श्रीभद्रा मारुती खुलताबाद औरंगाबाद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

श्रीभद्रा मारुती खुलताबाद 🔸*

औरंगाबाद शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर खुलताबाद हे तालुक्याचे ठिकाण आहे. या खुलताबाद शहरात श्री. भद्रा मारुती संस्थान हे देवस्थान आहे. भद्र म्हणजेच कल्याण, पवित्र, मंगलमय. भद्रा मारुती संकटमोचन व भयापासून रक्षा करतात असा आत्मानुभव येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांमध्ये दिसून येतो.

गावोगावी हनुमानाची मूर्ती उभ्या अवस्थेतील पाहायला मिळते. खुलताबाद येथील श्री. भद्रा मारुतीची मूर्ती मात्र निद्रिस्त [झोपलेल्या] अवस्थेतील आहे. सदैव श्रीराम सेवेत तत्पर असणारे श्री. हनुमानजी खुलताबादला निद्रावस्थेत पाहून भक्तांना आश्चर्य वाटते. त्यामागे एक प्राचीन कथा प्रचलित आहे.

🔹कथा.
त्रेतायुगात श्रीराम भक्त असलेला भद्रसेन नावाचा राजा येथे राज्य करीत होता. भद्रसेन राजा श्रीरामाचा निस्सीम भक्त असल्याने रामभक्तीत तल्लीन राहायचा. भद्रकुंडाजवळ बसून तो रामधून गात असे. त्यांच्या राम धून मध्ये चेतन व अचेतन सृष्टीही भावमय होऊन जात असे. एकदा असेच राम धुन गात असतांना हनुमान या परिसरातून जात असतांना त्यांच्या कानी भद्रसेन राजाची रामधूम पडली. रामधूनेतील माधुर्य आणि आतर्ता पाहून हनुमानजी भावविभोर झाले. ते रामधून ऐकण्यात इतके तल्लीन झाले की त्यांना निद्रावस्था प्राप्त झाली.

जेव्हा भद्रसेन राजाची रामधून संपली तेव्हा हनुमानजी अतिशय भावविभोर स्थितीत निद्रावस्थेत असल्याचे दिसले. हनुमंतानी राजास वर मागण्यास सांगितले. भद्रसेन राजाने सांगीतले की, प्रसन्न होऊन वर देत असाल तर आपल्या चरणी नतमस्तक होऊन एकच विनंती की, आपण येथेच राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात.

राजाने मागितलेल्या वरास तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. तेव्हा ज्या ठिकाणी ही मूर्ती प्रगट झाली. येथे निद्रिस्त दिसत असली तरीही अत्यंत जागृत असे श्री.भद्रा मारुती देवस्थान सर्वत्र प्रसिद्ध झाले.

विश्वस्तांनी मंदिर परिसरात धर्मशाळा, दवाखाना,पाठशाळा, मंगल कार्यालय, श्रीराम मंदिर , वृद्धाश्रम, व पुष्पवाटिका यांच्या निर्मितीचा संकल्प राष्ट्रीय आणि सामाजिक उन्नतीसाठी राष्ट्र हिताच्या दृष्टीकोनातून केला आहे. भद्र कल्याण करणारा भद्रा मारुती म्हणून या देवस्थानची ख्याती दिवसेनदिवस वाढत आहे.

श्री. भद्रा मारुती संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. खुलताबादला दर शनिवारी हनुमान भक्तांची श्री.भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गर्दी असते. मनोकामना पूर्ण करणारा, नवसाला पावणारा भद्रा मारुती हे अविचल श्रद्धेचे प्रतिक आहे.

संपूर्ण हनुमान

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *