मंगलाचरण दुसरे वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

विठोबा रखुमाई भजन म्हणा
मंगलाचरण  दुसरे प्रारंभ

अभंग सूची मंगलाचरण दुसरे
  1. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी
  2. राजस सुकुमार मदनाचा पुतळा
  3. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती
  4. आवडे हें रूप गोजिरें सगुण
  5. झणी दृष्टी लागो सगुणपणा
  6. पाहातां श्रीमुख सुखावलें सुख
  7. येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम
  8. नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव

१ सुंदर तें ध्यान उभे विटेवरी

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥ध्रु.॥
मकर कुंडलें तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

२ राजस सुकुमार मदनाचा पुतळा

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती ॥ध्रु.॥
मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥३॥
सकळ तुम्ही व्हागे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

३  सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं ह्र्दयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांही न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे॥३॥

४  आवडे हें रूप गोजिरें सगुण

आवडे हें रूप गोजिरें सगुण
पाहातां लोचन सुखावलें ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ।
जों मी तुज पाहें पांडुरंगा/वेळोवेळा ॥ध्रु.२॥
लांचावलें मन लागलीसे गोडी ।
तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥३॥
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी ।
पुरवावी आळी मायबापा॥४॥

५  झणी दृष्टी लागो सगुणपणा

झणी दृष्टी लागो सगुणपणा
तेणे माझ्या मना बोध केला ।।१।।
अनंत जन्माचे विसरलो दु:ख ।
पाहता तुझे मुख पांडुरंगा ।।२।।
योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी ।
तो तू आम्हापाशी मागे पुढे ।।३।।
नामा म्हणे जिवे करिन निंबलोण ।
विटेसहित चरण ओवाळीन ।।४।।

६  पाहातां श्रीमुख सुखावलें सुख

पाहातां श्रीमुख सुखावलें सुख
डोळीयांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस ।
अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध ।
गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥
महामळें/महाबळे मन होतें जें गादलें ।
शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन ।
विठ्ठल निधान सांपडलें ॥४॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

७  येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम

येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम
तेंचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनियां पाहीन तुझें मुख ।
तेंचि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥
कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती ।
ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहें रंगीं टाळी नाचेन उदास ।
हें देई हातांस पायां सुख/बळ॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव ।
आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥

८  नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव

नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव
मी भक्त तू देव ऐसे करी।।१।।
दावी रूप मज गोपिका रमणा ।
ठेऊ दे चरणा वारी माथा ।।२।।
पाहीन श्रीमुख देईन आलिंगन ।
जीवे निंबलोण उतरीन ।।३।।
पुसता सांगेन हित गुज मत ।
बैसोनी एकांत सुख गोष्टी ।।४।।
तुका म्हणे यासी न लावी उशीर ।
माझे अभ्यंतर जाणोनिया ।।५।।

जय जय विठोबार खुमाई भजन म्हणावे

मंगलाचरण दुसरे समाप्त

▶️संपूर्ण मंगलचरण दुसरे( ८ अभंग) -वाचा 👇

सुंदर ते ध्यान उभें विटेवरी मंगल च. दुसरे अभंग १

सुंदर ते ध्यान उभें विटेवरी।
कर कटावरी ठेवूनिया ॥१॥
तुळसीहार गळां कासे पीतांबर।
आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं।
कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥

मंगल च. दुसरे अभंग २

राजस सुकुमार मदनाचा पुतळा।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी।
रुळे माळ कंठीं वैजयंती ॥२॥
मुकुट कुंडलें श्रीमुख शोभले।
सुखाचे ओतलें सकळही ॥३॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा।
घननीळ सांवळा बाइयांनो ॥४॥
सकळही तुम्ही व्हागे एकीसवा।
तुका म्हणे जीवा धीर नाही ॥५॥

मंगल च. दुसरे अभंग ३

सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती।
रखुमाईच्या पती सोयरीया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम।
देईं मज प्रेम सर्वकाळ ॥२॥
विठू माउलिये हाचि वर देईं।
संचरोनि राहीं हृदयी माझ्या ॥३॥
तुका म्हणे काही न मागो आणिक।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥४॥

मंगल च. दुसरे अभंग ४

आवडे हे रूप गोजिरें सगुण।
पाहता लोचन सुखावलें ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तूं राहे।
जों मी तुज पाहे पांडुरंगा ॥२॥
लांचावलें मन लागलीसे गोडी।
ते जीवे न सोडीं ऐसे झाले ॥३॥
तुका म्हणे आम्हीं मागावीं लडिवाळीं।
पुरवावी आळी मायबापा ॥४॥

मंगल च. दुसरे अभंग ५

झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा।
तेणे माझ्या मना बोध केला ॥१॥
अनंत जन्मीचें विसरलों दुःख।
पाहता तुझे मुख पांडुरंगा ॥२॥
योगियांच्या ध्यानीं ध्यातां नातुडसी।
तो तूं आम्हांपासी मागे पुढे ॥३॥
नामा म्हणे जीवे करीन निंबलोण।
विटेसहित चरण ओवाळीन ॥४॥

मंगल च. दुसरे अभंग ६

पाहता श्रीमुख सुखावलें सुख।
डोळियांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस।
अमृत जयास फिकें पुढे ॥२॥
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध।
गेले भेदाभेद निवारोनी ॥३॥
महामळें मन होते जेगादलें।
शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें ॥४॥
तुका म्हणे माझ्या जीवाचें जीवन।
विठ्ठल निधान सापडले ॥५॥

मंगल च. दुसरे अभंग ७

येणे मुखे तुझें वर्णी गुण नाम।
तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनिया पाहीन तुझें मुख।
तेचि मज सुख देई देवा ॥२॥
कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती।
ते मज विश्रांति देई देवा ॥३॥
वाहें रंगीं टाळी नाचेन उदास।
हे देई हातांस पाया सुख ॥४॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव।
आणिक नको ठाव चिंतूं यासी ॥५॥

मंगल च. दुसरे अभंग ८

नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव।
मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥१॥
दावीं रूप मज गोपिकारमणा।
ठेवूं दे चरणांवरी माथा ॥२॥
पाहीन श्रीमुख देईन आलिंगन।
जीवे निंबलोण उतरीन ॥३॥
पुसतां सांगेन हितगुज मात।
बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥४॥
तुका म्हणे यासी न लावीं उशीर।
माझे अभ्यंतर जाणोनिया ॥५॥

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

भजनी मालिका मंगलचरण 1, 2, 3

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *