भूमि/जमीनसंबंधी स्वप्न व त्याचे फळ स्वप्नशास्र भाग २

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

🌹 *स्वप्न शास्र* 🌹

*भाग २*

*भूमिसंबंधी*

आपल्‍याला दुस-याने भूमिदान केलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास, अविवाहिताचे लग्‍न सुंदर स्‍त्री बरोबर होईल, विवाहितास स्‍त्रीकडून धनप्राप्‍ती होईल. आपले जमिनीस हद्द नाही, असे पाहिल्‍यास त्‍याला पैसा पुष्‍कळ मिळेल, काळी जमीन स्‍वप्‍नामध्‍यें पाहिल्‍यास कष्‍ट प्राप्‍त होतील.

स्‍वप्‍नांत जमीन हाललेली पाहिल्‍यास त्‍याचा कार्यभंग होईल. भूकंप झालेला पाहिल्‍यास त्‍याचे सर्व जातीस वाईट; पायाखालची जमीन हाललेली पाहिल्‍यास त्‍याचा दावा बुडेल, अगर पैशाची नुकसानी होईल. पर्वताचा कडा तुटलेला स्‍वप्‍नात पाहिल्‍यास एका प्रसिध्‍द मनुष्‍याचे नुकसान होईल. आपल्‍यास माहीत आहे असे एखादे शहर भूकंपाने उद्ध्‍वस्‍त झालेले पाहिल्‍यास आपल्‍या देशात दुष्‍काळ पडेल. ते शहर आपल्‍यास पाहीत नसल्‍यास आपले आप्‍तवर्ग राहणा-या शहराची खराबी होईल.

आपली सर्व जमीन उत्तम पिकाने भरलेली स्‍वप्‍नात पाहिल्‍यास, आपणास पुष्‍कळ धन मिळेल. आपल्‍या सर्व परसामध्‍ये भाजीची अळी लावलेली पाहिल्‍यास आपल्‍यावर संकटे येतील. आपल्‍या परसामध्‍ये विहिरी, फुलांची झाडे, फळे वगैरे पाहिल्‍यास सु-स्‍वभावाची बायको मिळेल, व कीर्तिमान पुत्र होईल.

धान्‍य न उगवलेल्‍या अशा नांगरलेल्‍या जमिनीत उभा राहिलो आहे असे पाहिल्‍यास, आपल्‍या मुलांबरोबर अगर दुस-या कोणाबरोबर शत्रुत्‍व उत्‍पन्‍न होईल. हेच स्‍वप्‍न नवरीस अगर नव-यास पडल्‍यास त्‍यांचा विवाहसंबंध घडून येणार नाही. विवाहित मनुष्‍याने हे पाहिल्‍यास त्‍यास भांडखोर प्रजा होईल. हेच स्‍वप्‍न व्‍यापा-यास पडल्‍यास त्‍यास व्‍यापारात नुकसानी येईल.

हिरव्‍या धान्‍य उगवलेल्‍या शेतामधून चाललो आहो असे स्‍वप्‍नात पाहिल्‍यास आपली भरभराट होईल, हिरव्‍या गवताचा भारा आपण उचलून आणला अगर जाग्‍यावरच पाहिला तर शुभ. वाळलेले गवत पाहणे वाईट. शेतामध्‍ये धान्‍यांची कणसे दिसल्‍यास कष्‍टार्जित पैशापासून सुख होईल.

आपणच नांगरताना स्‍वप्‍नात पाहिले असता मान मिळेल. मोठ्या रस्‍त्‍यामध्‍ये चालताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास सौख्‍य, अरूंद गल्‍लीत किंवा गृहेत चालत आहो असे पाहिले असता संकटे येतील. चालताना आपल्‍या बरोबर आपला मित्रही आहे असे पाहिले असता त्‍या मित्राबरोबर विरोध होईल. गृहेमधून बाहेर प्रकाशात आलो असे पाहिल्‍यास संकटे नाहीशी होतील.

आपण तलावात पडलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास संकटे येतील. कुंभाराचे तलावात पडलेले पाहिल्‍यास विधवेबरोबर संभोग घडेल.

देशाचा नकाशा स्‍वप्‍नात पाहिल्‍यास संकटे येतील. व स्‍मशानभूमी पाहिल्‍यास अभिवृद्धि होईल.

घर गाईच्‍या शेणाचे सारवलेले स्‍वप्‍ना पाहिल्‍यास चोर चोरी करून जातील. घर बांधताना पाहिले असता कार्यसिद्धी होईल. ते घर आपले आहे असे वाटल्‍यास धनलाभ. बागेमध्‍ये शिकार करताना स्‍वप्‍नात पाहिल्‍यास भोग आणि संपत्ती यांची पूर्णता होईल. पुष्‍पांच्‍या बगिच्‍यांतून आपण फिरतो आहो असे पाहिल्‍यास सौख्‍यलाभ. घराच्‍या मधून फिरताना पाहिल्‍यास दूर देशाचा प्रवास घडेल. जंगलामध्‍ये फिरताना पाहिल्‍यास कष्‍ट प्राप्‍त होतील. धर्मशाळेत राहिलेले पाहिले असता दारिद्य येईल व कार्यहानी होईल; किंवा कारागृह भोगावा लागेल, अथवा रोग्‍याचा रोग पुष्‍कळ दिवस राहील. कुंडीत लावलेली झाडे पाहिल्‍यास आपले गृह्य उघडकीस येईल.

भिंतीवर, माडीवर, शिडीवर, अगर घरावर चढलेले स्‍वप्‍नात पाहिल्‍यास उद्योग वृ‍द्धी आणि धनसमृद्धी होईल. याप्रमाणे दुस-यांना चढवताना पाहिले तर शुभवर्तमान समजेल. या वस्‍तू ओलांडून जातो आहे असे पाहिले असता संकटे नाहीशी होतील. यांच्‍यावरून पडतांना पाहिले असता आपले हातून परोपकार घडेल. झाडावर चढताना पाहिले तर मेजवानीचे जेवण, आरोग्‍य आणि धनलाभ. पळस, कडुनिंब, या झाडावर चढलो असे पाहिले असता विपत्ती प्राप्‍त होईल. अशोक, पळस या वृक्षांस पुष्‍पे आलेली पाहिली असता शोक प्राप्‍त होतो.

स्‍वप्‍नांमध्‍ये चिखलात बुडालो असे पाहिले असता मृत्‍यु, देवालय, राजगृह, पर्वताचे शिखर, औदुंबर, आणि फलयुक्‍त वृक्ष यांच्‍यावर चढताना स्‍वप्‍नात पाहिले तर कार्यकिद्धी व द्रव्‍यलाभ होईल. रोग्‍याने हे स्‍वप्‍न पाहिल्‍यास त्‍याचे रोग दूर होतील. पाय-या नसलेल्‍या पहाडावर रांगताना स्‍वप्‍नात पाहिले तर पुष्‍कळ संकटे येऊन शेवटी लोकांकडून मान, कीर्ती आणि धनलाभा प्राप्‍ती होईल. रांगता रांगता पडले असता नीचदशा प्राप्‍त होईल. वर पोहचण्‍यापूर्वीच जागृत झाल्‍यास दु:ख प्राप्‍त होईल. ओल्‍या, भिजलेल्‍या अगर फोडलेल्‍या लहान भिंतीवर चालतो आहे असे पाहिल्‍यास कष्‍टप्राप्‍ती, आणि ती भिंत न पडता आणि अपाय न होता उमरलो असे वाटल्‍यास जय प्राप्‍त होईल. भस्‍म झाली असे पाहिले असता मृत्‍यू सुचविते.

स्वप्न सूची पहा

स्वप्न व त्याचे फळ


संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *