मदालसा अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

मदालसा

१ उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा

+: मदालसा संक्षिप्त चरित्र :-
मदालसा ही एका शूर राजाची राणी अर्थात काशिदेशाच्या ऋतुध्वज राजाची पत्नी. तिची आख्यानकथा मार्कंडेय पुराणात विस्तृत आलेली आहे. तिने ऋतुध्वज राजाला पती म्हणून वरलेले असते; पण पाताळकेतू नावाचा एक दुष्ट मायावी राक्षस तिचे हरण करून तिला, पाताळात घेऊन जातो. ऋतुध्वज पाताळकेतूशी भयंकर युद्ध करून, त्याचा पराभव करतो; पण दुसरा एक मायावी राक्षस यतिवेशाचा आधार घेऊन ऋतुध्वजाला गुंतवून ठेवतो आणि मदालसेच्या राज्यात जाऊन ऋतुध्वज मेला असे जाहीर करून आहे, असे सांगतो. आपल्या पतीच्या मृत्यूची वार्ता ऐकताच ती अग्नीमध्ये सशरीर प्रवेश करते. तिच्या वियोगाने ऋतुध्वज राजा अतिशय दु:खी होतो; पण त्याला लाभलेल्या शंकराच्या कृपेने ती पुन्हा संजीवन होते. आता मात्र ती पूर्वीच्या सौंदर्यासह अध्यात्माने संपन्न होऊनच प्रकटते. ऋतुध्वजाबरोबर संसार सुरू होतो. तिला विक्रांत, सुबाहू, शत्रुमर्दन आणि अलर्क असे चार पुत्र होतात. ती स्वत: ब्रह्मनिष्ठ असल्यामुळे, आपल्या पहिल्या तीन पुत्रांना लहानपणी पाळण्यात झोपवताना, अंगाईगीतातून अध्यात्माचा बोध देते. तो बोध म्हणजे मदालसेचे अभंग. ते तिन्ही पुत्र तिच्या उपदेशामुळे खरे वैराग्यसंपन्न होतात, तर अलर्क रजोगुणी होऊन राज्यकारभाराकडे वळतो. हा उपदेश सखोल आत्मचिंतनाचा ब्रह्मबोध आहे. मदालसा अभंगाची सुरुवातच,

उपदेश मदालसा देहो निर्मिला कैसा ।
आलासी कवण्या वाटां मातेचियां गर्भवासा ।
जो पंथ वोखटा रे पचलासी कर्मकोठा ।
अविचार बुद्धि तुझी पुत्रराया अदटा ॥१॥
पयें दे मदालसा सोहं जो जो रे बाळा ।
निजध्यानीं निज पा रे लक्ष लागो दे डोळा ।
निज तें तूं विसरलासी होसी वरपडा काळा ॥२॥
नवमास कष्टलासी दहाव्यानें प्रसुत झाली ।
येतांचि कर्मजाड तुझीमान अडकली ।
आकांतु ते जननीये दु:ख धाय मोकली ।
स्मरे त्या हरिहरा ध्यायीं कृष्णमाउली ॥३॥
उपजोनि दुर्लभु रे मायबापा झालासी ।
वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी ।
माझें  माझें म्हणोनिया झणी वायां भुललासी ।
होणार जाणार रे जाण नको गुंफो भवपाशीं ॥४॥

हा देहो नाशिवंत मळमुत्राचा बांधा ।
वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ।
रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई ऎसा ॥५॥ 
या देहाचा भरंवसा पुत्रा न धरावा ऎसा ।
माझें माझें म्हणोनियां बहु दु:खाचा वळसा ।
बहुत ठकियेले मृगजळाच्या आशा ।
तृष्णा ते सांडुनियां योगी गेले वनवासा ॥६॥
या पोटाकारणें रे काय न करिजे एक ।
या लागीं सोय धरी रे तिहीं भुलविले लोक ।
ठायींचे नेमियेलें त्याचें आयुष्य भविष्य ।
लल्लाटीं ब्रम्हारेखा नेणती तें ब्रम्हादिक ॥७॥
जळींचीं जळचरें रे जळीचिया रमती ।
भुललीं तीं बापुडीं रे ते कांहीं नेणती ।
जंव नाहीं पुरली रे त्यांची आयुष्यप्राप्ती ।
वरि घालुनि भोंवरा जाळ बापा तयातें गिवसिती ॥८॥

पक्षिणी पक्षिया रे निरंजनीं ये वनीं ।
पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही ।
अवचिती सांपडली रे पारधिया लागुनी ।
गुंतुनियां मोहोपाशीं प्राण त्याजिती दोन्ही ॥९॥
मृग हा चारिया रे अतिमानें सोकला ।
अविचार बुद्धि त्याची परतोनि मागुता आला ।
तंव त्या पारधियानें गुणीं बाणु लाविला ।
आशा रे त्यजुनियां थिता प्राणा मुकला ॥१०॥
अठराभार वनस्पती फुली फळी वोळती ।
बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ।
ज्या घरीं कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती ।
हें सुख सांडुनियां कासया योग सेविती ॥११॥
हे सुख सांडूनियां कोण फळ तयासी ।
कपाट लंघुनियां योगी ध्याती कवणासी ।
योग तो सांग मज कवण ध्यान मानसी ।
सर्वत्र गोविंदु रे ह्र्दयी ध्यायीं ह्र्षीकेशी ॥१२॥

इतुकिया उपरी रे पुत्रा घेई उपदेशु ।
नको भुलो येणें भ्रमें जिवित्वाचा होईल नाशु ।
क्षीरा नीरा पारखी रे परमात्मा राजहंसु ।
निर्गूण निर्विकार पुत्रा सेवी ब्रम्हरसु ॥१३॥
इतुकिया उपरी रे पुत्र मातें विनविता झाला ।
संसार सोहळा थोर कष्टी जोडला ।
पंचभुतें निवती येथे म्हणोनि विश्रामु केला ।
वोखटा गर्भवासु कणवा कार्या रचिला ॥१४॥
गर्भीची यातना रे पुत्रा ऎके आपुल्या कानीं ।
येतों जातां येणें पंथें सांगाती नाहीं रे कोणीं ।
अहंभावो प्रपंचु पुत्रा सांडी रे दोन्ही ।
चौर्‍यांशी जीवयोनी प्रवर्तले मुनिजन तत्क्षणीं ॥१५॥
वाहातां महापुरीं रे पुत्रा काढिले तुज ।
राक्षिलासी प्रसिद्ध सापडलें ब्रम्हबीज ।
मग तुज ओळखी नाहीं कां रे नेणसी निज ।
आपेंआप सदगुरु कृपा करील सहज ॥१६॥

उपजत रंगणा रे पुत्रा तुवां जावें वना ।
बैसोनि आसनीं रे पाहे निर्वाणीच्या खुणा ।
प्राणासी भय नाहीं तापत्रयाचाराणा ।
मग तुज सौरसु पाहा रे परब्रम्हिच्या खुणा ॥१७॥
बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनीं ।
चेतवी तुं आपणापें चेतविते कुंडलिनी ।
चालतां पश्र्चिम पंथें जाई चक्र भेदुनी ।
सतरावी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतुनी ॥१८॥
मग तूं देखसी त्रिभुवन स्वर्ग मृत्यु पाताळ ।
नको भुलों येंणें भ्रमें सांडीं विषय पाल्हाळ ।
आपणापें देखपा रे स्वरुप नाहीं वेगळें ।
परमात्मा व्यापकु रे पाहा परब्रम्हा सांवळें ॥१९॥
इतुकिया उपरी रे पुत्रा ते विनवी जननी ।
परियेसी माउलिये सन्तोषलों तत्क्षणीं ।
इंद्रायणी महातटीं विलासलों श्रीगुरुचरणीं ।
बोलियेले ज्ञानदेवो सन्तोषलों वो मनीं ॥२०॥

२ श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा ।

श्रीगुरु देवराया प्रणिपातु जो माझा ।
अनादि मूळ तूंचि विश्वव्यापक बीजा ।
समाधि घेई पुत्रा स्वानंदाचिया भोजा ।
पालखी पहुडलिया नाशिंवत रे माया ॥१॥
जाग रे पुत्रराय जाई श्रीगुरुशरण ।
देह तूं व्यापिलासी चुकवी जन्ममरण ।
गर्भवासु वोखटा रे तेथें दु:ख दारुण ।
सावध होई कां रे गुरुपुत्र तूं सुजाण ॥२॥
मदालसा म्हणे पुत्रा ऎक बोलणें माझे ।
चौर्‍यांशी घरामाजी मन व्यामुळ तुझें ।
बहुत सिणतोसि पाहतां विषयासीं वांझे ।
जाण हें स्वप्नरुप येथें नाहीं बा दुजें ॥३॥

सांडी रे सांडी बाळा सांडी संसारछदु ।
माशिया मोहळ रे रचियेला रे कंदु ।
झाडुनि आणिखी नेला तया फुकटचि वेधु ।
तैसी परी होईल तुज उपदेशें आनंदु ॥४॥
सत्व हे रज तम तुज लाविती चाळा ।
काम क्रोध मद मत्सर तुज गोविती खेळा ।
यासवें झणें जासी सुकुमारा रे बाळा ।
अपभ्रंशी घालतील मुकशील सर्वस्वाला ॥५॥
कोसलियानें घर सुदृढ पैं केलें ।
निर्गमु न विचारिता तेणें सुख मानियेलें ।
झालें रे तुज तैसें यातायाती भोगविलें ।
मोक्षव्दार चुकलासी दृढकर्म जोडलें ॥६॥

सर्पे पै दर्दुर धरियेला रे मुखीं ।
तेणेंहि रे माशी धरियेली पक्षी ।
तैसा नव्हे ज्ञानयोगु आपाअपणातें भक्षी ।
इंद्रियां घाली पाणी संसारी होई रे सुखी ॥७॥
पक्षिया पक्षिणी रे निरंजनीं ये वनीं ।
पिलिया कारणें रे गेली चराया दोन्ही ।
मोहोजाळें गुतली रे प्राण दिधले टाकुनी ।
संसार दुर्घट हा विचारु पाहे परतुनी ॥८॥
जाणत्या उपदेशु नेणता भ्रांती पडिला ।
तैसा नव्हे ज्ञानप्रकाशु ज्ञानदेवो अनुवादला ।
अनुभवी गुरुपुत्रा तोचि स्वयें बुझाला ।
ऎक त्या उद्धरणा गायक सहज उद्धरला ॥९॥

मदालसा संस्कृत उपदेश

शुद्धोसि बुद्धोसि निरंजनोऽसि
संसारमाया परिवर्जितोऽसि
संसारस्वप्नं त्यज मोहनिद्रा
मदालसोल्लपमुवाच पुत्रम्।

पुत्र यह संसार परिवर्तनशील और स्वप्न के सामान है इसलिये मॊहनिद्रा का त्याग कर क्योकि तू शुद्ध ,बुद्ध और निरंजन है

शुद्धो sसि रे तात न तेsस्ति नाम
कृतं हि ते कल्पनयाधुनैव ।
पंचात्मकं देहमिदं न तेsस्ति
नैवास्य त्वं रोदिषि कस्य हेतो: ॥

हे तात! तू तो शुद्ध आत्मा है, तेरा कोई नाम नहीं है। यह कल्पित नाम तो तुझे अभी मिला है। वह शरीर भी पाँच भूतों का बना हुआ है। न यह तेरा है, न तू इसका है। फिर किसलिये रो रहा है?

न वा भवान् रोदिति वै स्वजन्मा
शब्दोsयमासाद्य महीश सूनुम् ।
विकल्प्यमाना विविधा गुणास्ते-
sगुणाश्च भौता: सकलेन्द्रियेषु ॥

अथवा तू नहीं रोता है, यह शब्द तो राजकुमार के पास पहुँचकर अपने आप ही प्रकट होता है। तेरी संपूर्ण इन्द्रियों में जो भाँति भाँति के गुण-अवगुणों की कल्पना होती है, वे भी पाञ्चभौतिक ही है?

भूतानि भूतै: परिदुर्बलानि
वृद्धिं समायान्ति यथेह पुंस: ।
अन्नाम्बुदानादिभिरेव कस्य
न तेsस्ति वृद्धिर्न च तेsस्ति हानि: ॥

जैसे इस जगत में अत्यंत दुर्बल भूत अन्य भूतों के सहयोग से वृद्धि को प्राप्त होते है, उसी प्रकार अन्न और जल आदि भौतिक पदार्थों को देने से पुरुष के पाञ्चभौतिक शरीर की ही पुष्टि होती है । इससे तुझ शुद्ध आत्मा को न तो वृद्धि होती है और न हानि ही होती है।

त्वं कञ्चुके शीर्यमाणे निजेsस्मिं-
स्तस्मिश्च देहे मूढ़तां मा व्रजेथा: ॥
शुभाशुभै: कर्मभिर्देहमेत-
न्मदादिर्मूढै: कंचुकस्ते पिनद्ध: ॥

तू अपने उस चोले तथा इस देहरुपि चोले के जीर्ण शीर्ण होने पर मोह न करना। शुभाशुभ कर्मो के अनुसार यह देह प्राप्त हुआ है। तेरा यह चोला मद आदि से बंधा हुआ है (तू तो सर्वथा इससे मुक्त है) ।

तातेति किंचित् तनयेति किंचि-
दम्बेती किंचिद्दवितेति किंचित्
ममेति किंचिन्न ममेति किंचित्
त्वं भूतसंग बहुमानयेथा: ॥

कोई जीव पिता के रूप में प्रसिद्ध है, कोई पुत्र कहलाता है, किसी को माता और किसी को प्यारी स्त्री कहते है, कोई ‘यह मेरा है’ कहकर अपनाया जाता है और कोई ‘मेरा नहीं है’ इस भाव से पराया माना जाता है। इस प्रकार ये भूतसमुदाय के ही नाना रूप है, ऐसा तुझे मानना चाहिये ।

दु:खानि दु:खापगमाय भोगान्
सुखाय जानाति विमूढ़चेता: ।
तान्येव दु:खानि पुन: सुखानि
जानाति विद्वानविमूढ़चेता: ॥

यद्यपि समस्त भोग दु:खरूप है तथापि मूढ़चित्तमानव उन्हे दु:ख दूर करने वाला तथा सुख की प्राप्ति करानेवाला समझता है, किन्तु जो विद्वान है, जिनका चित्त मोह से आच्छन्न नहीं हुआ है, वे उन भोगजनित सुखों को भी दु:ख ही मानते है।

हासोsस्थिसंदर्शनमक्षि युग्म-
मत्युज्ज्वलं यत्कलुषं वसाया: ।
कुचादि पीनं पिशितं पनं तत्
स्थानं रते: किं नरकं न योषित् ॥

स्त्रियों की हँसी क्या है, हड्डियों का प्रदर्शन । जिसे हम अत्यंत सुंदर नेत्र कहते है, वह मज्जा की कलुषता है और मोटे मोटे कुच आदि घने मांस की ग्रंथियाँ है, अतः पुरुष जिस पर अनुराग करता है, वह युवती स्त्री क्या नरक की जीती जागती मूर्ति नहीं है?

यानं क्षितौ यानगतश्च देहो
देहेsपि चान्य: पुरुषो निविष्ट: ।
ममत्वमुर्व्यां न तथा यथा स्वे
देहेsतिमात्रं च विमूढ़तैषा ॥

पृथ्वी पर सवारी चलती है, सवारी पर यह शरीर रहता है और इस शरीर में भी एक दूसरा पुरुष बैठा रहता है, किन्तु पृथ्वी और सवारी में वैसी अधिक ममता नहीं देखी जाती, जैसी कि अपने देह में दृष्टिगोचर होती है।यही मूर्खता है।

धन्योs सि रे यो वसुधामशत्रु-
रेकश्चिरं पालयितासि पुत्र ।
तत्पालनादस्तु सुखोपभोग
धर्मात् फलं प्राप्स्यसि चामरत्वम् ॥
धरामरान् पर्वसु तर्पयेथा:
समीहितम् बंधुषु पूरयेथा: ।
हितं परस्मै हृदि चिन्तयेथा
मनः परस्त्रीषु निवर्तयेथा: ॥
सदा मुरारिम् हृदि चिन्तयेथा-
स्तद्धयानतोsन्त:षडरीञ्जयेथा: ॥
मायां प्रबोधेन निवारयेथा
ह्यनित्यतामेव विचिंतयेथा: ॥
अर्थागमाय क्षितिपाञ्जयेथा
यशोsर्जनायार्थमपि व्ययेथा:।
परापवादश्रवणाद्विभीथा
विपत्समुद्राज्जनमुध्दरेथाः॥

बेटा ! तू धन्य है, जो शत्रुरहित होकर अकेला ही चिरकाल तक इस पृथ्वी का पालन करता रहेगा। पृथ्वी के पालन से तुझे सुखभोगकी प्राप्ति हो और धर्म के फलस्वरूप तुझे अमरत्व मिले। पर्वों के दिन ब्राह्मणों को भोजन द्वारा तृप्त करना, बंधु-बांधवों की इच्छा पूर्ण करना, अपने हृदय में दूसरों की भलाई का ध्यान रखना और परायी स्त्रियों की ओर कभी मन को न जाने देना । अपने मन में सदा श्रीविष्णुभगवान का चिंतन करना, उनके ध्यान से अंतःकरण के काम-क्रोध आदि छहों शत्रुओं को जीतना, ज्ञान के द्वारा माया का निवारण करना और जगत की अनित्यता का विचार करते रहना । धन की आय के लिए राजाओं पर विजय प्राप्त करना, यश के लिए धन का सद्व्यय करना, परायी निंदा सुनने से डरते रहना तथा विपत्ति के समुद्र में पड़े हुए लोगों का उद्धार करना ।

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *