अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संप्रदाय संमेलन पटना बिहार 2022

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Bihar Patna Janardhan Maharaj:
॥अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संप्रदाय संमेलन ॥
कालावधीः-

गुरुवारः ज्येष्ठ शुद्ध नवमी गुरुवार दिनांक ९ जुन २०२२.

ज्येष्ठ शुद्ध दशमी= स्मार्तएकदशी शुक्रवार दिनांक १० जुन २०२२

दशाहार गंगास्नान
ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी शनिवार दिनांक ११जुन २०२२

सर्व वारकरी वैष्णव संप्रदाय अनुरागी भाविक समाजास सप्रेम जयहरी!

पत्रास कारण की,
आम्ही दिनांक ९।१०।११ जुन २०२२
असे त्रिदिवसीय
॥ अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव संमेलन ॥
पटणा शहरात जनक जी का कीला या ठिकाणी आयोजित करित आहोत. हेतू एवढाच की, वारकरी संप्रदायविचार जसे नामदेव महाराजांनी भारतभर प्रसारित व्हावेत म्हणून परिभ्रमण केले.त्या संत नामदेव महाराजांचे ७५१वे वर्ष म्हणजेच सप्तशतकोत्तर जयन्ती वर्ष आहे. कोरोनामुळे सप्तशतकोत्तर रजतजयंती महोत्सव शासकीय व खाजगी किंवा संप्रदायामार्फत बृहत् स्वरूपात साजरा करता आला नाही. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे हे सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या दोन्ही संतांच्या जयंती व समाधीची विशेष पर्वणी साधून आम्ही बिहारची राजधानी पटना येथे हा कार्यक्रम मुद्दाम आयोजित करत आहोत. इतर प्रसिद्ध तीर्थक्षेत्री हरिद्वार, ह्रिषीकेश काशी येथे अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा,
ज्ञानेश्वरी पारायण इत्यादी माध्यमाने लोक महोत्सव करतात परंतु बिहारसारख्या अतिदूर उपेक्षित भागांमध्येही या संतांच्या विचारांचा जागर व्हावा म्हणून, हे त्रिदिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सर्व कार्यक्रम वारकरी संप्रदाय परंपरे प्रमाणेच होतील ,परंतु स्थानिक हिंदीभाषिक लोक सहभागी होणार आहेत. त्यांच्यात आपले विचार जावेत,त्यांना समजावे म्हणून संमेलनाचा माध्यम हिंदी भाषा राहील, आणि त्यादृष्टीने वारकरी संत वांङ्मयाचा. वारकरी संतांच्या चरित्राचा, वारकरी परंपरेचा अभ्यास असलेले व हिंदीभाषेवर प्रभुत्व
असलेले विद्वान लोक महाराष्ट्रातून पाटण्याला जातील आणि तेथील स्थानिक लोकांच्या सहभागाने हा संयुक्त कार्यक्रम संपन्न होईल.

तरी ज्यांना असे वाटते
की, सांप्रदायिक धार्मिक एकात्मता वाढावी प्रांतोप्रांतीच्या संप्रदाय परंपरांचा एकमेकाला परिचय व्हावा. तसेच हिंदू म्हणून व राष्ट्रप्रेमी म्हणून राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी. त्यांनी प्रस्तुत कार्यक्रमास यावे. ही विनंती.

पुणे रेल्वेस्टेशनवरून पुणेदानापुर . पटनण्यासाठी एक्सप्रेस रल्वे आहे आणि तिकीट पाचशे रुपये आहे. जाऊन येऊन एक हजार रुपये खर्च येईल आणि व्यवस्थापनाकरिता आणि इतर सोयी सुविधा करिता आणखी एक हजार रुपयांपर्यंत खर्च येईल.
या कार्यक्रमाची संयोजक समिती आपली पटणा येथे निवास भोजन व्यवस्था स्वखर्चाने करील.
कार्यक्रमासाठी लागणारा खर्च, आपण प्रवासातीरिक्त दिलेल्या १०००।- रूपयातून भागविला जाईल. म्हणून सम्मिलित होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दोन हजार रूपये संमेलन समितीकडे जमा करावेत आणि आपल्या धर्मकार्यातील वाटा उचलावा तरी, पुनश्च विनंती की आपण दोन हजार रुपये देऊन, वारकरी संतांच्या होणाऱ्या पवित्र रजत जयंतीनिमित्त व समाधी सोहळ्या निमित्त या पुण्यप्रद कार्यक्रमात सहभागी होऊन, सत्कर्म करावे . ही विनंती.
तुकाम्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य।
घातलिया भय नरका जाणे ॥

आणि जे शासकीय नोकरीत आहेत ज्यांना प्रवास खर्च मिळण्याची कायदेशीर व्यवस्था आहे. त्यांच्याकरिता तर रेल्वे प्रवास जवळजवळ निशुल्क होईल, जुन उन्हाळी सुट्टीचा कालावधी आहे. शिक्षकवर्ग विद्यार्थीवर्ग क्षेत्रातील वारकरी संप्रदाय प्रेमी मंडळीने आपला कार्यक्रम समजून यात सहभागी व्हावे. आणि पटना येथे होणारे संमेलन यशस्वी करावे. पटना येथील सर्व व्यवस्था हरिभक्त परायण जनार्दन महाराज पाटील यांच्या नियोजनाखाली करण्यात आलेली आहे.
ते तेथील स्थानिक असल्यामुळे कुठलीही अडचण येण्याची शक्यता नाही. आणि महाराष्ट्रात जी कार्यक्रम संयोजन समिती नेमली जाईल ही तरुण विद्वान कीर्तनकारांची असेल जे आपल्याशी संपर्क साधतील आपणास घेऊन जातील. संमेलन पूर्ण झाल्यानंतर जर ज्यांना वेळ असेल व अतिरिक्त खर्च करण्याची तयारी असल्यास त्यांना नेपाळ पशुपतीनाथ यात्रा हि करवतील . सहभागी होण्यासाठी पुढील फोन नंबर वर संपर्क साधावा ही विनंती.

संमेलन संयोजक
ह.भ.प.श्रीमान जनार्दन महाराज पाटील
पटना बिहार
मो.न.९९३११७२३५३
Bihar Patna Janardhan Maharaj:

॥अंतर्राष्ट्रीय वारकरी वैष्णव सम्प्रदाय सम्मेलन ॥

भी धर्मप्रेमी माता-भगिनी एवम् सज्जनवृन्द सभी के चरणों में शिरसाष्टांग दंडवत प्रणाम और सप्रेम जय हरि!

वारकरी वैष्णव सम्प्रदाय के प्रमुख सन्त श्री नामदेव जी महाराज की सप्तशतकोत्तर रजत जयन्ती का वर्ष है। उसी प्रकार संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज के संजीवन समाधि का सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष है। दो महान संतोंके रजत जयन्ती और रौप्य महोत्सव के उपलक्ष में अपने पटना शहर में एक आंतरराष्ट्रीय वारकरी वैष्णव सम्मेलन का आयोजन करणे जा रहे हैं। सम्मेलन की तिथी निश्चित हुई है संमेलन नऊ, दस, ग्यारह जून 2022 तीन दिन चलेगा। विविध प्रकार के धार्मिक कार्यक्रम होंगे ।उदाहरणार्थ प्राप्तः कालीन ५से ६=३० प्रभातिभजन अर्थात नामसंकीर्तन
और आरती होगी। ८ से १२तक संत संमेलन होगा। मध्याह्न भोजन के बाद दूसरे सत्र में २ से ५ तक सन्त चरित्र कथा निरुपण होगा। शाम ५=३०से ६=३०बजे तक हरिपाठ गायन होगा। जो संत ज्ञानेश्वर महाराज जी ने लिखा हुआ है ।उसके बाद ७ से ९ बजे तक सन्त वचनों का निरूपण, जिसे भजनी निरूपण कीर्तन कहा जाता है,वह कीर्तन होगा । उसके पश्चात रात में हरिजागर बडे बडे गायकों का संगीत भजन गायन होगा। तीन दिन तक यही क्रम चलेगा। उद्घाटन महामहिम राज्यपाल जी और समारोप माननीय मुख्यमंत्री जी द्वारा संपन्न होवे इस लिए हम प्रयास रत हैं। सभी धर्मप्रेमी धार्मिक समाज से विनती है,कि इस कार्यक्रम में सहभागी होकर सत्संग का लाभ उठाये।
आप सभी के सहयोग से ही यह पारमार्थिक आनंद उत्सव संपन्न होगा, आप इस में सहभागी होकर पुण्य के भागी बने। इस सत्संग में सह भागिता से निश्चित पारमार्थिक कल्याण होगा। इसलिये सबसे विनम्र निवेदन है, कि आप इस कार्यक्रम में अपना ही कार्यक्रम समज कर सहभागी हो जाइए।
,यही विनम्रतापूर्वक प्रार्थना।

आपका प्रार्थी हरिभक्तिपरायण
श्री जनार्दन पाटील महाराज,
संपर्क के लिये मोबाईल नंबर 9931172353

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *