जोशी भारुड -तेथूनि/येथून पुढे बरे… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

जोशी भारुड प्रारंभ

तेथूनि/येथून पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल ।
फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥

मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥

मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥

वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥

एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥

जोशी भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *