शिमगा अभंग -सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शिमगा अभंग प्रारंभ

सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल शिमगा ।
तुम्ही हेच गाणे गा । तुम्ही हसू नका हसू नका ॥१॥

भूत सभेची कारटीं । विषय गोवऱ्या चोरटी ।
उतरा कुकर्माची राहाटी । तुम्ही हंसूं नका हंसू नका ॥२॥

जागोजागी थांबा । अवघ्या मिळोनि मारा बोंबा ।
न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हंसू नका हंसू नका ॥३॥

गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी ।
तुमची पाजळू द्या होळी । तुम्ही हंसू नका हंसू नका ॥४॥

ओटीत घेउनि गुलाल । सख्या मेहुणीसंगें भुलाल ।
तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हंसूं नका हंसूं नका ॥५॥

एका जनार्दनीं पोस्त । गाणे गातां हालमस्त ।
नाहीं तर भडवे समस्त । तुम्ही हंसू नका हंसूंनका ॥६॥


शिमगा अभंग समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *