वासुदेव अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

आमचे ईतर सर्व सॉफ्टवेअर-डाऊनलोड-करा.

WASUDEV ABHANGWARKARI-ROJNISHI WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

वासुदेव अभंग प्रारंभ

|| विठोबा रखुमाई ||
भजन म्हणा

वासुदेव अभंग अनुक्रमणिका

वासुदेव अभंग प्रारंभ

1 मनु राजा एक देहपुरी

2 गातों वासुदेव मीं ऐका

3 गेले टळले पाहार तीन

4 राम राम दोनी अक्षरें

5 बोल बोले अबोलणे

6 रामकृष्ण गीती गात

७ धन्‍य जगी तोचि एक हरिरंगी

८ कर जोडोनि  विनवितों तुम्‍हा

९ वासुदेव स्‍मरण पापहरणाचें

१० विषय सेवितां गा जन्‍म मरणा

११ वासुदेव स्‍मरणें तुटती जन्‍ममरणव्‍याधी

१२ मी वासुदेव नामें फोडितों

१३ जया परमार्थी चाड

१४ सुखे सेऊं ब्रम्‍हानंदा

१५ ओले मृतिकेचें मंदिर

१६ उठ बा जागा होय पाहे

१७ बाबा अहंकार निशी घनदाट

१८ बाबा ममतानिशी अहंकार

१९ ओंम नमो भगवते वासुदेवाय

1 मनु राजा एक देहपुरी

मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी । पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥१॥ ह्मणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥धृ.॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण। ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥ पुढें भक्तीनें धरिलें हातीं। मागें ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥ होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

2 गातों वासुदेव मीं ऐका

गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका । डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥धृ.॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा। व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भिH भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां ।दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥५॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

3 गेले टळले पाहार तीन

गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥धृ.॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥ देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त । जालें एक चित्त तरी बहुत । तेवढएासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥ आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास । नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥ आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥

अक्षरसूची — मदत — अनुक्रमणिका — ईतर aap — अभंग सूची

4 राम राम दोनी अक्षरें

राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपिळया । टाळ घागऱ्या घोषें गा ॥धृ.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥ एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं। नीज घेउनि फिरती गा ॥३॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीतिऩ वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥

5 बोल बोले अबोलणे

बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥ वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥धृ.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें। गजर होतो बहु मोटएानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥ मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥

६ रामकृष्ण गीती गात

रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळया वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥धृ..॥ निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥३॥ तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥ ।6॥

संत एकनाथ महाराजांचे वासुदेव

७ धन्‍य जगी तोचि एक हरिरंगी नाचे

धन्‍य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्‍ण वासुदेव सदा स्‍मरे वाचें ॥१॥ सुखद:खसमान सकळ जीवांचा कृपाळा । ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्‍लोळ ॥२॥ विषयीं विरक्‍त जया नाहीं आपपर । सर्वदा संतुष्‍ट स्‍वयें व्‍यापक निर्धार ॥३॥ जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी । आपण वस्‍तीकर वर्ततसे संसारी ॥४॥ एका जनार्दनी नित्‍य हरिचें कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन ॥५॥

८ कर जोडोनि  विनवितों तुम्‍हा

कर जोडोनि  विनवितों तुम्‍हा । नका गुंतूं संसार श्रमा । नका गुंतूं विषय कामा । तुम्‍ही आठवा मधुसूदना ॥१॥ तुम्‍हीं वासुदेव वासुदेव म्‍हण । तुम्‍हीं वासुदेव वासुदेव म्‍हण ॥धृ.॥ नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्‍यामध्‍ये दु:ख यातना । तुम्‍ही आठवा मधुसुदना ॥३॥ नलगे तीर्थाचें प्रभण । नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्‍नी साधन । तुम्‍ही आठवा मधुसूदन ॥४॥ हेचि माझी विनवणी । जोडितों कर दोन्‍ही । शरण एका जनार्दनी । तुम्‍ही वासदेव म्‍हणा अनुदिनीं ॥५॥

९ वासुदेव स्‍मरण पापहरणाचें मूळ

वासुदेव स्‍मरण पापहरणाचें मूळ । तीर्थाचें माहेर ब्रम्‍ह व्‍यापक निश्‍चळ । त्रिविधताप शोषुनी रुपीं स्‍वरुपीं सुमंगळ ॥१॥ ओंम नमो भगवते राम कृष्‍ण वासुदेव ॥ धृ. ॥ जपतप अनुष्‍ठान व्‍यर्थ कासया करणें । तीर्थ ब्रत यम नेम नलगे दैवता धरणें । केशव माधव अच्युत वदतां होय पातक हरणें ॥२॥ शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलीमल दलभंग । उर्ध्‍व वायुचा स्‍वेतु तोडोनि करीं वो वनभंग ।ब्रम्‍हरंध्री मिसळे परि मुमुक्ष दंग ॥३॥ मनोजय वासना तोडोनि केली बीमोडी । मनपुर नगरी पाहतां दुर्गति मोडी । काम क्रोध मद मत्‍सर दंभ अहंकार झोडी । अखंड परमानंद सेऊनि उभवी गुढी ॥४॥ भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा । शुध्‍दनाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा । हरिस्‍मरणाचेनी बळें अंकित केलें कलिकाळा । एका जनार्दनी अखंड सुख सोहळा ॥५॥

१० विषय सेवितां गा जन्‍ममरणाचा

विषय सेवितां गा जन्‍ममरणाचा बाधु । विवेक गुरुवाक्‍य छेदी भवबंधु ॥१॥ रामकृष्‍ण वासुदेव हरि ब्रम्‍हानंदे गळती गां । राम कृष्‍ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२॥ गुरुवाक्‍य भावबळें निजबोधें पैं बुध्दि । तेणें बोधें पाहातां गा अखंड ते समाधी ॥३॥ जनीं वनीं निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्‍त चैतन्‍यघन ॥४॥

११ वासुदेव स्‍मरणें तुटती जन्‍ममरणव्‍याधी

वासुदेव स्‍मरणें तुटती जन्‍ममरणव्‍याधी । अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडीं उपाधी ॥१॥  रामकृष्‍ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्‍मजरा तुटे वाचे आठवित सांठवा ॥२॥ चिपळ्या टाळ घुळघुळा शब्‍द नादें । तेणें ब्रम्‍हानंद ह्रदयीं आठवण नांदे ॥३॥ एका जनार्दनी वासुदेव चिंतीतां । यम काळदूत पळती नाम ऐंकतां ॥४॥

१२ मी वासुदेव नामें फोडितों

मी वासुदेव नामें फोडितों नित्‍य टाहों । देखिले पाय आतां मागतों दान द्या हों । सांवळे रुप माझया मानसी नित्‍य राहों । पावन संतवृदें सादरें दृष्टि पहा हों ॥१॥ राम कृष्‍ण वासुदेवा । हरि राम कृष्‍ण वसुदेवा ॥२॥ सांडोनि सर्व चिंता संतपदीं लक्ष लागों । मुक्‍त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागों । भाविक प्रेमळांच्‍या संगतीं चित्‍त लागों ॥३॥ अद्वैतेंचि चालों अक्षयी भक्‍तीयोग ।स्‍वप्‍नींही मानसातें नातळों द्वेतसंग । अद्वयानंदवेधें नावडों अन्‍यभोग ।अक्रियत्‍व चि वाहों सत्क्रियारुप बोध ॥४॥ पातां विश्‍व मातें निजरुप दाखवी । सत्‍काथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी । रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्‍हणे बा रे घेई ॥५॥ हें दान पावलें सद्गुरु शांतिलिंगा । हें दान पावलें आत्‍मया पांडरुगा । हे दान पावलें व्‍यापका अंतरंगा । हें दान पावलें एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥६॥


वासुदेव: जया परमार्थाची चाड १ अभंग.
गायक : डिगांबर बुवा कुटे.

१३ जया परमार्थी चाड..

जया परमार्थी चाड । तेणें सांडावें लिगाड । धरुनी भजनाची चाड । नित्‍य नेम आदरें ॥१॥ सांडी मांडी परती टाकीं । वासुदेव नाम घोकी । मोक्ष येईन सुखी । नाम स्‍मरतां आदरें ॥२॥ रामकृष्‍ण वासुदेव । धरीं हाचि दृढ भाव । आणिकाचा हेवा । दुरी करीं आदरे ॥३॥ घाली संतासी आसनें । पूजा करी कायावाचा मने । एका जनार्दनी जाणे । इच्छिले तें पुरवी ॥४॥

१४ सुखे सेऊं ब्रम्‍हानंदा

सुखे सेऊं ब्रम्‍हानंदा । गाऊं रामनाम सदा । नोहे मग बाधा । काळदूत यमाची ॥१॥ करुं वासुदेव स्‍मरण । तेणे तुटेरे बंधन । खंडेल कर्माचे विंदान । वासुदेव जपतांचि ॥२॥ तीर्थयात्रें सुखें जाऊ । वाचे विठ्ठल नाम घेऊं । संतासंगे सेऊं । वासुदेव धणीवरी ॥३॥ लोभ ममता दवडूं आशा । उदर व्‍यथेचा वोळसा । न करुं आणिक सायासा । वासुदेवा वांचूनी ॥ ४॥ मुख्‍य वर्माचे हें वर्म । येणे साधे सकळ धर्म । एका जनार्दनी नाम । वासुदेव आवडी ॥५॥

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

12 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *