गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दुर्वा माहात्म्य

एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून ‘अनल’ नावाचा एक भयंकर राक्षस निर्माण झाला.


त्या राक्षसाच्या भयंकर आवाजाने त्रिभुवन हादरून गेले आणि डोळ्यातील अग्नीने पृथ्वी जळू लागली. दशदिशा जाळीत, पोळीत, जे काही सापडेल त्याचं भक्षण तो करु लागला. हा प्रकार पाहून सर्वजण भयभित झाले. त्या राक्षसाच्या त्रासातून वाचण्यासाठी देव श्रीगणेशाकडे गेले. त्यांची करुणावाणी ऐकून लहान बालकाच्या रुपात गजानन त्यांच्या समोर आला आणि म्हणाला “मला तुम्ही अनलासुरापुढे नेऊन सोडा”.


श्रीगणेशाच्या इच्छेप्रमाणे देवांनी बालगणेशास अनलासुरापुढे नेऊन सोडले तेथे जाताच छोटा गणेश एकदम पर्वताएवढा महाकाय झाला व त्याने अनलासुराला गिळून आपल्या पोटात टाकले. त्यामुळे गजाननाच्या पोटात दाह होऊ लागला. तेव्हा इंद्रादी देव त्या बालकाजवळ आले व त्याच्या पोटातील दाह शांत व्हावा म्हणून प्रत्येकाने काहीना काही दिले :


इंद्राने शीतल व अमृतमय चंद्र त्याच्या मस्तकावर ठेवला, म्हणून ‘भालचंद्र’ म्हटले जाऊ लागले.
ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा दोन मानसकन्या निर्माण करुन त्या अर्पण केल्या.
विष्णूने आपल्या हातातील थंडगार कमळ दिले, त्यामुळे गणेशास ‘पद्मपाणी’ म्हटले जाऊ लागले.
वरुणाने थंडगार पाण्याचा अभिषेक त्याच्या मस्तकावर केला.


शंकराने सहस्त्रमस्तकांचा नाग अर्पण केला म्हणून गणेशास ‘व्यालबद्धोदर’ असे नाव प्राप्त झाले.
इतके उपहार मिळूनसुद्धा श्रीगणरायाच्या पोटातील आग काही केल्या थांबेना. तेव्हा तेथे आलेल्या ८०,००० ऋषिंनी प्रत्येक २१ अशा हिरव्यागार दुर्वा श्रीगजाननाच्या मस्तकावर अर्पण केल्या, तेव्हा गजाननाचा दाह कमी झाला.
तेव्हा गजानन म्हणाला, “अनेक उपायांनी माझ्या दाहाचं क्षमन झालं नाही, ते दुर्वांनी झालं, म्हणूनच मी या दुर्वांना प्रिय मानतो. मला त्या अर्पण करणा-याला पुण्य लाभेल”.

गणपतीची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी पाहा

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

महत्वाची माहिती

अशोक काका कुलकर्णी संकलित

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *