बाळासाहेब हांडे ( जेष्ठ पत्रकार )

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ध्येयनिष्ठ वाटचाल करणारे शिस्तप्रिय बाळासाहेब हांडे

बळीराम तांबडे
अनेकांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि कोणाच्याही हाकेला धाऊन जाणाऱ्या निगर्वी बाळासाहेब हांडे यांचा मित्र परिवार फार मोठा आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचा जवळचा संबंध आला
आणि त्यातून ते घडले. अतिशय शिस्तप्रिय असलेले बाळासाहेब हांडे हे सन १९६५ ते २००५ पर्यंत विक्रोळी पूर्वेकडील टागोरनगरमधील दलित कुटुंबियांच्या शेजारी साधेपणाने राहिले. ते विशेष कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस मित्र असल्याने त्यांच्या राहत्या घरी लोकांची प्रचंड वर्दळ असायची.

त्यावेळी त्यांचे चिरंजीव लोकप्रिय व सुप्रसिध्द बालप्रवचनकार/कीर्तनकार ह.भ.प. वैभवमहाराज हांडे यांच्या महाराष्ट्रभर आणि दूरदर्शनवर झालेल्या कार्यक्रमांमुळे त्यांचा नावलौकिक आणखी वाढत गेला. पुढे २००५ साली मुंबईला अतिवृष्टीचा तडाखा बसला. विक्रोळीला आलेल्या महापुराने त्यांच्याही घरदाराचे आणि साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून सावरल्यावर त्यांना उत्तम साथ देणाऱ्या त्यांच्या आजारी पत्नीला घेऊन मुला-बाळांसह ते मुलुंडला वास्तव्यास आले.

मूळचे ते जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावच्या शेतकरी, माळकरी आणि सधन कुटुंबातील. त्यांनी गरिबी कधी पाहिली नाही, पण त्यांच्या ठायी गरिबांबद्दल फार कणव आणि आत्मीयता जाणवते. वयाच्या अठराव्या वर्षांपासून आजतागायत हे ध्येयवेडे गृहस्थ विविध क्षेत्रात आणि चळवळीत कार्यरत आहेत. ह्या ज्येष्ठ नागरिकाचा उत्साह आजही तरुणांना लाजवेल असा आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव काम असून जनमानसात त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे.

सन १९८० पासून त्यांनी दर्जेदार, आकर्षक, वाचनीय अशा स्नेहसौख्य दिवाळी अंकाची निर्मिती केली. त्या वार्पिक अंकाच्या संपादकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आणि अनेक पारितोषिके मिळवली. लेखकांना वेळेवर मानध देणारे ते लोकप्रिय संपादक ठरले. तसेच नवशक्ति दैनिकातून त्यांनी १९८० ते २००५ पर्यंत पूर्व उपनगर वार्तापत्र हे सदर नियमितपणे चालवून अनेक नागरी समस्यांना वाचा फोडली. त्यावेळी हे सदर खूप लोकप्रिय ठरले. याखेरीज त्यांना सरकारी यंत्रणेतील बरेचसे भ्रष्टाचार उघडकीस आणले.

गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा काढल्या. त्यासाठी त्यांनी डोंगराळ, दुर्गम व झोपडपट्टी विभाग निवडले. शाहू-फुले-आंबडेकर यांना आदर्श मानून आजही त्यांची ध्येयनिष्ट वाटचाल चालू आहे. धरणग्रस्तांच्या समस्यांपासून, शिक्षणावर बोलू काही, नागरी समस्या, अन्याय – अत्याचार आदी विषयांवर अनेक मराठी दैनिकांतून त्यांनी विपुल लिखाण केले आहे.

२ –
म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सदस्य असताना त्यांनी टागोरनगर, कन्नमवारनगर या वसाहतींचा “पाणी प्रश्न” मार्गी लावला. आजही ते अनेक लोकोपयोगी, शैक्षणिक, सामाजिक संस्थांमध्ये वेळप्रसंगी पदरमोड करून काम करतात. या विनम्र व निर्व्यसनी साध्यासुध्या माणसाचे समाजप्रबोधनाचे देखील मोठे कार्य आहे. गरजूंच्या मदतीला धावून जाणे हा त्यांचा पिंड आणि स्वभाव आहे. जेरावर पत्रलेखकाचा पत्रकार झालेला हा माणूस नुसता पत्रकार नसून एक मोठे संस्थान आहे.

सुंदर हस्ताक्षर, उत्तम लेखणी व वाणी असलेल्या या भल्या माणसाचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मुलं घडवा आणि झाडं वाढवा हा दोन कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. ते कार्यरत असलेल्या प्रत्येक ठिकाणी स्वच्छता व टापटीपपणा याला ते अधिक महत्त्व देतात. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीवर पूर्वी त्यांनी प्रगतिशील शेतकारी आणि फळव्यापारी यांच्या मुलाखती घेतल्या. त्याही अविस्मरणीय ठरल्या. त्यांनी मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीवरील ग्रामदर्पणमध्ये पुनर्वसित उंब्रज गावाचा झालेला कायापालट दाखविला.

_ गायनाचे अंग असलेल्या बाळासाहेब हांडे यांचे त्यांच्या मुलांसोबतचे भजन सुश्राव्य व रसिकांना तल्लीन करणारे असते. हाती काम आणि मुखी नाम असल्यास कोणतीही व्यक्ती बिघडू शकत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. जातीपातीला थारा न देणाऱ्या बाळासाहेब हांडे यांचे सर्वाशी सलोख्याचे संबंध आहेत.

विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून कसलेही पैसे न घेता ते कांजुरमार्ग पूर्वेला उत्तम संस्कार व दर्जेदार शिक्षण देणारी वैभव विद्यालय ही मान्यताप्राप्त व अनुदानित शाळा गेली सदतीस वर्षे चालवितात. निरपेक्ष भावनेने काम करणारी त्यांच्यासारखी माणसं समाजात विरळच पाहायला मिळतात. अनेक भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या विक्रोळीतील पुरातन व प्रकल्पबाधित श्रीहनुमान मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या वयात दररोज सोळा ते अठरा तास काम करणारे बाळासाहेब हांडे हे सदा उत्साही असतात. अनेक मित्रांचे कल्याण व्हावे आणि इतरांचेही भले व्हावे अशी त्यांची धारणा असते. संकटांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या बाळासाहेब हांडे यांच्या उत्साहाचा अखंड उसळता झरा न आटता असाच वाहत राहो हीच सदिच्छा.

००० —

  1. म्हणून पाया पडायची पध्दत आहे ! 👏 नमस्काराचे महत्त्व
  2. मोल
  3. गंभीर बनू नका
  4. परमार्थ आणखी वेगळं काय शिकवतो…?
  5. चांगलं द्या, चांगलंच मिळेल
  6. सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !
  7. दहीभातात दडलंय आनंदाचं रहस्य
  8. योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे…
  9. शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा, अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेलं कधीही चांगलं…
  10. पुण्य करता होय पाप, दूध पाजोनी पोसिला साप”
  11. सुसंगती सदा घडो
  12. संत एकनाथांचे सहस्त्रभोजन
  13. मत बनवताना मात्र घाई करू नये…
  14. आपल्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे…
  15. त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात…
  16. नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…
  17. अपेक्षांचा अंत कधीच पूर्ण होत नाही
  18. नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं…

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *