काकडा आरती प्रारंभ
काकडा भजन : उठा उठा साधुसंत पासून उठा सकळ जन पर्यंत एकूण ११ अभंग.
1 उठा उठा साधुसंत
उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१॥
उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ।
जळती पातकांच्या राशी । काकड आरती देखलिया॥२॥
उठोनियां पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका॥३॥
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४॥
पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥
2 उठा जागे व्हा रे आतां
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा ।
भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या ॥१॥
धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।
सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥
माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे ।
हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥
आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ॥४॥
संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा ।
मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥
|विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा ।
धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥
3 उठा पांडुरंगा आतां दर्शन
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा ।
झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां ॥१॥
संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा ।
सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा ॥२॥
रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी ।
मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥
राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।
सेजें हालउनि जागे करा देवराया ॥४॥
गरुड हनुमंत पुढे पाहती वाट ।
स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥
झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।
विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
4 उठा अरुणोदय प्रकाश झाला
उठा अरुणोदय प्रकाश झाला ।
घंटा गजर गर्जिन्नला ।
हरि चौघडा सुरु झाला ।
काकड आरती समयाचा ॥१॥
महाद्वारीं वैष्णवजन ।
पूजा सामुग्री घेऊन ।
आले द्दावे तयांसी दर्शन ।
बंदिजन गर्जती ॥२॥
सभामंडपी कीर्तन घोष ।
मृदंग टाळ विणे सुरस ।
आनंदे गाती हरिंचे दास ।
परम उल्हास करूनियां ॥३॥
चंद्रभागे वाळवंटी ।
प्रातःस्नानाची जनदाटी ।
आतां येतील आपुले भेटी ।
उठीं उठीं गोविंदा ॥४॥
ऐसे विनवी रुक्मिणी ।
जागृत झाले चक्रपाणी ।
नामा बद्धांजुळी जोडुनि ।
चरणीं माथा ठेवितसे ॥५॥
5 उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥१॥
वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।
कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥
सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ ।
रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥
रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात ।
त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती ।
भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती॥६॥
अनंत अवतार घेसी भक्तांकारणें ।
कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥७॥
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं ।
पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥८॥
6 सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा ।
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥
काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया ।
चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥२॥
कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक ।
नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥३॥
आरती करितां तेज प्रकाशले नयनीं ।
तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं ॥४॥
7 कां हो तुम्ही निश्र्चितीनें
कां हो तुम्ही निश्र्चितीनें निजलाती हरी ।
मानिलें हें सुख आम्ही वाचुं कैशापरी ॥१॥
उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावें ।
जया जी वासना तयां तैसे पुरवावें ॥२॥
जन्मोजन्मीं सांभाळिलें क्षमा करा अन्याय ।
कृपा करी देवा आम्हां तूंचि बापमाय॥३॥
तुका म्हणे करा वडीलपणा दानासी ।
जेणें सुख होय सकळ हे जनासी ॥४॥
8 अवघे हरिजन मिळोनि आले राउळा
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा ।
दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥
उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी ।
पाहुं द्दा वदन वंदूं पायांची धूळी ॥२॥
उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा ।
कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी ।
दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥
9 तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे
तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे ।
कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥
हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।
घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥२॥
उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।
बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥३॥
१० भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥१॥
ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥२॥
काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥३॥
राही रखुमाई दोही दो बाहीं ।
मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥४॥
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा ।
विटेवरी उभा लावण्यगाभा ॥५॥
११ उठा सकळ जन उठिले नारायण
उठा सकळ जन उठिले नारायण ।
आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥
करा जयजयकार वाद्यांचा गजर ।
मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥
जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर ।
पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥
तुका म्हणे काय पढियंतें तें मागा ।
आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
काकडा आरती प्रारंभ
गायक : डिगांबर बुवा कुटे.
काकडा अभंग अनुक्रमणिका
| १ उठा उठा साधुसंत |
| २ उठा जागे व्हा रे आतां |
| ३ उठा पांडुरंगा आतां दर्शन |
| ४ उठा अरुणोदय प्रकाश |
| ५ उठा पांडुरंगा प्रभात समयो |
| ६ सहस्त्र दींपे दीप कैसी |
| ७ कां हो तुम्ही निश्र्चितीनें |
| ८ अवघे हरिजन मिळोनि |
| ९ तुझिये निढळीं कोटी चंद्र |
| १० भक्तीचिया पोटीं बोध |
| ११ उठा सकळ जन उठिले |
1 उठा उठा साधुसंत
उठा उठा साधुसंत । साधा आपुले हित ।
गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥१॥
उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ।
जळती पातकांच्या राशी । काकड आरती देखलिया॥२॥
उठोनियां पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे ।
चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका॥३॥
जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।
वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥४॥
पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।
होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥५॥
सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।
केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥६॥
2 उठा जागे व्हा रे आतां
धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।
सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥ माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे ।
हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥ आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ॥४॥ संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा ।
मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥ |विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा ।
धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥
3 उठा पांडुरंगा आतां दर्शन
उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां ॥१॥ संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा । सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा ॥२॥ रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥ राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया । सेजें हालउनि जागे करा देवराया ॥४॥ गरुड हनुमंत पुढे पाहती वाट । स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥ झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥
4 उठा अरुणोदय प्रकाश झाला
उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला । हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥१॥ महाद्वारीं वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन । आले द्दावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥२॥ सभामंडपी कीर्तन घोष ।मृदंग टाळ विणे सुरस । आनंदे गाती हरिंचे दास ।परम उल्हास करूनियां ॥३॥ चंद्रभागे वाळवंटी । प्रातःस्नानाची जनदाटी । आतां येतील आपुले भेटी ।उठीं उठीं गोविंदा ॥४॥ ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी । नामा बद्धांजुळी जोडुनि ।चरणीं माथा ठेवितसे ॥५॥
5 उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥१॥ वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥२॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥३॥ सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥४॥ रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥५॥ पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती । भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती॥६॥ अनंत अवतार घेसी भक्तांकारणें । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥७॥ चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥८॥
6 सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा
सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥ काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥२॥ कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥३॥ आरती करितां तेज प्रकाशले नयनीं । तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं ॥४॥
7 कां हो तुम्ही निश्र्चितीनें
कां हो तुम्ही निश्र्चितीनें निजलाती हरी । मानिलें हें सुख आम्ही वाचुं कैशापरी ॥१॥ उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावें । जया जी वासना तयां तैसे पुरवावें ॥२॥ जन्मोजन्मीं सांभाळिलें क्षमा करा अन्याय । कृपा करी देवा आम्हां तूंचि बापमाय॥३॥ तुका म्हणे करा वडीलपणा दानासी । जेणें सुख होय सकळ हे जनासी ॥४॥
8 अवघे हरिजन मिळोनि आले राउळा
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा । दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥ उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी । पाहुं द्दा वदन वंदूं पायांची धूळी ॥२॥ उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा । कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥३॥ तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी । दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥
9 तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे
तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हांसे ॥१॥ हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥२॥ उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥३॥
१० भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती
भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥१॥ ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥२॥ काय महिमा वर्णू आतां सांगणे किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥३॥ राही रखुमाई दोही दो बाहीं । मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥४॥ तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा । विटेवरी उभा लावण्यगाभा ॥५॥
११ उठा सकळ जन उठिले नारायण
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥ जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥ तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
काकडा समाप्त

[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंग […]
[…] काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग […]
[…] काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग […]
[…] काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग […]
[…] काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग […]