गजानन दादा महाराज पवार ( शास्त्री )

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
गजानन

गजानन दादा महाराज पवार ( शास्त्री )
रा. बुलढाणा जि. बुलढाणा
किर्तन क्रांतिकारी शिव-शंभू चरित्रकार ,
रामायण- भागवत, क्षात्र जगद्गुरु, धर्मभूषण गुरुवर्य

WARKARI ROJNISHI WEB APP 512512
call logo 2
call logo 2

क्रांतिकारी शिव-शंभू चरित्रकार , रामायण- भागवताचार्य, क्षात्र जगद्गुरु, धर्मभूषण गुरुवर्य गजानन दादा शास्त्री पवार महाराज..


हे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, शिव-शंभूचरित्र व्याख्याते व उत्तम लेखक आहेत. केवळ महाराष्ट्र मध्येच नव्हे तर संपूर्ण देशभर रामायण, भागवत, सकलसंतचरित्र, शिवकथा, भक्तमाल कथा, सुंदर कांड, आणखी अनेक विषयांवर महाराजांचे कार्यक्रम होत असतात. “विश्व धर्मयोद्धा फाउंडेशन” या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा महाराजांचा फार मोठा वाटा असतो. महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य परिषद, जातीय सलोखा, फाशी पारधी पुनर्वसन कार्यक्रम अर्थात उन्नती पर्व , बेटी बचाव उपक्रम ,अंधश्रद्धा निर्मूलन, सर्व धर्म परिषदांमध्ये हिंदू धर्माच्या प्रतिनिधीच्या रूपाने महाराज यांनी अनेक कार्यक्रम केले आहेत. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, शाहू-फुले-आंबेडकर आदी सर्व महापुरुषांचा विचार वारसा सर्वांना देत महाराजश्री अनाथ मुलांच्या संगोपनासाठी, वृद्ध आई वडिलांच्या सेवेसाठी तसेच गोमातेच्या संरक्षणासाठी सदैव अग्रेसर असतात. मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात जागतिक ख्याती असलेल्या लोणार सरोवराच्या परिसरात “त्र्यंबकेश्वर सेवा ट्रस्ट” या संस्थेच्या माध्यमातून गुरुवर्य महाराजश्री भविष्यात मोठे सेवाकार्य उभारणार आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच टीव्हीवरील अनेक चॅनलच्या माध्यमातून महाराज सदैव व समाजाभिमुख असतात. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ बाबा, नामदेवराय, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई इत्यादी वारकरी संप्रदायातील अष्टादश संतांच्या विचारांचा आनंद महाराजश्री सर्वांना देत असतात. हे जग सुखी व्हावे मानव अकोला ने सर्वांवर प्रेम करावे कारण या जगात एका परमेश्वराशिवाय शाश्‍वत असे काहीच नाही हा विचार गुरुवर्य गजानन दादा शास्त्री पवार महाराज सर्वांना देऊन या विराट महापुरुषाची अर्थात विटेवरच्या मालकाची सदैव आराधनाच आपल्या सेवेच्या माध्यमातून करीत असतात.
आपण सर्वांनी गुरुवर्य गजानन दादा शास्त्री पवार महाराज यांचे विचार युट्युब सोशल मीडिया व या ॲपच्या माध्यमातून सदैव श्रवण करून आनंद घ्यावा हीच आपल्या सर्वांना प्रार्थना..

गुरुवर्य गजानन दादा शास्त्री पवार महाराजश्रींच्या खालील नंबर वर संपर्क करा..

!! 9850116747 – 9021191514 !!

सर्वांना सप्रेम जय हरी.. माऊली..

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

One comment

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading