पक्षी स्वप्नाचे फळ स्वप्नशास्र भाग ९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग ९
पक्ष्‍यासंबंधी

  • चिमणी, मैना यांना स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे चांगले. आणि त्‍या एकमेकांस मारहाण करीत असताना पाहिले तर दु:खप्राप्‍त होईल.
  • त्‍या उडत असताना पाहिले तर चांगले.
  • दाणे वेचीत असताना पाहिले तर उद्योगवृद्धी.
  • कबुतर स्‍वप्‍नात पाहणे वाईट. शोकप्राप्‍त होईल.
  • कोकिळा पाहिली किंवा तिचे गायन ऐकिले तर ज्‍या स्‍त्रीची इच्‍छा असेल ती स्‍त्री फार श्रमाने प्राप्‍त होईल.
  • बायकांनी जर हेच स्‍वप्‍न पाहिले तर आपल्‍या नव-याने इतर स्‍त्रीपर नजर ठेविली आहे असे जाणावे.
  • कावळ्याला स्‍वप्‍नामध्‍ये पाहिल्‍यास व्‍यापारहानी होईल.

  • कावळा उडत असताना पाहिले तर वाईट.
  • कावळा ओरडल्‍याचे ऐकले तर नाश.
  • आपल्‍या डोक्‍यावरून कावळा उडाल्‍याचे स्‍वप्‍न पडले तर गंडांतर आहे असे समजावे.
  • कावळ्याचे मैथून स्‍वप्‍नात पाहिले तर धान्‍यलाभ.
  • घारीला पा‍हणे दु:खकारक.
  • मोराला स्‍वप्‍नात पाहिले तर विशेष धनप्राप्‍ती आणि संतानवृद्धी.
  • अविवाहित मनुष्‍याने पाहिले तर लवकरच विवाह होऊन सासूकडून द्रव्‍यलाभ होईल असे जाणावे.
  • स्‍त्रीला जर हेच स्‍वप्‍न पडले तर यात्रा घडेल व पुराण कीर्तन इत्‍यादी ऐकण्‍याचा लाभ होईल.
  • राजहंस स्‍वप्‍नामध्‍ये पाहणे शुभ. शेतक-यांना धान्‍य लाभ.
  • प्रवाशांना हेच स्‍वप्‍न पडल्‍यास आपण मेलो अशी स्‍वदेशामध्‍ये प्रसिद्धी होईल. व इतरांना दूरदेशी प्रयाण होऊन जिवाला सौख्‍य मिळेल व कीर्ती वाढेल असे समजावे.

  • भारद्वाज पक्षी पाहिला तर धनलाभ व यश.
  • चक्रवाक किंवा चातक पक्षी पाहिला तर किंवा त्‍याचा शब्‍द ऐकिला तर महदैश्‍वर्य प्राप्‍त होईल.
  • गिधाडाला पाहिले तर चोरभय.
  • गरूड पक्षी पाहिला तर कार्यसिद्धी.
  • घुबड किंवा वाघुळ पाहिले तर धनहानी,
  • स्‍वप्‍नात बगळा (बाळभोक) कोंबडी आणि क्रौंच पक्षीण यास पाहिले असता स्‍त्रीप्राप्‍ती.
  • स्‍वप्‍नात पोपटपक्षी पाहिला तर भोजनलाभ.
  • पक्षी उडतात असे पाहिले तर श्रीमंताना दारिद्र्यता व दरिद्री यांना धनप्राप्‍ती.
  • पिंज-यातून पक्ष्‍याला बाहेर काढल्‍यासारखे स्‍वप्‍न पडले तर कार्यसिद्धी व व्‍यापा-यांना लाभ. शेतक-याना धान्‍यलाभ.
  • पक्ष्‍याला आपण अन्‍य कोणत्‍याही प्रकाराने धरले असे स्‍वप्‍नात पाहिले तर भाग्‍य, ऐश्‍वर्य ही प्राप्‍त होतील.
  • पक्ष्‍यांचा घरटा अकस्‍मात् सापडून त्‍यात पिले अगर अंडी आहेत किंवा नाहीत असे नजरेने पाहिल्‍यासारखे स्‍वप्‍न पडेल तर शुभ.
  • पक्ष्‍यांचा घरटा शोधण्‍याकरता पळत जाणे आणि तो सापडणे, व त्‍यात पिले किंवा अंडी नसणे, असे पाहिल्‍यास आपण ज्‍या लाभाकरिता झटतो तो सफल होणार नाही.

  • अंडी असलेले घरटे पाहिले तर धनलाभ.
  • आपल्‍या परसात किंवा घरच्‍या कवलाराला अंडीसुद्धा असलेले घरटे सापडले आणि ते आपण काढून टाकले असे स्‍वप्‍न पडले तर दारिद्र्यता.
  • उडता येत नाही अशा पक्ष्‍याचे घरटे स्‍वप्‍नामध्‍ये पाहिले तर तंटे-बखेडे उत्‍पन्‍न होऊन अपजय होईल.
  • स्‍वप्‍नामध्‍ये अंडे वजनाने अगदी हलके वाटले तर हातामध्‍ये धरलेले सर्व पदार्थ सोने होईल.
  • स्‍वप्‍नात अंडी खाल्‍यासारखे वाटले तर दारिद्र्य प्राप्‍त होईल.

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *