दत्त चरित्र संपूर्ण ५१ अध्याय ग्रंथ, ओवीबद्ध संपूर्ण सूची

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दत्त जन्माचे अभंग आरतीसह
श्री दत्त जन्माख्यान अध्याय
दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची
दत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहिती
दत्तात्रयांचे सोळा अवतार
दत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहिती
गिरनार माहात्म्य

पारायण महात्म्य व नियम
दत्त महात्म्य*

दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे, थोरल्या महाराजानी दत्त महाराजानां मागतो मी पसरुनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।। अशी विनवणी केली आहे.
एकावन्न अध्याय आणि प्रत्येक अध्यायात १०८ ओव्या असे याचे स्वरूप आहे. थोरल्या महाराजांनी ह्या ग्रंथात ३९ व्या अध्यायापासून ते शेवटपर्यंत अनेक मंत्र गुंफले आहेत.

यात मांडुक्य, ईशावास्य हि उपनिषदे आणि शांतिपाठ, विष्णुसूक्तातील काही मंत्र समाविष्ट आहेत.

थोरले महाराज हे अनधिकारी व्यक्तीकडून शास्त्राज्ञेचे उल्लंघन होऊ नये म्हणून जागरूक असत आणि त्या करिता अशा मंत्रांची गुंफण अनेक ग्रंथांमधून करीत असत. हेतू हा कि मंत्रांचे पठण व्हावे. महाराजांनी महत्पूरला ह्या ग्रंथाची रचना केली. संस्कृत भाषेत असलेले दत्त पुराण सामान्य जनांना सुलभ व्हावे म्हणून त्यांनी ह्या ग्रंथाची रचना केली. वाचनास सुरुवात करताच या ग्रंथाचे सामर्थ्य अनुभवास येते. काही पारायणे होताच बदलत चाललेल्या आयुष्याचा आपण मागोवा घेऊ शकतो. या ग्रंथाच्या सामर्थ्याची अनुभूती घ्यावयाची असल्यास रोज एक अध्याय वाचीत जावे. एका अध्यायाला केवळ पंधरा मिनिटे लागतात. वाईट स्वप्ने किंवा रात्री घाबरून उठणे यावर हा ग्रंथ उशाशी घेऊन झोपावे.

श्रीदत्तमाहात्म्याची सप्ताहपद्धती

पहिल्या दिवशीं ६ अध्यायापर्यंत
दुसऱ्या दिवशीं १४ अध्यायापर्यंत
तिसऱ्या दिवशीं २२ अध्यायापर्यंत
चौथ्या दिवशीं ३० अध्यायापर्यंत
पाचव्या दिवशीं ३८ अध्यायापर्यंत
सहाव्या दिवशीं ४६ अध्यायापर्यंत
सातव्या दिवशीं ५१ अध्यायापर्यंत

दत्त माहात्य्म पारायण पद्धती
१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्या अर्थाकडे असावे.
२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.
३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.
५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्यांचा अनुभव आहे.
७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्याशी बोलू नये.
८. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी.

दत्त चरित्र, अध्याय १ ते ५ ओवीबद्ध
दत्त चरित्र, अध्याय ६ ते १० ओवीबद्ध
दत्त चरित्र, अध्याय ११ ते १५ ओवीबद्ध
दत्त चरित्र, अध्याय १६ ते २० ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।
संकलक:- सुरज राकले पंढरपूर

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा

भ. दत्तात्रय संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *