दृष्टांत 116 परमार्थ सोपा नाही

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

परमार्थ सोपा नाही….

⛳⛳⛳⛳⛳
देवाची प्राप्ती व सुख भोगायचा अधिकार कुणाला?
★एक राजा होता, तो सद्भक्त होता, त्याला देव प्रसन्न झाला.
★देव म्हणाला…”राजा तुला जे हवे ते माग.”


★ राजा नेहमीच प्रजेच्या हिताचा विचार करायचा, त्यांच्या सुखी जीवनाचा विचार करायचा.★राजा म्हणाला…”देवा जसे आपण मला दर्शन दिले तसे राज्यातील प्रत्येकाला दर्शन द्यावे म्हणजे सारे सुखी होतील.”
★देव म्हणाला…”राजा हे असंभव आहे, प्रत्येकालाच देव हवा आहे असे नसते.”
पण राजा प्रजेचे हित पाहणारा होता त्याने हट्टच केला.
★देव म्हणाला…”ठीक आहे समोरच्या डोंगरावर सर्वांना घेऊन ये मी दर्शन देईन.
राजाला खूप आनंद झाला, दुसऱ्या दिवशी साऱ्या प्रजेला घेऊन डोंगराकडे निघाला.चालता चालता लोकांना एके ठिकाणी तांब्याची नाणी दिसली काही लोक ती जमवू लागली.
*राजा प्रजेला म्हणाला…”अरे यापेक्षा महत्वाचे आपणाला भेटणार आहे चला माझ्याबरोबर पुढे चला” पण त्यानी राजाचे ऐकले नाही, राजा त्यांना तिथेच सोडले आणि इतरांना घेऊन पुढे निघाला तर पुढे चांदीची भरपूर नाणी दिसली आणि काही लोक तिकडेच धावले त्यांनी असा विचार केला पहिले चांदीची नाणी घेऊ मग देवाला भेटू देव कुठं जातोय?
★राजा म्हणाला….”त्या चांदीच्या नाण्यासाठी नशिबाला लाथ मारू नका”
पण कोणीही ऐकायच्या मनस्थिती नव्हते प्रत्येक जण नाणी जमवण्यात गुंतले होते कोणालाही देवाची आठवण नव्हती.


राजा खूप खिन्न झाला बाकीच्यांना घेऊन पुढे निघाला तर पुढे काही अंतरावर लोकांना सोन्याची नाणी दिसली आता तर सारेच धावले, राजाचे न ऐकता सारेच नाणी जमवू लागले. राजा निराश झाला म्हणाला….”मी याही पेक्षा खूप मोठे सुख लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लोक तांबे, चांदी आणि सोन्यात सुख शोधत आहेत, किती लोभी आहेत हे लोक, देवांपेक्षा विषय महत्त्वाचे वाटतात, देवाच्या समोर जगातील सारी दौलत व्यर्थ आहे”
★राणी म्हणाली…”हो महाराज,लोकांना देवांपेक्षा विषय अधिक प्रिय वाटतात.”
राजा आणि राणी पुढे निघाली आणि पुढे
हिऱ्यांचा खच पडलेला दिसला आणि राणी राजाला न विचारता धावत गेली,हिरे जमवू लागली,पदरात हिरे जमवताना आपल्या वस्त्राची सुध्दा तिला जाणीव राहिली नाही.ते पाहून राजाला खूप वाईट वाटले,आता तो एकटाच उरला.प्रजा गेली नातेवाईक गेले, मित्र गेले, राणी म्हणजे बायको गेली 🔸देवाला भेटणारा🔸 एकटाच उरतो हेच खरे आहे
★राजा पुढे गेला तर समोर देव होता, हसत हसत देव म्हणाला..”राजा तुझी प्रजा, तुझे प्रियजन कुठे आहेत? मी त्यांची वाट पहातो आहे.राजाने मान खाली घातली.तेव्हा देव म्हणाले…..


“राजा जी लोक आपल्या जीवनात माझ्या प्राप्तीपेक्षा संसार, संसारातील विषय, धनसंपत्ती, बायको मुले याना अधिक महत्व देतात त्यांना माझे दर्शन, माझी प्राप्ती, माझे सुख कधीच मिळत नाही, आणि माझे दर्शन, माझी कृपा न झाल्याने आयुष्यभर दुःख भोगतात.”
जो माणूस काया वाचा आणि मनाने देवाला शरण जातो, संसारिक विषयांचा मोह सोडून परमार्थ करतो, भक्ती करतो, नाम घेतो तोच मुक्त होतो,सुख भोगावयास अधिकारी बनतो

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 19
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *