कान्होबा अभंग -पहिले कोठेच नव्हते कांहीं… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

कान्होबा अभंग प्रारंभ

पहिले कोठेच नव्हते कांहीं । चंद्र सूर्य तारा नाहीं ।
अवघे शून्यच होतें पाही । कान्होबा तें रे तें रे तें ॥१॥

तेथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली ।
इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी तिची घरकुली । कान्होबा ॥२॥

ती मूळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी ।
तो जन्मला तियेचे उदरीं । ऐसी पाहतां नवलपरी । कान्होबा ॥३॥

तिने बापचि दादला केला । कोण वाईट म्हणे या बोला ।
अवघे तिच्याच बोलाने चाला । तरी कैवल्यसुख तुम्हाला । कान्होबा ॥४॥

तो तियेसी शिवला नाहीं । वांझ गर्भिण झाली पाही ।
व्याली पांच पंचवीस पोरें तीही । ऐसें तियेचें नवल पाहीं । कान्होबा ॥५॥

ऐशी व्याली तें सकळ सृष्टी । न पडतां भ्रताराचे दृष्टी ।
एकाजनार्दनीं या गोष्टी । विचारा सद्गुरुच्या मुखीं । कान्होबा ॥६॥

कान्होबा अभंग समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *