स्वप्नात मनुष्य पाहिल्यास फळ ? स्वप्नशास्र भाग ११

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

भाग ११
मनुष्‍यासंबंधी

  • स्‍वप्‍नात ब्राह्मणाला पाहणे रोगदायक.
  • सोवळे नेसलेला ब्राह्मण किंवा पुरोहित यांस पाहिले तर अग्नि भय.
  • क्षत्रिय पाहिला तर आरोग्‍य,
  • वाणी लोकांना पाहिले तर लाभ.
  • शूद्राला पाहिले तर सुखप्राप्‍ती,
  • म्‍लेच्‍छ पाहिला तर भीती.

  • संकर जातीच्‍या मनुष्‍यापैकी, कोणास पाहिल्‍यास व्‍याधी.
  • राजवर्गापैकी कोणा माणसास पाहिल्‍यास क्षेमवृद्धी.
  • आई, बाप, गुरू किंवा वडील मनुष्‍य यापैकी कोणी पाहिल्‍यास लाभ.
  • पुरूषाने लहान मुलाला पा‍हणे चांगले. परंतु बायकांनी पाहिल्‍यास वाईट.
  • कुजलेल्‍या अंगाचे मूल पाहिले तर मित्रद्रोह घडेल.
  • मूल जन्‍मताना पाहिले तर सौख्‍यकारक.

  • मुलाचा मृत्‍यू पाहिल्‍यास धननाश, पण अविवाहित मुलीने पाहिल्‍यास तिचा विवाह लवकर होईल.
  • बायकांना हेच स्‍वप्‍न पडल्‍यास धनलाभ.
  • सकेश डोक्‍याचा मनुष्‍य पाहिला तर आलस्‍यपणा आणि स्त्रियांपासून नाश.
  • विधवेला पाहिली असता दुष्‍काळ किंवा रोगोत्‍पत्ती होईल म्‍हणून समजावे.
  • प्रेताला पाहिले तर भोजनलाभ, किंवा नूतन वस्‍तूंची प्राप्‍ती.
  • कुबड्या मनुष्‍याला पाहिले तर दु:खकारक.
  • जादुगाराला पाहिला तर दु:ख प्राप्‍त होईल.

  • शत्रूला पाहून त्‍याच्‍या बरोबर बोलल्‍यासारखे किंवा भांडल्‍यासारखे वाटेल तर कष्‍ट प्राप्‍त होतील.
  • स्‍वप्‍नांमध्‍ये शत्रू आपल्‍या क्षेमाची इच्‍छा करतील तर जय.
  • मेलेल्‍या वडील माणसांना पाहिल्‍यास कार्यसिद्धी आणि धनलाभ,
  • मेलेल्‍या मनुष्‍याबरोबर आपण बोलत आहो असे स्‍वप्‍न पाहिले तर आपली प्रसिद्धी होईल.
  • पिशाच्‍च पाहिले तर कार्यनाश.

  • स्‍वप्‍नात ‘नग्‍न कुमारी’ पाहिली तर उदासिनपणा.
  • स्‍वप्‍नांमध्‍ये सुंदर अलंकार धारण केलेल्‍या सोभाग्‍यवती स्त्रिया पाहिल्‍या तर इष्‍ट कार्य किंवा मंगलकारक सिद्ध होतील असे जाणावे.
  • मनुष्‍याने आतडे आपल्‍या गळ्यामध्‍ये घालून ग्राम मध्‍येभागी आपण उभे आहो असे पाहिल्‍यास पुष्‍कळ ग्रामावरचा अधिकार मिळेल.
  • स्‍वप्‍नामध्‍ये लग्‍न होत असलेले पाहिले तर मरणाची बातमी समजेल.
  • लग्‍नाला आपण साहाय्य केले असे पाहिले तर काहीतरी शुभवर्तमान समजेल.

  • म्‍हातारीचे लग्‍न केल्‍याचे स्‍वप्‍न पाहिले तर धनलाभ.
  • नुकतेच लग्‍न झालेल्‍या मुलीला आपण विधवा झाली असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास ती जन्‍म सुवासिनी राहून तिला पुष्‍कळ मुले होतील.
  • जारकांची उत्‍सुकता असूनही स्‍वप्‍नांमध्‍ये तो योग न घडेल तर कार्यसिद्धी होईल.
  • मन स्थिर न ठेवता जारकर्म केले असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास विपत्तीकाल येईल.
  • स्‍वप्‍नामध्‍ये अयोग्य अशा स्‍त्रीबरोबर संग घडला तर उत्तम फल.

  • स्‍वप्‍नात जी स्‍त्री दुर्लभ तिजशी क्रीडा करितो त्‍याला धन प्राप्‍त होते.
  • पांढरे वस्‍त्र व पांढरे गंध धारण केलेल्‍या स्‍त्रीने आलिंगन केल्‍यास त्‍या पुरूषाचे कल्‍याण होईल.
  • स्‍वप्‍नात आपण ओरडतो आहो असे वाटल्‍यास दु:ख,
  • रडत आहो असे वाटेल तर अभिवृद्धी.
  • मारामारी करीत आहो असे पाहिल्‍यास वाईट.

  • आपण वाळलो आहो असे स्‍वप्‍न पडले तर संसारमध्‍ये विरक्‍तपण प्राप्‍त होईल.
  • थंडीच्‍या योगाने वाळत आहो असे पाहिले तर धनलाभ,
  • आपण उडी मारीत आहो असे पडल्‍यास कार्यभंग व आपल्‍या शेजारच्‍या एका मनुष्‍याला मरण.
  • आपण स्‍वप्‍नामध्‍ये मेलो असे पा‍हणे चांगले.
  • आपण तुरूंगात आहो असे स्‍वप्‍न पाहिल्‍यास अधिकारवृद्धी व सभा पूज्‍यता प्राप्‍त होईल.
  • स्‍वप्‍नात आपल्‍यास बेड्या घातलेल्‍या पाहतो, त्‍याला चांगला पुत्र होईल असे जाणावे.
  • जो मनुष्‍य स्‍वप्‍नामध्‍ये उंच आसनावर बसुन जेवतो असे पाहतो तो कनिष्ठ असताना ही मोठा अधिकारी होतो.

स्वप्न सूची पहा
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

स्वप्न शास्त्र भाग १ ते १२ पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *