11 वाचावे असे “अर्जुनाचा श्रीकृष्णाला प्रश्न” “केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांनाच येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

थोडाफार वेळ काढून नक्की वाचा.. व आत्मचिंतन करा…

💐 “अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न”-:💐

*”केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*

“जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही..”
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :
पार्था,
*”मांजर जेव्हा उंदराला पकडते*
तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना
खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त
परिणाम वेगवेगळे आहेत..”

*”तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
तर दुसरा ८४ फेर्‍यामध्ये अडकेल..”
: विष काय आहे ..?
“भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले…
जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते…
मग ती ताकत असो
गर्व असो.
पैसा असो.
भूक असो..”
*”शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की…..*

जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
*पण कोणाकडून दबली जात नाही”..l

सुखाचे १७ पाऊले👏👏
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे… १
❗मग उत्तरेकडे पाहून देवास स्मरावे… २
❗अंथरुणातून उठताक्षणी
देवाला नमावे… ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे… ४
❗देवाचरणी बसावे… ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे… ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे… ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे… ८

क्षणभर दाराबाहेर थांबून
देवाला स्मरावे… ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे… १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे… १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे… १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे… १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे… १५
❗प्रत्येक क्षण हेच अ अंतिम जीवन
हेच मनी ठसवावे… १६

❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे… १७
🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो🙏

-मी कोण ?- सकाळी पंधरा मिनिटे पूजा करून टाकतात. आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?

®️ महान तपश्चर्या केलेल्या कालीभक्त परमहंसांना कॅन्सर झाला.
®️ विवेकानंदांना मधुमेहाने ग्रासले.
®️ व-हाडचे महान संत गुलाबराव महाराजांना अंधत्व आले.
®️ सुरदासही आंधळे होते.
®️ मुक्तेश्वर मुके होते.
®️ कुर्मदास पांगळे होते.
®️ चोखोबारायांचा मृत्यु भिंत आंगावर पडल्याने झाला.
®️ तुकोबारायांचा सर्व संसार दानादिन झाला.
®️ ज्ञानोबारायांच्या आई वडीलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले.
®️ जन्मभर श्रीकृष्णांसाठी वेड्या झालेल्या मीराबाईला खूप छळ सोसून शेवटी विषाचा प्याला घ्यावा लागला.


®️ पांचालीला वस्त्रहरणाच्या दिव्यातून जावे लागले.
®️ महान पतिव्रता सीतादेवींना बंधनवासात रहावे लागले आणि अग्निदिव्याला सामोरे जावे लागले.
®️ श्री रामप्रभूंना वनवास भोगावा लागला.
®️ प्रत्यक्ष श्रीकृष्णांना स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप सहन करावा लागला.
®️ विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली.

®️ पैशाची टांकसाळ घरात असताना ह्या महान पुण्यवान जीवांना दारिद्र्य,दु:ख भोगावे लागले इतकी कर्माची गति गहन असते तर आपल्या टिचभर पुण्याचा डांगोरा पिटणे हास्यास्पद नाही का?🔰 “मी एवढे देवाचे करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का” असे रडगाणे गाणा-या अज्ञ जीवांनी वरील उदाहरणे वाचून निमुटपणे प्रेमाने उपासना करीत रहावे व परमेश्वराच्या अचुक न्यायदानावर विश्वास ठेवावा. त्याच्या न्यायालयात कधीही गफलत होत नाही.

🎯 म्हणून पुण्याची गणना करुन स्वतःचा टेंभा मिरवू नका .
म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी🌹🌹🙏🌹🌹

समजून घ्यावे असे……

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *