स्‍वप्‍ने का पडतात ? स्‍वप्‍न भविष्‍य सांगतात का? भाग १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्वप्न सूची पहा

🌹 स्वप्न शास्र 🌹
भाग १

*स्‍वप्‍ने का पडतात? स्‍वप्‍न भविष्‍य सांगतात का?*

झोपेत स्‍वप्‍न तुम्‍हा आम्‍हा सर्वानाच पडतात. स्‍वप्‍ने न पडणारा मनुष्‍य तुम्‍हाला शोधून पण सापडणार नाही. अर्थात आयुष्‍यात काही असे महाभाग तुम्‍हाला भेटतील जे छातीवर हात मारून सांगतील की, ‘आम्‍हाला स्‍वप्‍ने मुळीच पडत नाहीत. गादीवर पडल्‍याबरोबर आपल्‍याला गाढ झोप लागते.’ या भापट्यांवर तुम्‍ही मुळीच विश्‍वास ठेवू नका.

मनुष्‍याला स्‍वप्‍न न पडणे ही अश्‍यक्‍यच गोष्‍ट आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने न पडणे ही अशक्‍यच गोष्‍ट आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही झोपेत स्‍वप्‍ने पडणे हितकारक आहे. माणसाला स्‍वप्‍ने ही पडायलाच हवीत. जर स्‍वप्‍ने पडत नसतील तर तुमच्‍यात काही कमी आहे असे निश्चित समजावे. झोपेत स्‍वप्‍ने पडणे ही गोष्‍ट आरोग्‍याला फार फार हितकारक आहे हे लक्षात असूद्या.

स्‍वप्‍नाची दुनिया खरोखरच अलौकिक आहे. स्‍वप्‍नाचा अदभुतपणा तुम्‍ही आम्‍ही सर्वांनीच अनुभवलेला असतो. स्‍वप्‍नसृष्‍टी खरोखरच विलक्षण असते. स्‍वप्‍नात रंकाचा राजा झालेला आपण पाहतो. श्रीमंत मनुष्‍य भीक मागताना पण आढळतो. स्‍वप्‍ने आनंद देणारी असतात तशी भय निर्माण करणारी पण पडतात. स्‍वप्‍नात काहीतरी भयंकर प्रसंग पाहून किंचाळून उठणारी माणसे आपण पाहतोच. स्‍वप्‍ने पाहणारा काही वेळा आनंदाने नाचून उठतो तर काही वेहा भयाने मोठ्याने ओरडतो.

आपल्‍या शरीराचे सर्व व्‍यापार बंद झाले की आपले शरीर निश्‍चेष्‍ट पडते आणि अशा रीतीने चेतनाहीन अवस्‍था आला की मृत्‍यु आला असे आपण समजतो.

आपण जेव्‍हा रात्री झोपतो तेव्‍हा आपल्‍या शरीराचे सर्व व्‍यापार थांबतात, पण मनाचे खेळ चालूच असतात. शिवाय शरीराच्‍या आतील क्रिया पण चालूच असतात, झोपेत आपल्‍या शरीराचे सारे व्‍यापार थांबतात, पण मनाचे व्‍यापार चालूच राहतात. यावेळी शरीराचे जाऊन व्‍यापार चालू ठेवणारी जी शक्‍ती असते मी माणसाच्‍या मनाच्‍या शक्‍तीमागे जाऊन उभी राहते. अशा रीतीने रात्री निद्रासमयी आपले मन दुहेरी शक्‍तीच्‍या जोरावर काम करते. स्‍वत:चे बळ व रात्रीच्‍या वेळी मिळालेले शरीराचे बळ,

या दुहेरी बळाने मनरूपी इंजिनात प्रचंड शक्‍ती निर्माण होते. यामुळे मनाच्‍या विचारशक्‍तीचा वेग फारच वाढतो. यामुळे मेंदूला प्रचंड चालना मिळते. त्‍याचे चक्र खूप जोराने फिरू लागते व माणसाला स्‍वप्‍ने पडू लागतात. यावेळी ही जी दुहेरी शक्‍ती काम करते त्‍यामुळे जे विचार निर्माण होतात ते माणसाला पुष्‍कळदा भविष्‍याची वाट दाखवतात. संकटे कशी टाळावी याचे मार्गदर्शन करतात. या जातीचे मनाचे कार्य काही वेळा इतके तीव्र असते की त्‍याने माणसाच्‍या डोळ्यासमोर उद्या काय घडणार आहे याचे स्‍वष्‍ट चित्र स्‍वप्‍नाच्‍या रूपाने उभे ठाकते.

काही वेळा स्‍वप्‍ने सांकेतिक पडतात. त्‍याचा अर्थ आपणास लागत नाही. आपल्‍या पूर्वजांनी स्‍वप्‍नाचे काही ठोकताळे बसवले आहेत. हे ठोकताळे त्‍यांनी अनुभवाने बसवले आहेत. आपल्‍या ऋषिमुनींनी चिंतन करून स्‍वप्‍नाचा अर्थ आपल्‍याला सांगितला आहे. आपल्‍याकडील स्‍वप्‍नाचा अर्थ सांगणा-या वाड्मयाला हजारो वर्षांची परंपरा आहे. हे वाड्मय अनुभवाने परिपक्‍व आहे. त्‍यात फार खोल विचार भरलेला आहे. ऋषिमुनीनी केलेल्‍या तपाचे सामर्थ्‍य आपल्‍याला माहीतचे आहे. ते खूष होऊन एखाद्याला वर देत तर त्‍याची भरभराट होते असे. ते संतापले व त्‍यांनी शाप दिला तर समोरच्‍या माणसाची क्षणात राख होत असे. एवढे सामर्थ्‍य त्‍यांच्‍या वाणीला होते. दुर्वासऋषीने कुंतीला दिलेला वर व परशुरामाने कर्णाला दिलेला शाप आपल्‍याला माहीतच आहे.

स्वप्न सूची पहा

स्वप्न व त्याचे फळ



संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *