जाते, जोहार, दळण वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

जाते

१ सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके

सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके ।
ओव्या गाऊ कवतिके  तू ये रे बाळ विठ्ठला ।।१।।

जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेट गे ।
लाउनी पांची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला ।।२।।

सासू आणि सासरा दीर तो तिसरा ।
ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बाळ विठ्ठला ।।३।।

प्रपंच दळण  दळीले पीठ ते भरिले ।
सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला ।।४।।

सत्वाचे आंदण ठेविले पुण्य ते वैरीले ।
पाप ते उतू गेले ये रे बाळ विठ्ठला ।।५।।

जनी जाते गाईल कीर्ती राहील ।
थोडासा लाभ होईल तू ये रे बाळ विठ्ठला ।।६।।

दळण अभंग

१ येई हो कान्हाई मी दळीन एकली

येई हो कान्हाई मी दळीन एकली ।
एकली दळितां शिणले हात लावी वहिली ॥धृ॥

वैराग्य जातें मांडुनि विवेक खुंटा थापटोनी ।
अनुहत दळण मांडुनी त्रिगुण वैरणी घातलें ॥१॥

स्थूळ सूक्ष्म दळियेलें देहकारणासहित ।
महाकारण दळियेलें औट मात्रेसहित ॥२॥

दशा दोन्ही दळिल्या व्दैत अव्दैतासहित ।
दाही व्यापक दळियेलें अहंसोहंसहित ॥३॥

एकवीस स्वर्ग दळियेले चवदा भुवनांसहित ।
सप्त पाताळें दळियेलीं सत्प सागरांसहित ॥४॥


बारा सोळा दळियेल्या सत्रवीसहित ।
चंद्र सूर्य दळियेले तारांगणांसहित ॥५॥

नक्षत्र वैरण घालुनी नवग्रहासहित ।
तेहतीस कोटी देव दळियेले ब्रम्हाविष्णुसहित ॥६॥

ज्ञान अज्ञान दळियेलें विज्ञानासहित ।
मीतूंपण दळियेलें जन्ममरणासहित ॥७॥

ऎसें दळण दळियेलें दोनी तळ्यासहित ।
एका जनार्दनी कांहीं नाहीं उरलें व्दैत ॥८॥

जोहार

जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा

जोहार मायबाप जोहार ।
मी सकळ सन्ताचा महार ।
सांगतों दृढ विचार ।
तो ऎका की जी मायबाप ॥१॥

माझा विचार नारदें ऎकिला ।
तो पुन:रुपा नाहीं आला ।
भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा ।
या विचारें बोधिलें की जी मायबाप ॥२॥

उपमन्यु बिभीषण ।
सर्वांमाजीं अर्जुन ।
आणिकही ऋषी सांगेन ।
सावध ऎका की जी मायबाप ॥३॥


पराशर विश्‍वामित्रादि जाण ।
या विचारें पावलें समाधान ।
हरिश्र्चंद्र शिबी सुखसंपन्न ।
झाले की जी मायाबाप ॥४॥

ऎशा विचारें चालले ।
ते पुनरपि नाहीं आलें ।
एका जनार्दनीं भले ।
ऎक्यपण कीं जी मायबाप ॥५॥

संपूर्ण काकड आरती अभंग गौळणी सहित

संपूर्ण वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *