संत ज्ञानेश्वर म. गौळणी वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

🕉🚩 संत ज्ञानेश्वर म. गौळणी🚩🕉

Sant Dnyaneshwar Maharaj Gaulani


त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनियां
त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनियां माये । कल्पद्रुमातळीं वेणु वाजवीत आहे ॥१॥ गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य अभ्यंतरीं अवघा परमानंदु वो ॥धृ॥ सांवळे सगुण सकळां जिवांचें जीवन । घनानंदमूर्ति पाहतां हारपलें मन ॥२॥ शून्य स्थावर जंगम व्यापूनि राहिला अकळ । बापरखुमादेविवरु विठ्ठलु सकळ ॥३॥

 २
योगियां मुनिजनां ध्यानीं
योगियां मुनिजनां ध्यानीं । ते सुख आसनीं शयनीं ॥१॥ हरिसुख फावलें रे ॥धृ॥ गोकुळींच्या गौळियां । गोपि गोधना सकळां ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलें । ते सुख सवंगडिया दिधलें ॥३॥

 ३
तुजवीण एकली रे कृष्णा न गमे राती । तंव तुवां नवल केलें वेणु घेऊनि हातीं । आलिये तेचि सोय तुझी ओळखिली गती ॥१॥ नवल हें वालभ रे कैसें जोडलें जिवा । दुसरें दुरी ठेलें प्रीति केला रिघावा ॥२॥ पारु रे पारु रे कान्हा झणें करिसी अव्हेरु । तूं तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरु । बापरखुमादेवीवरु विठो करीं कां अंगिकारु ॥३॥


 कृष्णें वेधिली विरहिणी बोले । चंद्रमा करितो उबारा गे माये । न लवा चंदनु अंगी न घाला विंजणवारा । हरिविणें शून्य शेजारु गे माये ॥१॥ माझे जिवींचे तुम्हीं कां वो नेणा । माझा बळिया तो पंढरीराणा वो माये ॥२॥ नंदनंदनु घडी घडी आणा । तयाविण न वांचति प्राण वो माये ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु गोविंदु । अमृतपान गे माये ॥३॥


 लक्ष लावुनि अंतरीं । कृष्णा पाहती नरनारी । लावण्यसागरु हरि । परमानंदु ॥१॥ छंदें छंदें वेणु वाजे । त्रिभुवनीं घनु गाजे । उतावेळ मन माझे । भेटावया ॥धृ॥ब्रह्मविद्येचा पुतळा । गाई राखितो गोवळा । श्रुति नेणवे ते लीळा । वेदां सनकादिकां ॥२॥ भूतग्रामीचा परेशु । तापत्रयाचा करी नाशु । आड धरुनि गोपवेषु । वत्सें राखे ॥३॥ रासक्रीडा वृंदावनीं खेळे । इंदुवदन मेळे । उद्धरी यदुकुळें । कुळदीपकें ॥४॥ निवृत्ति दासाचा दातारु । बापरखुमादेवीवरु । भक्तां देतो अभयकरु । क्षणक्षणांमाजि ॥५॥


 यातिकुळ माझे गेलें हारपोनि । श्रीरंगावांचुनी आनु नेंणें ॥१॥ किती वो शिकवाल मज वेळोवेळां । मी तया गोवळा रातलिये ॥२॥ अष्टभोग भोगणें माते नाही चाड । भक्तिप्रेम गोड लेईलें गे माये ॥३॥ बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा । कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥४॥


 माझ्या कान्हाचें तुम्हीं नाव भरी घ्यावों । हृदयीं धरोनि यासी खेळावया न्यावो ॥१॥ भक्तांकारणें येणें घेतलीसे आळी । दहा गर्भवास सोसिले वनमाळी ॥२॥ कल्पनेविरहित भलतया मागें । अभिमान सांडुनी दीनापाठीं लागे ॥३॥ शोषिली पुतना येणें तनू मोहियेले तरु । आळी न संडी बापरखुमादेविवरु ॥४॥


 घनु वाजे घुणघुणा । वारा वाहे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा कां ॥१॥ चांद वो चांदणें । चांपे वो चंदनु । देवकी नंदनुविण नावडे वो ॥२॥ चंदनाची चोळी । माझे सर्व अंग पोळी । कान्हो वनमाळी वेगीं भेटवा कां ॥३॥ सुमनाची सेज । सितळ वो निकी । पोळे आगिसारिखी वेगीं विझवा कां ॥४॥ तुम्हीं गातसां सुस्वरें । ऐकोनि द्यावीं उत्तरें । कोकिळें वर्जावें तुम्हीं बाइयांनो ॥५॥ दर्पणीं पाहातां । रुप न दिसे वो आपुलें । बापरखुमादेवीवरे विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥


 पांवया छंदे तल्लीन गोविंदे । नाचती आनंदे गोपाळ कैसे ॥१॥ यमुनेच्या तीरी गाई चारी हरी । गोपाळ गजरी आनंदले ॥२॥ ठायीं ठायीं मातु पेंद्या पै नाचतु । वाकुल्या दावितु हरी छंदे ॥३॥ गायी ठाती उभ्या विसरल्या माया । हाकितु लवलाह्या कृष्णहरी ॥४॥ ज्ञानदेवा जीवी कृष्ण चिरंजीवी । गोपाळ रंजवी प्रेमभक्तां ॥५॥

१०
जीवीचिया जीवा । प्रेमभावाचिया भावा । तुज वांचूनि केशवा । अनु नावडे ॥१॥ जीवें अनुसरलिये । अजुनी कां नये । वेगीं आणावा तो सये । प्राण माझा ॥२॥ सौभाग्यसुंदरु । लावण्यसागरु । बापरखुमादेवीवरु । श्रीविठ्ठलु ॥३॥

११
 पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईये वो ॥१॥ वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ॥२॥ पौर्णिमेचें चांदणे क्षणक्षणां होय उणें । तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंवीण ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाई ये वो ॥४॥

१२
सावळे परब्रह्म आवडे या जीवा
सावळे परब्रह्म आवडे या जीवा । मनें मन राणिवा घर केलें ॥१॥ काय करुं सये सांवळे गोवित । आपें आप लपत मन तेथें ॥धृ॥बापखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मनें मनीं क्षमा एक झालें ॥३॥

१३
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु । मी म्हणे गोपाळु आला गे माये ॥१॥ चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करुं ॥२॥ मज करा कां उपचारु अधिक ताप भारु । सखिये शारंगधरु भेटवा कां ॥३॥ तो सांवळा सुंदरु कासे पीतांबरु । लावण्य मनोहरु देखियेला ॥४॥ भरली दृष्टि जंव डोळां न्याहाळी । तव कोठें वनमाळी गेला गे माये ॥५॥ बोधोनि ठेलें मन तंव झालें अने आन । सोकोनि घेतले प्राण माझेगे माये ॥६॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तेणें कायामनेंवाचा वेधियेलें ॥ ७ ॥

14
 काय सांगू तूते बाई काय सांगू तूते
काय सांगू तूते बाई काय सांगू तूते ॥धृ॥जात होते यमुने पाणिया वाटेत भेतला सांवला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावली कांबला ॥१॥ तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलतां पलतां घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥ माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले । तिकुन आले शालंगपाणी मला पोताशीं धलिलें ॥३॥ मला पोताशीं धलिलें माझे समाधान केलें । निवृत्तीचे कृपें सुख हें ज्ञानदेवा लाधलें ॥४॥

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

गाळणी व्हिडिओ

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

अक्षरसूचीमदतअनुक्रमणिकाईतर aapअभंग सूची गौळणी समाप्त

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *