाऊं मी वृंदावना || मुरली वाजवितो कान्हा || धृ॰ ||
पैल तिरीं हरी वाजवी मुरली | नदी भरली जमुना ||१||
कांसे पितांबर केशरी टिळक || कुंडल शोभे काना ||२||
काय करूं बाई कोणाला सांगू || नामाची सांगड आणा ||३||
नंदाच्या हरीनें कौतुक केलें || जाणे अंतरींच्या खुणा ||४||
एका जनार्दनी म्हणा || देवमहात्म्य कळेना कोणा ||५||

७ कोणी एक भुलली नारी

कोणी एक भुलली नारी || विकितां गोरस घ्या म्हणे हरी ||१||
देखिला डोळां बैसलां मनीं || तोचि वदनीं उच्चारी ||२||
आपुलियाचा विसर भोळा || गोविंद कळा कौतुकें ||३||
तुका म्हणे हांसे जन || नाहीं कान ते ठाई ||४||

८ माझें अचडें छकुडें ग राधे रुपडें 

माझें अचडें छकुडें ग राधे रुपडें || पांघरू घालितें कुंचडें || धृ॰ ||
हरि माझा गे सांवला || पायीं पैंजण बाजती खुळखुळा |
यानें भुलविल्या गोपी बाळा || माझे॰ ||१||
हरि माझा गे नेणता || करि त्रिभुवनाचा घोंगता ||
जो काआ नांदे त्रिभुवनी || मा॰ ||२||
ऐसे देवाजीचे गडी || पेंद्या सुदामाची जोडी ||
बळीभद्र त्याचा गडी || मा॰ ||३||
जनी म्हणी तूं चक्रपाणी || खेळ खेळ खेळतो वृंदावनीं ||
लुब्ध झाल्या त्या गौळणी || माझे॰ ||४||

९ वृंदावनीं वेणू कोणाचा बाईं

वृंदावनीं वेणू कोणाचा बाईं वाजे || वेणू नादें गोवर्धन गाजे ||
पुच्छ पसरुनी मयूर विराजे || मजा पाहतां भासती यादव राजे ||१||
तृण चारा चरुं विसरलीं || गाई व्याघ्र एके ठायीं झालीं ||
पक्षींकुळें निवांत राहिलीं || वैरभाव समूळ विसरलीं ||२||
तेथें यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे || रविमंडळ चालतां स्तब्ध होय ||
मत्स्य कूर्म वराह स्तंभित राहे || बाळा स्तनपान देऊं विसरली माय ||३||
वांक्या रुणझुण रुणझुण वाजती || ध्वनी मुंजळ मुंजळ उमटती ||
देव विमानीं बैसूनि स्तुति गाती || भानुदासी लाधली प्रेमभक्ती ||४||

१० भक्ताकारणें येणें घेतलीसे आळी

 भक्ताकारणें येणें घेतलीसे आळी || दहा गर्भवास सोशी वनमाळी ||१ ||
माझ्या कान्ह्याचें नांव तुम्ही बरें घ्या गे || हृदयी धरुनि यासी खेळावया न्या गे ||२||
कल्पने विरहित भलतिया मागें || अभिमान सांडूनि दीनापाठी लागे ||३||
शोषियेली पुतना मोडियेले तरू || आलिंगन दे सवे बापरखुमादेवीवरु ||४||

११ कृष्ण माझा कणकण करितो

 कृष्ण माझा कणकण करितो , दृष्ट झाली कीं काय गे || कृष्ण॰ || धृ॰ ||
रामरक्षा असे मिळोनी , कुणी तरी करा उपाय गे ||
मीठ मोहऱ्या मिरच्या उतरून देईन ब्राम्हणा गाय गे || कृष्ण॰ ||१||
लावा अंगारा मार्ग मलिन मी पूजिन सटली माय गे ||
मेंढा कोंबडा बळी म्यां देतें कृपा करिल मनुराजे गे || कृष्ण॰ ||२||
आली राधिका दृष्ट उतरली उठुनी उभा राही गे ||
हांसत चालिला राधिके संगें वंदूं यदुपतिपाय गे || कृष्ण॰ ||३||

१२ गाई गोपाळ यमुनेच्या तटी

गाई गोपाळ यमुनेच्या तटी || येती पाणिया मिळून जगजेठी ||
चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी || चला म्हणती पाहूं दृष्टीं ||१||
ऐशा गोपिका त्या कामातुर नारी || धृ॰ ||
चित्ता विव्हळ त्या देखाव्या हरी || मीस पाणियाचें करिताती घरीं ||
बारा सोळा मिळूनी परस्परीं ||२||
चीरें चोळीया त्या धुतां विसरती || ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्ण मूर्तिं ||
कोणा न ठावें कोण कुल जाती || झाल्या तटस्थ सकळ नेत्रपातीं ||३||
दंत धुवण्याचा मुखामाजी हात ||  वाद्यें वाजती न ऐकती जन्मांत ||
करी श्रवण कृष्ण वेणू गीत || स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ || ऐशा॰ ||४||

१३ गोधनें चारावया जातो सारंगपाणी

 गोधनें चारावया जातो सारंगपाणी || मार्गी भेटली राधिका गौळणी ||
कृष्ण दान मागे निरी आसडूनी || तंव देखिली येश्वदा जननी हो ||१||
येश्वदा म्हणे नाटकी हुशिकेशी परनारीसी कैसा धुंडीसी ||
येरुं रुदोनी सांगतो मातेसी || माझा चेंडू लपवी निरीपाशीं हो ||२||
राधिका म्हणे येश्वदे परियेसी || परि हा लटिका लबाड हृषीकेशी ||
चेंडू नहीं नहीं हो मजपाशीं || निरी आसडीतां चेंडूं पडे धरणीसी ||३||
येश्वदा म्हणे चेटकी तुम्ही नारी || मार्गी क्षणेक येतां मुरारी ||
एका जनार्दनी विनवी हरी || नाम घेता पातकें पळती दुरी ||४ ||

१४ गौळणी म्हणती गौळणीला

 गौळणी म्हणती गौळणीला || येशोदेशी पुत्र झाला ||१||
एक धांवती एकीपुढे || एक वांटीती सुंडवडे ||२||
वाणें घेऊनिया ताटी || नंदाघरी झाली दाटी ||३||
ऐसी गलबला झाली || दासी जनी हेल घाली ||४||   

काय सांगू तूतें बाई – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ८९६


काय सांगू तूतें बाई । काय सांगू तूतें ॥ध्रु०॥
जात होते यमुने पाणिया वातत भेतला सावला ।
दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावरी कांबला ॥१॥
तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली ।
पलतां पलतां घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥
माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले ।
तिकुन आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥
मला पोताशीं धलिलें माझें समाधान केलें ।
निवृत्तीचे कृपें सुख हें ज्ञानदेवा लाधले ॥४॥

अर्थ:-

एक लहान बोबडी गौळण म्हणते. बाई, तुला मी सांगू.
मी यमुनेच्या पाण्यासाठी जात असतांना मला वाटेत सांवळ्या रंगाचा श्रीकृष्ण भेटला.
त्याच्या डोक्यांवर मोर पिसाची टोपी असून, खांद्यावर कांबळी होती.
त्याने माझी थट्टा केल्यावर मी तेथून पळाली,
पळत असतांना मी अडखळून पडल्यामुळे माझ्या डोक्यावरची घागरही फुटून गेली.
माझे गुडघे फुटले. म्हणून मी तिथेच रडत बसली.
मग कुठून तरी श्रीकृष्ण आले. व त्यानी मला पोटाशी धरले.
श्रीकृष्णाने त्या लहान गौळणीस पोटाशी धरुन तिचे समाधान केले.
त्याप्रमाणे मला सुद्धा श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेने हे सुख लाभले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.|

१६ तळवे तळहात टेंकितों

तळवे तळहात टेंकितों || डाव्या गुड्घ्यानें रंगतो ||
रंगनीं रंगनाथ आज म्यां देखियेले सये ||१||
यानें माझें कवाड उघडिलें || यानें माझें शिंकें गे तोडिलें
दह्या दुधातें भक्षिलें || उलंडीलें ताकातें ||२||
एका हातीं लोण्याचा कवळ || मुखें माखिला अलुमाल ||
चुंबन देतां येतो परिमळ || नवनीताचाग सये ||३||
गवळण यशवंती पैं सांगे || आलिया कृष्णाच्यानी मागें ||
येथेंयेणें हो श्रीरंगें || नवनीत भक्षिलें सये ||४||
ऐसें कांहीं मी जाणतें || यमुनापाण्या जंव जातें ||
धरून खांबासी बांधितें शिक्षा लावितें गोविंदा ||५||
तो हा पुराणप्रसिद्ध चोर || केशव नाम्याचा दातार ||
पंढरपुरी धरिला अवतार || भक्त पुंडलिका साठीं ||६||

१७ दुडीवर दुडी गौळणी साते जे निघाल्या

 दुडीवर दुडी गौळणी साते जे निघाल्या || गौळणी गौरस म्हणों विसरल्या ||
गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे || तंव हांसती नारी मथुरेच्यागे ||१||
दुडिया माझारीं कान्होबा झाला भारी || उचंबळे गौरस सांडे बाहेरी || गो॰ ||२||
एका जनार्दनी सबरस गौळणी || ब्रम्हानंद न समाये मनीं || गो॰ ||३||

१८ नको बाजवूं कान्होबा मुरली

 नको बाजवूं कान्होबा मुरली || नको॰ || धृ॰ ||
तुझ्या मुरलीनें सुद बुद हरली || हरली हरली || नको॰ ||१||
घरीं कंरीत होतें काम धंदा || तेथेंच मी गडबडले || नको॰ ||२||
घागर घेउनि पाणियाशी जातां || डोईवर घागर पाझरली || नको॰ ||३||
एका जनार्दनी पूर्ण कृपेनें || राधा गौळण घाबरली || नको॰ ||४||

१९ रडत माझें बाळ तान्हें

 रडत माझें बाळ तान्हें || समजाविते राहिना || धृ॰ ||
नानापरी समजाविते || मागेल तें खाया देतें ||
थोपटुनी निजवितें || परी हा उगा राहिना ||१ ||
नानापरी करितो छंद || रडतो हा स्फुंद स्फुंद ||
नेत्रांतुनी वाहे बिंद || परी डोळा लागेना ||२||
पोटीं धरूनियां दम || सर्वांगी सुटला घाम ||
एकाजनार्दनी प्रेम || यशोदेशीं माईना ||३||

२० राधे तुझा रंग पाहून कृष्ण दंग झाला

राधे तुझा रंग पाहून कृष्ण दंग झाला || राधे हरि दंग झाला || धृ॰ ||
वेणी फणी करूनि चांग || काजळ कुंकूं ल्याली भांग ||
अंगामध्यें चोळी तंग || दावि गोरा रंग हरिला || राधे॰ ||१||
राधे तुझा रंग झोक || कृष्ण पाहून लावी नोक ||
जरी पातळाचा झोंक || पदर सांवरिला || राधे॰ ||२||
मथुरेची गौळण थाट || शिरीं गोरसाचा माठ ||
चढून यमुनेचा घांट || पालवी हरीला || राधे तुझ्या॰ ||३ ||
मथुरेची गौळण वेडी || चालतांना || डोळे मोडी ||
गोपळनाथ भक्त गडी || चरणीं ठाव दिला || राधे॰ ||४||

२१ राधे तुला पुसतो घोंगडीवाला

  राधे तुला पुसतो घोंगडीवाला || घोंगडीवाला कांबळीवाला || राधे॰ || धृ॰ ||
जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं || वांटितो गोपाळकाला || राधे॰ ||१||
रात्री माझ्या मंदिरीं आला || निरोप सांगुनि गेला || राधे॰ ||२||
गळां वैजयंती माळा हाति घेऊनियां वेणू || नेसुनि पितांबर पिंवळा || राधे॰ ||३||
जनी म्हणे विठू हा धाला || गळां वैजयंती माळा || राधे ||४||

२२ वारियानें कुंडल हाले

 वारियानें कुंडल हाले | डोळे मोडित राधा चाले ||धृ॰||
राधेलापाहुनी भुलले हरि | बैल दोहितो आपुले घरीं ||१|| 
फणस गंभीर कर्दळी दाट || हातीं घेऊन सारंगीपाट ||२||
हरिला पाहुनी भुलली चित्ता | मंदिरीं घुसळी डेरा रिता ||३||
मन मिळालेंसे मना | एका भुलले जनार्दना ||४|| वारियानें॰ ||

 मीराबाई गौळणी

२३ कान्हा चालो मारा घेरे काम छे

कान्हा चालो मारा घेरे काम छे | सुंदर तारूं नाम छे || टेक ||
मारा अंगनमो तुलसीनो झाड छे | राधा गौळण मारुं नाम छे ||१||
आगले मंदिरमा ससरो सोवेलो छे | पाछलो मंदिर सामसुम छे ||२||
मोर मुकुट पितांबर शोभे | गले मोतनकी माळ छे ||३||
मारीके प्रभू गिरीधर नागर | चरणकमल चित्त जात छे ||४||

२४ कान्हा बन्सरी बजाय गिरिधारी

कान्हा बन्सरी बजाय गिरिधारी | तोरी बन्सरी लागे मोको प्यारी ||टेक||
दही दुध बेचने जाती जमुना | कानाने घागर फोरी ||१||
सिर पर घट घट पर झारी  उस्कुं उतार मुरारी ||२||
सास बुरीरे नदंद हटेली | देवर देवें मोको गारी ||३||
मीरा कहे प्रभु गिरिधारी नागर | चरण कमल बलहारी ||४||

२५ कुबजाने जादू डारा

कुबजाने जादू डारा | मोहे लीयो शाम हमारा ||धृ॰||
दिन नहीं चैन रैन निद्रा | तलपतरे जीज्व हमारा ||१||
निरमल नीर जमुनाजीको छांडयो | जाय पीछे जल खारा ||२||
इतगोकुळ उत मथुरा नागरी | छोड्योहो पीहुं प्यारा ||३||
मोर मुकुट पितांबर शोभे | जीवन ग्राण हमारा ||४||
मीराके प्रभु गिरीधर नागर | बिरह समुंदर सारा हो ||५||

२६ जाके मथुरा कान्हाने घागर फोरी

जाके मथुरा कान्हाने घागर फोरी | घागरिया फोरी दुलारी मोरी तोरी || धृ॰ ||
ऐसी रीत तुझे कौन सिखावे | किसान करत बलजोरी ||१||
सास हटेली ननंद चुगेली | दीर देवात मुजे गारी ||२||
मीरा काहे प्रभु गिरीधर नागर | चरणकमल चित्तहारी ||३||

२७ झुलत राधा संग

झुलत राधा संग | गिरीधर झुलत राधा संग || टेक ||
अबीर गुलालकी धूम मचाई | भर पिचकारी रंग ||१||
लल भाई ब्रिंदाबन जमुना | केशर चुवत रंग ||२||
नाचत ताल अधार सूरवर | धिमिधिमी बाजे मृदंग ||३||
मीरा काहे प्रभु गिरीधर नागर चरणकमलकूं दंग ||४||

२८ तुम बिन कौन खबर


तुम बिन कौन खबर ले गोवर्धन गिरिधारीर || धृ॰ ||
मोर मुकुट पितांबर शोभे | कुंडलकी छबी न्यारीरे ||१||
भारी सभामों द्रौपदी ठाडी | राखो लाज हमारीरे ||२||
मीराके प्रभु गिरिधर नागर | चरणकमल बलहारीरे ||३||

२९ पिहुकी बोलिन बोल प्रभुजी

पिहुकी बोलिन बोल, प्रभुजी | नाव किनारे लगाव || धृ॰ ||
नदिया गहेरी नाव पुरानी || डूबत जहाज तराव ||१||
ज्ञान ध्यानकी सांगड बांधी | दवरे दवरे आव ||२||
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर | पकरो उनके पांव ||३||

३० पिहुकी बोलिन बोल पपैया

 पिहुकी बोलिन बोल, पपैया || टेक ||
तैं खोलना मेरा जी डरत है | तनमन डांवा डोल || पपैया ||१||
तारे बिना मोकुं पीर आवत है | जियरा करूंगी मै मोल ||२||
मिरके प्रभु गिरिधर नागर | कामनी करत कलोल ||३||

३१ पग घुंगरु रे पग घूंगरु बांधकर नाची

पग घुंगरु रे पग घूंगरु बांधकर नाची ॥धृ॥
मैं अपने तो नारायणकी । हो गयी आपही दासी ॥१॥
विषका प्याला राजाजीने भेजा । पीबत मीरा हासी ॥२॥
लोग कहे मीरा भई रे बावरी । बाप कहे कुल नासी ॥३॥
मीराके प्रभु गिरिधन नागर । हरिचरणकी दासी ॥४॥

गाळणी व्हिडिओ

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

अक्षरसूचीमदतअनुक्रमणिकाईतर aapअभंग सूची गौळणी समाप्त

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *