लेख क्रमांक २, ३, ” ज्योतिष विषयक मार्गदर्शन :- नरेंद्र जोशी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

लेख क्रमांक (२)

एक शुभ ग्रह व मार्गदर्शक

☸️ (१) सूर्यमालेतील नावाप्रमाणेच हा सर्वांत मोठा ग्रह आहे .साधारणपणे पृथ्वीच्या १३०० पट हा मोठा ग्रह आहे .त्याप्रमाणेच हा स्वयंप्रकाशित असावा असे वाटते इतका त्याचा प्रकाश मोठा आहॆ

☸️(२) देवांचे गुरूत्व गुरूकडे असल्याने त्याच नावाने त्याचा सदैव गौरव सर्व पुराणातून केला आहे .

☸️(३) गुरू हा अत्यंत शुभ ग्रह आहे .गुरूची सर्व फले इष्ट असल्याने अगदी लहानशा उपासनेने देखील तो फलदायक ठरतो .पृथ्वीवर जे अत्यंत तेजोमय पदार्थ आहेत त्यांचा तो स्वामी आहे .

☸️(४) पृथ्वीवरील औषधी वनस्पतींमध्ये असणारे गुण गुरू आणि चंद्र यांच्या सानिध्याने अधिक तीव्र होतात .

☸️(५) जसे कि प्रत्येक मानवाच्या प्रगती मधे जसा गुरूचा मोठा वाटा असतो त्याच प्रमाणे तसेच नवग्रहांमधे गुरू बल असल्याशिवाय कार्ये सिध्दीस जात नाही

ज्योतिष आणि राजकारण
लेख क्रमांक (३)
🟢राजकीय कारकीर्द🟣
स्वालिखित व माझ्या अनुभवानुसार व गुरूंनी जे ज्ञानामृत दिले त्याचा हा परिपाक आहे
🟩राजकारणात संयम,सबुरी व सहनशीलता हे गुण असावे लागतात त्याचप्रमाणे हजरजबाबी स्वभाव असावा लागतो. सर्वच क्षेत्रातील अद्ययावत माहिती असावी लागते. त्याचप्रमाणे सर्व तपशील हाती असावा लागतो जवळच्या माणसांची निवड व पारख उत्तम असावी लागते .सकारात्मक दृष्टिकोन व प्रगल्भ विचाराबरोबरच सर्वाना घेऊन जाण्याची सवय असावी लागते.🟨
🟣समाजकारण करतच बरेचजण राजकारणात येत असतात. काम करता करताच राजकारणात त्यांचा प्रवेश होतो. काहींना अचानक त्यात पडावे लागते, अगदी मनात किंवा इच्छा नसताना देखील. त्यामुळेच पत्रिकेतील योग बलवत्तर असतील तर सर्व काही घडू शकते.🟥
🟨 त्यामुळेच या क्षेत्रात पाऊल टाकताना पत्रिका पाहिली की आपण त्यात यश प्राप्त करू शकतो की नाही हे कळू शकते एक मार्गदर्शक सल्ला म्हणून पाहणे कधीही उत्तम.🟨
🟩मंत्रिपद मिळण्यासाठी विशिष्ट नेतृत्वगुण असावे लागतात.खालील कारणांमुळे व्यक्तीस मंत्रिपद देखील मिळू शकते.
काहीवेळेस साधारण अगर सामान्य व्यक्तीच्या पत्रिकेत देखील असे ग्रहमान असू शकतात, मग तो त्या पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तरी योग्य वेळ येताच त्याच्या पत्रिकेतील ग्रहमान उचल खाल्ल्याशिवाय राहत नाही व अचानक सामान्य कार्यकर्ता ते मंत्रिपद असे देखील प्राप्त होऊ शकते.🟥
त्यासाठी विविध टप्पे पार करतच पुढे जावे लागते , एकदम काही ते पद मिळू शकत नाही असेही नाही सामान्यकार्यकर्ता ,नगरसेवक,महापौर,आमदार, खासदार,व मंत्रिपद असादेखील प्रवास असू शकतो, त्यामुळे कोणत्याही सामान्य कार्यकर्ता व्यक्तीने आपली जिद्द कधीच सोडू नये.🟥
🟥 अशी कोणती कारणे अगर ग्रहमान आहेत की ज्यामुळे सामान्य व्यक्ती अगर कार्यकर्ता देखील मंत्रिपद मिळवू शकतो ते आज सविस्तर पाहणार आहोत🟥
🟩(१)🟨 गुरू आपल्या उच्च राशीत असेल तसेंच मंगळ मेष राशीत असून लग्नी असेल किंवा लग्नी मंगळ अगर गुरू असतील अशा व्यक्ती
🟩(२)🟨 जर मेष लग्नाच्या व्यक्तीच्या पत्रिकेत शनि, रवि, मंगळ उच्च किंवा मूलत्रिकोणात असतील आणि गुरू नवम स्थानी असेल तर अशा व्यक्ती
🟩(३)🟨 वरगोत्तम नवांशात उच्च राशी असेल व पूर्ण चंद्रावर ज्या ज्या शुभग्रहांची दृष्टी असते त्यांच्या महादशा किंवा अंतर्दशा चालू असताना
🟩(४)🟨 सर्व शुभग्रह पणफर स्थानी असतील आणि पापग्रह द्विस्वभाव राशीत असतील तर अशा व्यक्ती
अशा प्रकारे अजूनही काही कारणे व ग्रहमान आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत

.

ज्योतिष विशारद पुष्कर्णी जोशी 9130403708

ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार
नरेंद्र जोशी
9763439584

ज्योतिष विषयक मार्गदर्शन व सल्ला
सशुल्क मार्गदर्शन केले जाते
शिक्षण आरोग्य, नोकरी, व्यवसाय, विवाह, संतती,प्रगती,उन्नती,भागीदारी,वैवाहिक समस्यां,कोर्ट कचेरी, व्यावसायिक अडचणी,बाधा,इ विषयक सर्व ज्योतिष विषयक समस्यांचे निराकरण व्हाट्सएपच्या माध्यमातून pdf स्वरूपात केले जाते
त्याचप्रमाणे

ज्योतिष व वास्तुशास्र विषयक
ज्योतिष प्रविण ,ज्योतिष प्राज्ञ प्रबोध,विशारद,ज्योतिषाचार्य,पंडित हे व्हाट्सअप द्वारे अभ्यासक्रम घेतले जातात

नरेंद्र जोशी ,ज्योतिषी व वास्तुशास्त्र सल्लागार

संचालक श्री गणेश ज्योतिष व वास्तुशास्र कार्यालय ,पुणे
व्हाट्सअप नंबर

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *