अशौच शव स्पर्श, अंत्ययात्रा गमन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अशौच* शव स्पर्श अशौच

शव स्पर्श व शवाच्या मागून गमन इत्यादि संसर्गाशौच सांगतो- संसर्गाशौचात नित्य कर्माचा अनाधिकार नाही. अस्पृश्यत्व मात्र आहे. ते अस्पृश्यत्वही त्याचे भार्यापुत्र इत्यादिकांस नाही. संसर्ग कर्त्यासच आहे. याप्रमाणे त्याच्या घरातील त्याचे स्वामित्व असलेले अन्नादि पदार्थ घेऊ नये. त्यात आपल्या जातीतील शवाचा स्पर्श झाल्यास सज्जोती अशौच आहे. हीन वर्ण शवाचा अस्पर्श असल्यास अधिक कल्पावे.

शवामागून गमन केल्यास

शवामागून गमन केल्यास सजातीय अथवा विजातीय शवाच्या मागून गेले असता स्नान करून अग्नि स्पर्श व घृत प्राशन करून पुनः स्नान करून प्राणायाम करावा. ब्राह्मणाने इतरांच्या शवाच्या मागून गमन केल्यास त्रिरात्र नदीमध्ये स्नान, घृतप्राशन व १०० प्राणायाम हे करावे, असे असता नित्य कर्माचा लोप नाही.

संकलन :- अशोककाका कुलकर्णी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *